माझे इतर लेख वाचण्यासाठी ब्लॉगच्या होम पेज वर कॅटेगरी (catagory ) वरील ऑप्शनला जा आणि आपल्या आवडीचा ब्लॉग वाचा. आवडलेला ब्लॉग आपल्या मित्रांना ,सहकाऱ्यांना whatsapp, facebook द्वारे शेअर करा. किंवा पेजची लिंक तुमच्या whatsapp ग्रुपला share करा.धन्यवाद.....!

Tuesday, March 08, 2022

जागतिक महिला दिन आणि जि.प.शाळा.




आई हा  मुलाचा प्रथम गुरु.   मुलाचे व्यक्तिमत्व घडण्यात आईचा महत्त्वाचा आणि मोलाचा वाटा असतो.  गावात समाजात जवळजवळ 50 टक्के स्त्रिया असतात . या शक्तीचा  शिक्षण क्षेत्रात आणि निर्णय  प्रक्रियेत उपयोग करून घ्यायला हवा.   त्यामुळे तरी मुलींच्या शिक्षणातील खऱ्या अडचणी समोर येतील. यासाठी स्त्रियांना, महिलांना, मातांना  शाळेपर्यंत आणणे महत्त्वाचे वाटले."एक पुरुष एक व्यक्ती , तर एक आई एक कुटुंब"  शिक्षणाचे काम स्वतःचे काम आहे म्हणून प्रत्येकाने ते  स्वतःच पूर्ण करायचे; मात्र प्रयत्न सर्वांनी करायचे  असतात. 

समाजात लोकसंख्येने निम्म्या असलेल्या स्त्रियांच्या प्रश्नांचा विचार करतानाही महिलांच्या समस्यांबद्दल सगळ्या गोष्टी विचारात घ्याव्या लागतात. स्त्रियांच्या जगण्यापुढील प्रश्नांकडे बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोनही याच पार्श्वभूमीवर तपासावा लागतो आणि त्यामध्ये काय बदल करायला हवेत याचे आत्मपरीक्षण करण्याची आवश्यकता निर्माण होते. आजच्या काळात स्त्रीच्या जगण्यापुढील जे प्रश्न आहेत ते केवळ स्त्रियांचे वाटत असले तरी एकूण समाजाच्या जगण्यावर त्याचे बरेवाईट परिणाम होत असतात. समाजातील अर्धा भाग अडाणी, अशिक्षित असून चालणार नाही.  मुलाचा पहिला गुरु आई  असेल तर मुलांच्या शिक्षणात  आईचा सहभाग फार महत्त्वाचा असतो. मूलांच्या  शिक्षण विषयी महत्व आईला पटले आणि आईचे शिक्षण विषयक  उद्बोधन झाले तर  कोणतीही माता आपल्या मुलाला शिक्षणापासून वंचित ठेवणार नाही.  स्त्रिया शिक्षित झाल्या पाहिजेत . स्त्रिया निर्णय प्रक्रियेत देखील सहभागी झाल्या पाहिजेत.  समाजाचा स्त्रियांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलावा.  मुलींच्या शिक्षणाबाबत जागृती निर्माण व्हावी यासाठी महिलांचे शिक्षणाबद्दल प्रबोधन होणे अत्यंत गरजेचे आहे.  याचाच भाग म्हणून प्रत्येक जि.प. शाळेमध्ये महिलादिन साजरा झाला पाहिजे. 

आज एकविसावे शतक.  आधुनिकीकरण,औद्योगीकरण , शिक्षण विकास, संगणक क्षेत्र , वाहतुकीची साधने, शिक्षण सुविधा, साक्षर समाज  इत्यादी गोष्टी उपलब्ध असून  सुद्धा समाजात स्त्री शिक्षणाची हेळसांड अजूनही होत आहे. आजही स्त्री शिक्षणाची आणि मुलींच्या शिक्षणाची  प्रगती म्हणावी तितकी  होताना दिसत नाही. अजूनही  स्त्रियांवरील अत्याचार वाढत  आहेत. यासाठी महिलांमध्ये जागृती झाली पाहिजे. 

                 दिनांक 8 मार्च 1908 सली अमेरिकेतील न्यूयॉर्कमध्ये महिलांनी  निदर्शने  केली.  दिनांक 8 मार्च 1960 मध्ये न्यूयॉर्क मधील मजूर महिलांनी आपल्या कामाचे  दहा तासामधील दोन तास कमी करून आठ तास केले . 1910 साले कोपनहेगन येथे देशातील महिला प्रतिनिधींची परिषद तयार झाली.  8 मार्च 2014 मध्ये जर्मनीतील महिलांनी युद्धखोरी केली. 8 मार्च 1917 रोजी रशिया मधील कापड कामगार महिलांनी आपल्या हक्कासाठी निदर्शने केली.  जगभरात  8 मार्च हा  दिवस "आंतरराष्ट्रीय महिला दिन" म्हणून साजरा करण्यात येत आहे.  1975 साली युनोमध्ये महिला वर्ष साजरे करण्यात आले.  तेव्हापासून 8 मार्च भारतामध्ये देखील महिला दिन म्हणून साजरा केला जातो.

1975 ते 1985 दरम्यान स्त्री शिक्षणाचे दशक सर्वत्र जगभर पाळले गेले.  1995 मध्ये नैरोबी येथे युनोने आंतरराष्ट्रीय महिला परिषद घेतली.  1990 साली भारतामध्ये स्त्री हक्क आयोग स्थापन करून स्त्रीवरील अत्याचार दूर  करण्याचा पाया घातला. 1993 मध्ये महाराष्ट्र राज्य महिला आयोग स्थापन करण्यात आला. 1994 मध्ये महाराष्ट्रामध्ये महिला धोरण तयार केले आणि 30 टक्के आरक्षण हे स्त्रियां च्या स्थानिक पातळी वर देण्यात आले.  यामध्ये शिक्षण,  राजकीय , नोकरी  या स्वतंत्र  विभागामध्ये आरक्षण लागू केले. 

या कायद्यामध्ये देखील 30 टक्के आरक्षण महिलांना देण्यात आले. हे आरक्षण वास्तविक 50 टक्के असायला हवे. किंबहुना आरक्षण न मानता  खुले प्रवेश शिक्षणात,राजकारण आणि नोकरीत असायला हवे. हिंदू वारसा हक्क 1956 मध्ये सुधारणा करून वडिलांच्या संपत्तीत पुरुषाबरोबर मालमत्तेचे देखील समान अधिकार देण्याचा कायदा भारत सरकारने केला.  महाराष्ट्र शासनाने 1994 मध्ये कायदा  केला.   2002 मध्ये महाराष्ट्र शासनाने बालकाच्या शाळेच्या दाखल्यावर वडिलांबरोबर आईचे नाव लावण्याची  सक्ती केली.                   इतके कायदे करुनही अजूनही स्त्रीयांच्या बाबतीत म्हणावा तितका विकास झालेला आज ही दिसत नाही.  म्हणून शाळेच्या माध्यमातून समाज व शाळा यांना एकत्र जोडण्याचे काम आपण सर्वांनी केले पाहिजे.  पुरुष पालक  हे करतात त्यापेक्षाही जास्त माता-पालक हे काम चांगलं करू शकतात असे निरीक्षण आहे. 

महिला शिकल्यामुळे काय होईल ? 

 मुला-मुलींच्या विकासात आईचा सहभाग महत्त्वाचा असतो महिला शिकल्यामुळे त्यांना कळेल. हे त्यांना पटेल.  महिलांना शिक्षणाचे महत्व पटवून देता येईल.  महिलांना म्हणजे माता पालकांना आपल्या बालकाचा योग्य आहार या विषयी माहिती देता येईल.  महिलांना श्रम संस्काराचे महत्त्व पटवून देता येईल. महिलांना वैयक्तिक आणि सार्वजनिक स्वच्छता कशी राखावी याबद्दल जाणीव जागृती करून देता येईल.  महिलांना विविध कायदे विषयाची जाणीव आणि माहिती करून देता येईल.  महिलांना मुलींच्या शिक्षण विषयक शासनाची आणि विविध योजनांची अधिक माहिती देता येईल.  विद्यार्थी शिक्षण गुणवत्ता , उपस्थिती आणि विद्यार्थ्यांचा विकास याबद्दल सामुहिक आणि सांघिक प्रयत्न करणे आवश्यक आहे.  याचीही माहिती देता येईल. त्याचबरोबर विविध उपक्रमांची माहिती  माता पालकांना देता येईल.  

कुटुंबाच्या ,समाजाच्या, गावाच्या ,राष्ट्राच्या ,देशाच्या, प्रगतीमध्ये व्यक्तिमत्व विकासाला संधी उपलब्ध करून देण्यासाठी स्त्री शिक्षण गरजेचे आहे . शिक्षण हा व्यक्ती विकासामध्ये अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. त्यामुळे गावातील सर्व व्यक्तीने प्रत्येक व्यक्तीला शिक्षण मिळावे यासाठी आग्रही भूमिका घेऊन पुढाकार घेतला पाहिजे.  गावातील शिक्षणाला सुविधांना प्राधान्य मिळावे व शिक्षण प्रक्रियेत चालना मिळावी. 

अशा कार्यक्रमातून काय साध्य होईल? 

(1) विद्यार्थ्यांच्या मुलांच्या अभ्यासाकडे महिलांना लक्ष देता येईल . 

(2) अभ्यासपूरक उपक्रमांना शाळेला मदत करता येईल. 

(3) कमकुवत विद्यार्थ्यांना योग्य त्या उपाय योजना सुचवता येतील.  

(4) सहशालेय उपक्रमात मान्यता देता येईल.

(5) उपक्रमांची अंमलबजावणी कायआणि कशी झाली पाहिजे याची पाहणी करता येईल. 

 (6) महिलांच्या जबाबदाऱ्या  आणि मुलांच्या प्रगती ची माहिती  माता पालक घेतील. 


भारतातील पार्श्वभूमी

     भारतात मुंबई येथे  पहिला ८ मार्च हा दिवस १९४३ साली साजरा झाला. १९७१ सालच्या ८ मार्चला पुण्यात एक मोठा मोर्चा काढण्यात आला होता. पुढे १९७५ हे वर्ष युनोने जागतिक महिला वर्षे म्हणून जाहीर केले. त्यानंतर स्रियांच्या समस्या ठळकपणे समाजासमोर येत गेल्या व स्री संघटनांना बळकटी आली. बदलत्या सामाजिक, राजकीय परिस्थीनुसार काही प्रश्नांचे स्वरूप बदलत गेले तशा स्त्री संघटनांच्या मागण्याही बदलत गेल्या. आता बँका कार्यालयांमधूनही ८ मार्च साजरा व्हायला लागला आहे. आजच्या काळात जागतिक महिला दिन सर्वत्र साजरा करताना दिसून येतो.

     १९७५ या जागतिक महिला वर्षाच्या निमित्ताने संयुक्त राष्ट्र संघटनेने आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा करण्याचे ठरविले. १९७७ साली संयुक्त राष्ट्र संघटनेच्या समितीने विविध सदस्यांना आमंत्रित करून ८ मार्च हा दिवस आंतरराष्ट्रीय स्तरावर  महिलांचे अधिकार आणी जागतिक शांतता या हेतूने साजरा करवा यासाठी आवाहन केले.




आंतरराष्ट्रीय महिला दिवस व इतर देश

बहुतांश देशात आंतरराष्ट्रीय महिला दिवस उत्साहात साजरा केला जातो,तर काहि देशांत जसे बल्गेरिया व रोमनिया येथे हा दिवस मातृदिन म्हणून देखील साजरा केला जातो. या दिवशी मुले आपली आई व आजी यांना भेटवस्तु देतात.

     अशा प्रकारे आपण आंतरराष्ट्रीय महिला दिवस / जागतिक महिला दिन का साजरा केला जातो त्या मागचा इतिहास पाहिला व आज प्रत्येक क्षेत्रात  महिला पुरूषांच्या बरोबरींने किंबहुना त्याही पेक्षा उत्तम प्रकारची कामगिरी करतांना आपण पाहत आहोत.

जागतिक महिला दिवस का साजरा केला जातो/आंतरराष्ट्रीय महिला दिन 

 ८ मार्च हा दिवस आपल्या बरोबरच संपूर्ण जगभरात जागतिक महिला दिन / आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून साजरा केला जातो. पण आपण आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा करतो त्यामागचे नेमके कारण काय हे अजूनही आपल्या पैकी अनेकांना माहिती नसेल. आंतरराष्ट्रीय महिला दिवस साजरा करण्याचे कारण असे की, महिलांनी स्वतःच्या हक्कासाठी दिलेल्या लढयाच्या स्मरणार्थ दरवर्षी, ८ मार्च हा दिवस जागतीक महिला दिन म्हणून साजरा केला जातो.

 दिंनाक २८ फेब्रुवारी १९०९ रोजी, न्युयॉर्क येथे पहिल्यांदा जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला असला तरीही, सन १९१० च्या आंतरराष्ट्रीय महिला परिषदेत मांडलेल्या सुचनेनुसार, ८ मार्च  हा दिवस आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून    निश्चित करण्यात आला. 









No comments:

Post a Comment