या प्रश्नाचं प्रत्येकाचं उत्तर वेगळं असेल. जि. प. शाळेत न शिकणाऱ्या बालकाच्या पालकांचं उत्तर वेगळं आणि जि प. शाळेत बालकांना पाठवणाऱ्या पालकांचं उत्तर वेगळं असेल.
खाजगी शाळेत शिकवणाऱ्या पालकांना वाटत असेल की ,जि प.शाळेत शिपाई नाही, क्लार्क नाही, स्वच्छता टापटीप नाही , टाय बूट नाही, चकाचक ग्राउंड नाही की विविध स्पर्धा नाहीत. स्कुलबॅग, स्कुलबस यापैकी जि. प.च्या शाळेत काहीही नाही. इतकं सारं सोडून सोशल स्टेटस नाही ना इथं ! म्हणून चांगलं उत्पन्न असणाऱ्या पालकांचं असं उत्तर असू शकतं .
काही पालकांचं मत नाविलाज असं असू शकतं.
पण, आज खरोखरच जि. प. शाळेतील चित्र बदलतेय .आज काही पालक आपल्या पाल्याला जि. प.शाळेत हट्टाने प्रवेश घेताना दिसत आहेत. जत तालुका तसा बारा महिने आठरा काळ दुष्काळी . पण इथला शिक्षणातील दुष्काळ हटला आहे असं म्हणावं लागेल. उमदी जवळील कोडगवस्ती शाळा अशीच आहे. ज्या शाळेत पुढीलवर्षीचे प्रवेश यावर्षी निश्चित झालेले असतात. सांगली जिल्ह्यातील स्वतःची स्कुलबस असलेली एकमेव शाळा आहे. जत शहरातील जि.प. शाळा नं 1ची आणि पांडोझरी येथील बाबरवस्ती शाळा ISO मानांकन प्राप्त आहेत. सांगली जिल्ह्यातील विकासनागर ता .मिरज ही शाळा जिल्ह्यातील पहिली ISO मानांकित झाली.त्या पाठोपाठ तासगाव तालुक्यातील तुरची शाळा देखील ISO झाली. आणि आता प्रत्येक जी.प.च्या शाळांना वाटतंय की शाळा,ISO झाली पाहिजे. देवनाळ शाळा 2010 साली सांगली जिल्ह्यातील जि. प.ची पहिली सेमी इंग्लिश शाळा झाली. तेव्हापासून प्रत्येक केंद्रात किमान एक शाळा सेमी इंग्लिश झाल्या. जि. प. शाळेतील मुलं इंग्लिश मधून गणित विज्ञान शिकू लागली. बाबळेवाडी ता-शिरूर ,जि. पुणे येथील शाळा आंतरराष्ट्रीय लेवलवर तिसऱ्या क्रमांकावर आहे.घोलेश्वर , कुलाळवाडी सारख्या शाळा केवळ क्रीडा क्षेत्रातच नाही तर पाणी फाउंडेशन सारख्या कामात उल्लेखनीय कामगिरीवर आहेत. निगडी खुर्द सारखी शाळा शालेय क्रीडा स्पर्धा मध्ये जिल्ह्यात नाव कमवते आणि मुख्यमंत्री चषक स्पर्धेत विजेती ठरते. पांढरेवाडी शाळेच्या विद्यार्थिनी विभागीय स्तरावर खो खो खेळल्या. कंठी शाळा या वर्षी विभाग स्तरावर विद्यार्थी खेळले . काराजनगी शाळा गेली सहा सात वर्षे स्काऊट मध्ये आपला ठसा उमटवून आहे. राष्ट्रपती पुरस्कारा पर्यंत विद्यार्थी पोहोचले. एकटी शाळा जत तालुक्याचं प्रतिनिधित्व करूनदेखील जिल्ह्याचं चॅम्पियनशीप जतला खेचून आणते.
बोरगाव( ता-तासगाव,जि.-सांगली) येथील जिल्हा परिषदेची शाळा उत्तम कामगिरी करून दाखवते. चालू वर्षी 2018-19 मध्ये पचवीतील 22आणि आठवीतील 5 विद्यार्थी स्कॉलरशिप मध्ये गुणवत्ता यादीत आले. केवळ पुस्तकी ज्ञानच इथे न देता इतर उपक्रम घेऊन जीवन कौशल्ये दिली जातात. शेतकऱ्यांची मजुरांची मुलं अस्खलित इंग्लिश संवाद साधतात. शैक्षणिक उठवातून पालकांनी जवळपास दहा लाखाचे शैक्षणिक साहित्य शाळेला दिले .
हा दाखला आहे पालकांच्या विश्वासाचा आणि शिक्षकांना मनाप्रमाणे काम करू दिल्याचा . मला जाणीव आहे सर्वच शाळा अशी विशेष कामगिरी करू शकत नाहीत , पण शिक्षक, पालक ,विद्यार्थी आणि समाज एकत्र आले की बहुतांशी शक्य आहे.
माझा पाल्य जि. प.शाळेत शिकतो ,याचा अभिमान केव्हा वाटतो ? जेव्हा बालक पालकांच्या अपेक्षेप्रमाणे शिकते तेव्हा. बालकाचा सर्वांगीण विकास व्हावा असा सर्व पालकांचा अट्टाहास असणे गैर नाही,परंतु तसे घडत नसेल तर आपले बालक किमान साक्षर व्हावे ही माफक अपेक्षा असते. जेव्हा बालक साक्षरतेची पायरी ओलांडून इतर कौशल्ये आत्मसात करतो तेव्हा पालक स्वतः अभिमानाने सांगतात की माझा पाल्य जि.प.शाळेत शिकतो.
आज महाराष्ट्रातील बहुतेक शाळा हायटेक बनत आहेत. आज शाळेत शिकवणारा शिक्षक ,खडू फळा ऐवजी स्क्रीन व माउस घेऊन शिकवू लागला आहे. चार भिंतीच्या आत जिवंत अनूभव देऊ लागले आहेत. दीक्षा ऍप, बायजूस, युट्युब , गुगल आणि स्मार्ट TV द्वारे विद्यार्थी अपडेट शिक्षण घेत आहेत. धडेच्या धडे डिजिटल स्वरूपात स्क्रीनवर आले आहेत. कविता संगीतमय झाल्या आहेत.संपूर्ण पुस्तक स्क्रीनवर दिसू लागलंय. आज कमीत कमी वेळेत मुलं शिकताना दिसतात. महाराष्ट्रातील , बहुतेक शाळा भविष्यात डिजीटल होतील .ग्रामीण भागातील शाळा डिजिटल झाल्यामुळे गुणवत्तेत चांगली वाढ झालेली दिसून येत आहे. तसेच ग्रामीण भागातील पालकांचा शाळेच्या प्रगतीमध्ये सहभाग वाढू लागला आहे , कारण पालकांचा विश्वास वाढला आहे. मग वरील प्रश्नाचं उत्तर आपोआप मिळतं, का शिकतात आमची मुलं जिल्हा परिषद शाळेत ? याचं........
🙏 🙏🙏🙏🙏
इतर आणखी काही लेख वाचण्यासाठी माझ्या
bhausahebmahanor.blogspot.com
ला भेट द्या. / ब्लॉगला फॉलो करा ./ subscribe करा .
🙏🙏🙏🙏🙏
🙏🙏share करण्या साठी निळ्या रंगामधील whatsapp किंवा facebook वर टच करा.🙏🙏
Keep it up .....👍👍👍👍👍👍
ReplyDeleteFantastic
ReplyDelete👍👌💐
👍👍👍🙏🙏🙏
ReplyDeleteSir best artical👌👍
ReplyDeleteमाझी शाळा जिल्हा परिषद शाळा
DeleteNice artical thanks sir
ReplyDeleteBest keep it up
ReplyDeleteखूपच प्रशंसनीय ........सर यात Youth4jath पूर्ण सहभाग देईल ......
ReplyDeleteरेपाळ साहेब आवश्य मी आपली भेट घेईन
DeleteMust ahe ki ❤
ReplyDeleteअगदी शब्द न् शब्द बरोबर......पण अजूनही शिक्षकांचा आपल्या स्वत:वरचाच विश्वास वाढायला हवा..काही अपरिहार्य अपवाद वगळता इतर सर्व शिक्षकांनी आपली मुलं शासनाने सक्ती केली म्हणून नव्हे तर , आपणहून स्वेच्छेने मराठी शाळेत घातली तर, मराठी शाळेतील शिक्षकांवरील समाजाचा विश्वास द्विगुणीत होईल...व मग खाजगी शाळांकडील लोकांचा ओढा आपोआप कमी होईल...व मग शासनाला मराठी शाळेतील शिक्षकांबाबत अधिक चांगले निर्णय घेतल्याशिवाय गत्यंतर नसेल.....
ReplyDeleteThnx ,sir ...
Delete