माझे इतर लेख वाचण्यासाठी ब्लॉगच्या होम पेज वर कॅटेगरी (catagory ) वरील ऑप्शनला जा आणि आपल्या आवडीचा ब्लॉग वाचा. आवडलेला ब्लॉग आपल्या मित्रांना ,सहकाऱ्यांना whatsapp, facebook द्वारे शेअर करा. किंवा पेजची लिंक तुमच्या whatsapp ग्रुपला share करा.धन्यवाद.....!

Tuesday, April 28, 2020

पोरका

पोरका


कस्पटासम झालो आज
पाचोळ्याचीही किंमत नाही
आक्रंदन चालू आहे
आई तुझ्या गं पायी


जोडीदार जरी गेला तुझा
माझ्यासाठी  तू मायबाप होतीस
 माझ्यातल्या देवपणासाठी
 संस्कारपाणी घालत होतीस


पोरका झालो आई मी
का नको मी  तुला
कुठे शोधू बाप नाही
आई तूही सोडलस मला    ।।३॥


तुझ्यासाठी  ते आव्हान होतं
माझं  तू एक जगणं होतं
परमेशाला मागणं होतं
तुझ्या कुशीत खेळायचं होतं   



तु गेली स्वर्गात
 टाकून आम्हाला नरकात
  आठवणीच्या देशात मी
  आई मी आता परकाचं
 

विव्हळलेलं मन फक्त
जगण्यासाठी मरतंय
 गळफासाच्या छताखाली
 केविलवाणी जगतय




$$#$#$#%$%$$$

No comments:

Post a Comment