माझे इतर लेख वाचण्यासाठी ब्लॉगच्या होम पेज वर कॅटेगरी (catagory ) वरील ऑप्शनला जा आणि आपल्या आवडीचा ब्लॉग वाचा. आवडलेला ब्लॉग आपल्या मित्रांना ,सहकाऱ्यांना whatsapp, facebook द्वारे शेअर करा. किंवा पेजची लिंक तुमच्या whatsapp ग्रुपला share करा.धन्यवाद.....!

Sunday, December 15, 2019

सकारात्मक विचारांचा शरीरावर सकारात्मक परिणाम

                               

सकारात्मक  विचारांचा शरीरावर सकारात्मक परिणाम



समाजात वावरताना आपण  आपली प्रतिमा स्वच्छ राखण्याचा कायम विचार करतो. असे विचार असणे काही चुकीचे नाही.पण स्वतःचा विचार न करता केवळ दुसऱ्यांचा विचार करत राहिलात तर आपल्या विचारांकडे दुर्लक्ष होते.अशा विचारांचा आपल्या शरीरावर नकारात्मक  परिणाम होतो .त्यामुळे आपले विचार सकारात्मक असावे लागतात.
                                सकारात्मक विचारामुळे ,आपल्या भोवतालचे  वातावरण सकारात्मक विचारांच्या लहरींनी भरून टाकतात. त्यामुळे आपल्या भोवतालचे वातावरण आनंददायी तयार होते.
                             जीवन सकारात्मक झाले तर ते आनंदी बनेल.आपण आपले जीवन सहज जगायला शिकले पाहिजे. जीवन सुंदर आहे, हे आपण कायम ऐकतो. पण आपण स्वतः जीवन  सुंदर जगत नाही, हा अनुभव प्रत्येकाचा आहे. आपण आपलं दुःख कोणाला सांगत नाही.आपणच आपल्यावर तणाव निर्माण केला आहे. दुसऱ्यांच्या  गुणाचे कौतुक करताना आपल्या चांगल्या गुणांचे देखील दर्शन व्हायला हवे. दुसऱ्यांचे  चांगले गुण आपण चटकन सांगतो परंतु  आपले गुण आपण सांगत नाही. यातून कदाचित आपल्या मनावर नकारात्मक विचारांचा पगडा तयार होऊ  शकतो. आपले  स्वतःचे सकारात्मक विचार दडपले जातात. स्वतःसाठी आपण किती जगतो याचा विचार आपण जास्त वेळा करत नाही. त्यामुळे नकारात्मकता निर्माण होऊ शकते. अशी  नकारात्मकता आपणास आली तर त्यातून सहज बाहेर पडण्याचा शास्त्रशुद्ध मार्ग  म्हणजे ध्यान, धारणा , मौन, आर्यमौन आणि विपश्यना असे पर्याय उपलब्ध आहेत. यातील एक किंवा अनेक पर्याय अंमलात आणले तर आपले जीवन सहज ,सुंदर आणि सजग बनेल. नकारात्मकता निघून जाईल.
                                एक सामान्य माणूस दिवसभरात पन्नास हजारांच्या वर विविध विचार मनात आणतो. त्यापैकी सकारात्मक विचारांची संख्या फारच कमी असते. चांगल्या विचारांना घट्ट पकडून ठेवण्यासाठी मनाची बैठक चांगली असावी लागते. तेव्हा वरीलपैकी काही पर्याय उपयुक्त ठरतात. दररोज सकाळ/ संध्याकाळ पाऊण ते एक तास ध्यानात बसावे ,म्हणजे सकारात्मक विचार मनात येतात.याचा उपयोग आपल्या कामातील क्रम निवडीसाठी चांगला होतो. जसे सकारात्मक विचारांचा परीणाम शरीरावर  होतो तसा नकारात्मक विचारांचा  देखील होतो. तेच परिणाम आपल्या वर्तनावर दिसून येतात. आपल्या बदललेल्या  वर्तनाचा परिणाम कुटुंबावर होतो आणि  कुटुंबाचा परिणाम समाजात दिसावयास लागतो. माणसाला चिंता आणि काळजी यातील फरक ओळखता आला पाहिजे. सकारात्मक विचार डोक्यात असल्यास यशस्वी जीवन जगता येते.
खरोखरच मित्रांनो आपलं संपूर्ण आयुष्य हे आपण कसा विचार करतो यावर अवलंबून आहे.  दर 15 ते 20 सेकंदाला नवीन विचार हे चक्र अव्याहत पणे चालू असतं. 
 ज्यावेळेस आपण नकारात्मक विचार करतो त्यावेळेस विश्‍वात जेवढी नकारात्मक तरंग आहेत त्याच्याशी आपण जोडले जाऊन  नकारात्मक विचारांची गर्दी आपल्या भोवती उरते व उदासी - भय - यातून नैराश्याकडे वाटचाल सुरू होते . रेडिओ किंवा वाहिन्या ज्या ब्रँडवर आपण लावतो तेच प्रक्षेपण लगेच चालू होते. म्हणून नकारात्मक विचारांना - सकारात्मक करणे गरजेचे असते. 
 सकारात्मक विचार आपली शक्ती, आत्मविश्‍वास, मनोबल वाढवतात. नकारात्मक विचारांना - सकारात्मक करणे म्हणजे मनाचेच - मनाशी युध्द करणे होय. 

     सकारात्मक दृष्टीकोन मनाला प्रसन्न करून - अतिरिक्त ऊर्जा प्रदान करतो त्यामुळे कर्माला गती प्राप्त होते आणि आत्मविश्‍वास वाढतो. नकारात्मक विचार मनाला व शरीराला दुर्बल करतो. परिणामी कर्माची गती मंदावते - चुका होतात - हानी होते व यातूनच औदासिन्य (Depression) येते.  म्हणून सकारात्मक विचार करा व आनंदी रहा. 
                              माणसाला जीवन जगताना सुखात आणि दुःखात सारखेच जगता आले पाहिजे. सुख आले कि घटाघटा पिऊ नये , तसे  दुःख आले म्हणून चघळत बसू नये. यासाठी जीवनाकडे बघण्याचा दृष्टीकोन  हा  साक्षीभाव असला पाहिजे. सुख येईल निघून जाईल, तसे दुःख येईल निघून जाईल. हा भाव असला पाहिजे. ध्यान, धारणा,योग, मौन, आर्य मौन यांचा उपयोग करून अनेक व्यक्ती थोर झालेल्या आहेत. वर्धमान महावीर,  गौतम बुद्ध, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम ,संत रामदास स्वामी, स्वामी विवेकानंद , स्वामी समर्थ, गोंदवलेकर महाराज या विभूतीतील प्रत्येकाने कोणता ना कोणता पर्याय स्वीकारला . स्वामी विवेकानंद म्हणतात तुमचे विचार कसे आहेत, तसे तुम्ही बनता. तुमचे विचार दुर्बल असतील तर तुम्ही दुर्बल बनता. तुमचे विचार सामर्थ्यशाली असतील तर तुम्ही सामर्थ्यशाली बनता.  यामुळे त्यांच्याविचारांमध्ये सजगता , दृष्टाभाव, साक्षीभाव निर्माण झाला. आपल्या विचारांवर ते ठाम राहिले. त्यांनी जीवन सजग अनुभवले. म्हणून जीवनात नकारात्मक विचारांना थारा देऊ नका . सकारात्मक विचार शरीरावर सकारात्मक बदल घडवून आणतात यावर विश्वास ठेवा .जीवन आनंदाने जगा. 

If you have happy face, trouble goes as bubble;
And if you have not happy face trouble comes  as double.......…......


🙏🙏🙏🙏🙏
 इतर आणखी काही लेख वाचण्यासाठी माझ्या
 bhausahebmahanor.blogspot.com
ला भेट द्या./ ब्लॉगला फॉलो करा ./subscribe करा ....
 🙏🙏🙏🙏🙏

🙏🙏share करण्या साठी निळ्या रंगामधील whatsapp किंवा facebook वर टच करा.🙏🙏

11 comments:

  1. खुपच छान माहिती व लेखन.

    ReplyDelete
  2. चांगले विचार आहेत.फारच छान.

    ReplyDelete
  3. खूप छान माहिती सर

    ReplyDelete
  4. बरोबर आहे,तुज आहे तुज पाशी ....असच काहीतरी

    ReplyDelete
  5. बरोबर आहे सर ,
    तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार
    Positive thinking is Power of mind .

    ReplyDelete
  6. छानच विचार आहे

    ReplyDelete