माझे इतर लेख वाचण्यासाठी ब्लॉगच्या होम पेज वर कॅटेगरी (catagory ) वरील ऑप्शनला जा आणि आपल्या आवडीचा ब्लॉग वाचा. आवडलेला ब्लॉग आपल्या मित्रांना ,सहकाऱ्यांना whatsapp, facebook द्वारे शेअर करा. किंवा पेजची लिंक तुमच्या whatsapp ग्रुपला share करा.धन्यवाद.....!

Tuesday, January 18, 2022

आमचं गाव आमची परंपरा - वळसंग (Valasang)



वळसंग  प्रशासकीय

वळसंग हे गाव महाराष्ट्र राज्यातील पश्चिम महाराष्ट्र प्रदेशात येते. सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यात , तालुक्याच्या ठिकाणापासून पासून पूर्वेला दहा किलोमीटर अंतरावर  वळसंग हे गाव आहे .वळसंग गावात रेल्वे मार्ग ,  राष्ट्रीय महामार्ग यापैकी काही नाही ; मात्र वळसंग हे गाव राज्य मार्गावर आहे. कोरोना पूर्वी   वळसंग गावात दैनिक बाजार किंवा आठवडा बाजार भरत नव्हता. कोरोना लॉकडाऊन नंतर गावकऱ्यांनी गावाची गरज ओळखून आठवडा बाजाराची सुरुवात केली आहे.  शिवाय गावात कोणतीही राष्ट्रीयकृत बँक नाही .  पोस्टात पैशाचे व्यवहार होतात. बरेच जण आता पैशाच्या व्यवहारासाठी ऑनलाइन ट्रान्झॅक्शन चा वापर केल्याचे दिसून येते.  वळसंग गावात  जिल्हा परिषदेची एक प्राथमिक  शाळा  1ली ते 7 वी पर्यंत  असून  स्थानिक संस्थेचे एक हायस्कूल  5 वी ते 10 वी पर्यंत  आहे . सन 2011 च्या जनगणनेनुसार वळसंग गावात जवळपास 625 कुटुंबियासह तीन  हजार  पेक्षा  जास्त लोकसंख्या आहे.  गावाला जाण्याची रेल्वेची सोय नाही परंतु महाराष्ट्र राज्य  परिवहन महामंडळाच्या बसेसची सोय आहे.
         
वळसंग  भौगोलिक
   वळसंग  हे  गाव डोण नदीच्या दक्षिण बाजूला  दोन  किमी अंतरावर  कठीण भागावर वसलेले आहे. डोण नदीचा प्रदेश काळ्या मातीचा असल्याने या परिसरात लोकवस्ती नाही. गावात बहुत करून हिंदू आणि मुस्लिम  धर्माचे लोक राहतात. जास्तीतजास्त कुटुंब शेतकरी असून पशुपालन ,आणि छोटे व्यवसाय करतात. गावात  शिक्षणाची सोय झाल्यामुळे जास्तीतजास्त  कुटुंबातील तरुण शिक्षण घेत आहेत.  या शिक्षणामुळे  दोनशेच्या आसपास सैनिक आहेत बरेच शिक्षक आहेत . इतर युवक शिकून पुणे,  कोल्हापूर  मुंबई ,सातारा बेंगलोर , कोल्हापूर अशा ठिकाणी आयटी क्षेत्रात व इतर क्षेत्रांमध्ये काम करतात.  तसेच नोकरदारांची  संख्या   पन्नास टक्क्यापेक्षा अधिक आहे.  डॉक्टर, इंजिनिअर, पोलिस निरीक्षक, प्राध्यापक, शिक्षक यांची  ही संख्या देखील भरपूर आहे. यामुळे प्रत्येक कुटुंबाचे उत्पन्न भरपूर आहे. गावात पवनचक्क्या वाढत आहेत. या पवनचक्क्यांमुळे ग्रामपंचायतीला वार्षिक २५ लाखांचा स्थानिक ग्रामपंचायत कर मिळत आहे. 
वळसंग  सांस्कृतिक

                     गावात प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. गावामध्ये ब्राह्मदेव  मंदिर , केंचराया मंदिर ,हनुमान मंदिर इत्यादी मंदिरे आहेत. गावाच्या पूर्वेला कोळगीरी रस्त्यावर पिराचे टेक आहे. वळसंग गावाच्या पूर्वेला कोळीगीरी , दरिकोणूर ,सोरडी ही  गावे आहेत;  तर दक्षिणेला शेड्याळ, सालीकिरी,  मुचंडी ही गावे आहेत. पश्चिमेला जत असून उत्तरेला काराजनगी हे गाव आहे.वळसंग वरून पुढे गुड्डापुर या तीर्थक्षेत्राला जाता येते तसेच सोरडीच्या श्री सोमगिरी ,समाधगिरी महाराज व दत्त मठाला जाता येते. वळसंग च्या पूर्वेला तीन किमी अंतरावर संगतीर्थ नावाचे धानम्मा देवी आणि श्री सोमनाथ यांच्या विवाहाचे ठिकाण अर्थात संगतीर्थ हे प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे. 
                      अलीकडील काळात शेतकऱ्यांनी  पाण्याची व्यवस्था करून शेतीत नवनवे प्रयोग करुन  वळसंग गावचे उत्पन्न वाढवले आहे; त्यामुळे  वळसंग हे आर्थिकदृष्ट्या अतिशय संपन्न गाव झाले आहे.
            
वळसंग  शब्द उत्पत्ती
  जत-सोलापूर मार्गावरील वळसंग या गाव हे  सात वाडया-वस्त्या मिळून या गावाची निर्मिती झाली .असा एक मत प्रवाह आहे. कन्नडमध्ये ‘एळू’ म्हणजे सात. वळसंगच्या बाजूने सात विभाग आहेत . सात गावांचा /  वस्त्यांचा  समूह म्हणून  एळू संग , त्यावरून वळसंग हे नाव पडले असावे. पूर्वी वळसंगला केवळ संग (संघ) म्हणून ओळखत असावे.  कारण संग , संघ, मेळा,यात्रा, एकत्र येण्याचे ठिकाण असा  अर्थ  काहीजण सांगतात.   दुसरा अर्थ असा की कन्नडमध्ये ‘वळ्ळे’ याचा अर्थ प्रबळ , चांगले. 
 " वळळे संघ" वळळे लोकांचा समूह म्हणून वळसंग हे नाव रूढ झाल्याचेही बोलले जाते. " वळ्ळ  जनरद संघ "   म्हणजे चांगल्या लोकांचा समूह होय. " त्यानंतर वळ्ळ जन संघ"  अपभ्रंश होऊन आज वळसंग हे नाव प्रचलित आहे.
जोगसिद्ध यांच्या पुढाकाराने या गावाची स्थापना झाल्याचे सांगितले जाते. धनगर समाजाची जी कवने(ओव्या) गायल्या जातात , त्यांना " जनपद हाडा " म्हणतात.  त्यामध्ये गावासह देवांचा बराच इतिहास समोर येतो. वळसंगचे ग्रामदैवत केंचराया. हा देव कर्नाटकातील अफजलपूर तालुक्यातील बळगाणवूर या गावातून वळसंग या गावी आल्याचा उल्लेख आहे. विष्णू अवतारी केशव नारायण म्हणजे केंचराया होय. धनगर समाजातील भोळ्या भक्तांचा हा देव. राया म्हणजे देव.
केशव आणि  राया  यावरून  अपभ्रंश होऊन नंतर त्याचे केंचराया असे झाले असावे. मिळालेल्या माहितीनुसार केंचराय व जटिंगराय यांची रोगी या गावी भेट झाली. त्यांचे तेथे सैतानाबरोबर युध्द झाले. या युध्दात केंचराय जिंकले. तेथून ते कवलगी, आसंगी, कलमडी, जतमार्गे सांचीकरी म्हणजेच सध्याच्या सालेकिरी या गावात आले. या गावात बारा वर्षे राहिल्यानंतर ते वळसंगला स्थायिक झाले. ते ज्या ज्या गावातून आले, त्यातील बऱ्याच गावात आजही केंचराया देवाची मंदिरे आहेत.
वळसंग  आजची स्थिती
विशेष परंपरा
आजच्या घडीला "केंचराय" हे वळसंगचे ग्रामदैवत. धनगर समाजाचा हा देव. त्यामुळे धनगर हेच त्याचे पुजारी. मंदिरात देवाची मूर्ती गादी​वर बसवतात. देव गादीवर बसतो, मग आपण गादी कसे वापरणार? अशा भावनेने वळसंगमध्ये एकाही घरात  गादी वापरत नाहीत. गादी ऐवजी वाकळ, जान (जेन / जीन)  किंवा इतर अंथरून वापरले जाते. लग्नात भेट म्हणून कॉट-गादी देण्याची अथवा घेण्याची प्रथा सर्वत्र आहे.मात्र या गावात  कॉटसोबत गादी दिली जात नाही, अथवा मुलीकडून ती लग्नात घेतली जात नाही. बाळाच्या जन्मानंतर माहेरी पाठवताना अथवा सासरी जाताना पाळणा देण्याची या भागात प्रथा आहे. मात्र वळसंगमध्ये ना पाळणा दिला जातो ना घेतला जातो. शिवाय देवाला वेलवेटचे कापड वापरले जात असल्याने गावात कोणीही वेलवेटचे कपडे वापरत नाहीत.आता अलीकडे काहीजण हवेची गादी वापरतात. पण कापसाची गादी कोणीही वापरत नाहीत. 
       पूर्वी या गावात रॉकेलचा  देखील  वापर केला जात नव्हता; पण  हळूहळू त्याचा वापर सुरू झाला. गावात व मंदिरात फक्त गवतापासून तयार केलेल्या झाडूचाच वापर केला जात होता. आता घराघरात त्या ऐवजी  बाजारात मिळणाऱ्या झाडूचा वापर सुरू झाला असला तरी देवळात मात्र आजही फक्त गवताच्या  आणि लोकल पुजाऱ्यानी तयार केलेल्या झाडूचाच उपयोग केला जात आहे. बऱ्याच वर्षांपासून केंचरायाचे शिखर नसलेले मंदिर होते. त्याची उंची कमी होती. मंदिरापेक्षा घराची उंची कमी असावी असा गावात समज आहे, त्यामुळे गावात दुमजली घरे नाहीत. एका कंत्राटदाराने काही वर्षांपूर्वी गावात दुमजली घर बांधले; पण वास्तुशांती होण्यापूर्वीच अपघातात त्याचा मृत्यू झाला. हा योगायोग असला, तरी  दुमजली घर बांधण्याचे धाडस त्यानंतर आजपर्यंत  झाले नाही. आता जुने मंदिर पाडून तेथे नवीन बांधण्याचे काम सुरू आहे. त्याला शिखर बांधण्यात येणार असल्यामुळे मंदिराची उंची वाढणार आहे. गावातील लोकांमध्ये  ‘गादी'  न वापरण्याची प्रथा पहिल्यापासून सुरू आहे. पण  ही प्रथा केव्हापासून सुरू झाली? कुणी सुरू केली हे निश्चित सांगता येत नाही.  जुन्या मंदीराला शिखर नव्हते. आता ते पाडून शिखर असलेले नवीन मंदिर बांधण्यात येत आहे. त्यामुळे मंदिराची उंची वाढणार आहे. शिखर बांधल्यांनंतर दुमजली घर बांधायला हरकत नाही, असे बुजुर्ग सांगत होते; पण आता तो ज्याचा त्याचा प्रश्न आहे. अंधश्रद्धेपेक्षा लोकांची श्रद्धा असल्याने या प्रथेत कोणी चटकन बदल करतील असे वाटत नाही.’

गावातील केंचराय मंदिराजवळ वीरभद्राचे मंदी​र आहे, मात्र केंचराय मंदिरात पूजा करताना होणारा घंटीचा आवाज वीरभद्र मंदिरात ऐकू येत नाही. या दोन मंदिरांत फक्त दोनशे सव्वादोनशे फूट  अंतर आहे.   केंचरायानेआपला त्रास  देवाला होणार नाही, याची खात्री दिल्यानंतर वीरभद्र देवाने  केंचरायाला तेथे जागा दिली, अशी अख्यायिका आहे, त्यामुळे सव्वा दोनशे फूट अंतरावर  घंटीचा आवाज येत नाही, मात्र दुसरीकडे एक-दीड किलो मीटर वर  आवाज घुमतो.


विशेष म्हणजे केंचराय मंदिरातील गाभाऱ्यात आजही गावातील महिलांना प्रवेश नाही; पण अन्य गावातील महिला मंदिरात जाऊ शकतात. तसेच गावातील मुलगी कोणत्याही समाजातील असो, तिच्या मुलामुलींच्या जावळाचा कार्यक्रम या ब्राह्मदेव मंदिरात देवासमोरच केला जातो. त्यामुळे दिवाळीच्या दिवशी जावळ कार्यक्रमांची रेलचेल असते. ही परंपराही कित्येक वर्षांपासून सुरू आहे.
‘दिवाळीच्या दिवशी केंचराय देव गावापासून सत्तर कि.मी. अंतरावरील कृष्णा नदीला आंघोळीला जातो. त्यासाठी पालखीचा वापर केला जातो. तीन दिवसांत पायी जाऊन परत यायची अट आहे. सोबत दीडशेच्या आसपास भाविक असतात. त्यामध्ये तरुणांचा भरणा मोठा असतो. देव परत आल्यानंतर दिवाळी पाडव्या दिवशी केंचराय , ब्रह्मदेव व जोगसिद्ध यांची पालखी भेट होते. या दिवशी गावाची जत्रा भरते. गावाची एक अनोखी परंपरा आपल्याला पाहायला मिळते. दिवाळीच्या सणामध्ये वसुबारस पासून यमद्वितीया पर्यंत म्हणजे भाऊबीज पर्यंत दिवाळीचा सण सर्वत्र साजरा केला जातो. परंतु दिवाळीच्या दरम्यान गावात आलेला पाहुणा देवाच्या पालख्यांची भेट झाल्याशिवाय परत माघारी जाऊ शकत नाही.  हा एक रिवाज कटाक्षाने पाळला जातो. त्याच बरोबर " देव गादीवर बसत नाही त्यामुळे आपण ही गादीवर बसायचं नाही" हा रिवाज देखील गावात कटाक्षाने पाळला जातो . तसेच देवाच्या मंदिरा पेक्षा आपलं घर उंच असू नये अशीही लोकांची श्रद्धा आहे आणि तीही आजपर्यंत तंतोतंत पाळली जात आहे. आज अनेक लोकांना उंच आणि दुमजली घर बांधण्याची इच्छा आहे. त्यामुळे प्रथम देवाच्या मंदिराचा कळस उंच न्यायचा.  यामुळे देवाच्या मंदिराचे बांधकाम चालू आहे 


गावात गादी व घराची प्रथा पाळली जात असली, तरी गाव सोडून इतरत्र स्थायिक झालेल्या वळसंगकरांनी जगाबरोबर राहण्यात धन्यता मानली आहे. गावी आल्यानंतर मात्र ते ही परंपरा जपतात.वळसंग गावातील सर्व जातीचे लोक ब्राम्हदेवाच्या मंदिरात जावळ काढण्याचा कार्यक्रम करतात. बाहेरगावी जाऊन राहिलेले लोक मूळ गावी येऊन जावळ काढून पुन्हा माघारी जातात. 

सांगली जिल्ह्यातील वळसंग गावात ‘देवापेक्षा आपण श्रेष्ठ नाही’, ही भावना दाखवण्यासाठी आगळी वेगळी परंपरा पाळली जातेे. देव गादीवर बसतो, मग आपण त्याचा वापर करायचा का? मंदिराची उंची कमी आहे, मग आपले घर त्यापेक्षा उंच नको... या भावनेने गेल्या अनेक वर्षांपासून ग्रामस्थ ना गादी वापरतात ना गावात दुमजली​ घर बांधतात!
हा एक मत प्रवाह असला तरी सत्य आहे . 
 वळसंग गावाच्या पूर्वेला पिराचे टेक आहे .आदिलशहाच्या काळात म्हणे  वळसंग मधील लोक आणि परकीय आक्रमण यांच्यात घनघोर युद्ध झाले . त्यांनी गावातील मंदिरे उध्वस्त केली . वळसंगच्या धनगर तसेच जाधव आणि सूर्यवंशी यांचा केंचराया आणि ब्रह्मदेव ही मंदिरे  उघडे पडले, मंदिराचे शिखर तोडले . हे युद्ध बरेच दिवस चालू होते. शेवटी आदिलशहाच्या सैन्यांनी माघार घ्यायचे ठरवले.आणि मार्ग चुकवून आक्रमण चालू ठेवले . देऊळ  उध्वस्त झालेले , देव उघडे पडलेले. इमानी सरदार , पहारेदार यांनी मग पण केला , देव गादीवर चढल्याशिवाय आम्ही गादीवर बसणार नाही, मंदिर पूर्ण झाल्याशिवाय चांगले घर बांधणार नाही . त्यामुळे आजही ही परंपरा कटाक्षाने पाळली जाते. असे तोंडी सांगितले जाते. 

आणखी एक माहिती पुढे येते , ती म्हणजे वळसंग ही बिज्जल राजाची राजधानी होती . असे सांगतात. वळसंग गावाच्या दक्षिणेला एक ओढा  पश्चिमकडून पूर्वेकडे वाहत जातो. ओढ्याच्या दक्षिणेला एक भव्य वाढा होता. गावात ब्राह्मदेव  मड्डीसिद्ध मंदिरासमोर एक सिंधू संस्कृतीला साम्य असणारी बांधीव विहीर होती .पण ती आता गावकऱ्यांनी बुजवून टाकली .गावात केंचराया मंदिरासमोर देखील सिंधू संस्कृतीला साम्य दाखवणारी  विहीर अजूनही ग्रामपंचायतच्या ताब्यात आहे. गावाच्या दक्षिणेला ज्या ठिकाणी वाडा होता ,त्या ठिकाणि अजूनही जाती ,वस्तु, भंगलेल्या मूर्ती सापडतात. पण याचे संशोधन पातळीवर पाहणी झाली नाही.शिवाय ते क्षेत्र खाजगी असल्याने त्याची वाच्यता कुठेही झाली नाही . असे समजते. आजही तेथे सापडणाऱ्या अवशेषांचा अभ्यास केल्यानंतर लपलेला इतिहास समोर येईल. 

वळसंग  ऐतिहासिक वारसा

वळसंग म्हणजे जत तालुक्याच्या प्राचीन इतिहासाचा जागर करणारे एक गाव आहे. केंचराया देवाची नगरी असलेल्या वळसंगमध्ये प्राचीन हेमाडपंथी मंदिर, अनेक प्राचीन मुर्ती, शिलालेख, तेलाचा प्राचीन घाणा, गुंफा, शिवकालीन मंदिर अशा वास्तू आढळल्या आहेत. इतिहास संशोधकांसमोर वळसंगने एक आव्हान निर्माण केले आहे.

जतच्या पूर्वेला 10 किलोमीटरवर वळसंग हे गाव आहे. जत निगडी ,काराजनगी, कोळगिरी  व वळसंग या गाावांच्या मध्यभागी काळ्या मातीच्या  प्रदेशात डोण नदी  आहे. आजही आकरा किलोमीटरच्या परिसरात एकही लोकवस्ती नाही. डोण हे तालुक्याचे धान्याचे कोठार आहे. वळसंगच्या बहुतांश शेतकऱ्यांची डोण परिसरात शेती आहेत. शेती व शेतीपुरक व्यवसाय करणाऱ्या वळसंगमध्ये प्राचीन इतिहासाचे अनेक साक्षीदार आहेत.

वळसंगमधील छोट्या छोट्या रहस्यमय व गुढ विहीरी सर्वात अद्भूत आहेत. गावात सात विहीरी होत्या. त्यापैकी केवळ दोनच सुस्थितीत आहेत. गावात एक प्राचीन हेमाडपंथी शिवमंदिर आहे. मूळ मंदिर हेमाडपंथी शैलीतील आहे. त्याचा आदीलशाही काळात जीर्णोध्दार झाला. आज मंदिराची पडझड झाली आहे. पुढील बांधकाम पडले आहे.

मंदिराची खासीयत अशी की, मंदिरासमोर पिंपळ व लिंबाचे झाड एकाच ठिकाणी उगवले आहेत. विशेष म्हणजे माहमुद मुजावर यांचे सर्व कुटुंबिय मंदिराची देखभाल करतात. मंदिराजवळच त्यांचे घर असल्याने मंदिराची देखभाल, स्वच्छता करतात, मंदिर पाहण्यासाठी आलेल्यांना त्याची सर्व माहिती देतात.

जत तालुक्यात अनेक हेमाडपंथी मंदिरे आहेत. त्यामध्ये चालुक्य राजाच्या काळातील शिलालेख आहेत. वळसंगच्या मंदिराचे वैशिष्ट्य असे की, या मंदिरात तीन शिलालेख आहेत. तीन शिलालेखामुळे या मंदिराचे महत्व आणखी वाढले आहे. मात्र या शिलालेखांचा अद्यापही आभ्यास झाला नाही.त्याचे वाचन झाल्यास या मंदिराच्या इतिहासावर प्रकाशझोत पडेल.
मंदिराच्या दर्शनी भागात डाव्या बाजूस एक व उजव्या बाजूस शिलालेख आहे. आत प्रवेश केल्यावर उजवीकडे पश्चिमेला तोंड करून भिंतीत तिसरा शिलालेेेख बसविला आहे. ग्रामस्थांना शिलालेखांचे महत्व नसल्याने त्यावर रंग दिला आहे काहीनी तेल ओतले आहे. शिलालेखांचा बराचसा भाग नष्ट झाला असला तरी आजही ठळक दिसतात. कोळगिरी, उमदी मधील शिलालेखांचे त्यांचे साम्य आहे.

मुख्य गाभाऱ्या चे दगडी बांधकाम, दगडात कोरलेले सुंदर नक्षीदार खांब, नक्षी चौकट, छतावर कोरलेले नक्षीदार दगड, मुख्य गाभाऱ्यात भव्य शिव मंदिरात नंदी, गणपती, तसेच भग्न अवस्थेतील काही मुर्ती आहेत, मुर्ती प्राचीन अतिशय सुबक आहेत. काही मुर्तीची तोडफोड झाली आहे.

प्राचीन तेलघाणा : जत तालुक्यातील ज्या शिलालेखांचे वाचन झाले त्यामध्ये हेमाडीदेव या राजाने मंदिरास दीप लावण्यासाठी बैलगाडी व तेल दिल्याचे उल्लेख आहेत. पूर्वी बैलाच्या सहाय्याने घाण्यावर तेल काढले जात असे त्या गाण्यांचा उल्लेख असला तरी एकाही मंदिराच्या परिसरात घाणा आढळला आहे. वळसंगमध्ये मात्र शिवमंदिराशेजारीच दोन तेलघाणे आहेत. भव्य दगडाच्या शिळे मध्ये  खोलगट भाग तयार करून घाणे बनविले आहेत. त्याचे लोकांना महत्व नसल्या   कारणाने कचरा, लाकूड व काट्यांच्या ढिगाऱ्याखाली एक घाणा पडला आहे. तर दुसऱ्य्या  मध्ये   वाळू भरून ठेवली आहे. शिलालेखांमधील उल्लेखानुसार हे घाणे एक हजार वर्षा  पूर्वी चे आहेत. त्यामुळे ऐतिहासिकदृष्ट्या त्यांचे खूप महत्व आहे.

ग्रामदैवत केंचराया: 
वळसंग गावचे ग्रामदैवत श्री केंचराया देव आहे. सर्व जाती  धर्माचे लोक श्री केंचराया देवाचे भक्त आहेत. देवाचे मूळ स्थान जत शहराजवळ वळसंग रस्त्याच्या कडेला आहे. वळसंग गावामध्ये देवाचे भव्य मंदिर बांधण्यात आले आहे. प्रतिवर्षी मोठी यात्रा भरविली जाते. श्री केंचराया देवाच्या मंदिरापेक्षा गावात कोणाचेही घर उंच असू नये, अशी प्रथा आहे.त्यामुळे या गावात कोठेही मजल्याचे घर नाही. कितीही मोठा श्रीमंत असला तरी गावात माडी बांधण्याचे धाडस करित नाही.

शिवकालीन भवानी मंदिर : वळसंगच्या पूर्वेला सुमारे तीन किलोमीटर अंतरावर  दुर्गम ठिकाणी भवानी मातेचे ऐतिहासिक मंदिर आहे. हे मंदिर शिवकालीन असल्याचे सांगतात. मंदिर एका उंच ठिकाणी, ओढ्याच्या काठावर आहे. बहामनी वास्तू शैलीत त्याचे बांधकाम आहे. मंदिराचा आतील भाग एखाद्या मश्जिदीप्रमाणे आहे. मंदिरात       महिषासूर मर्दिनी अवतारातील अंबामातेची सुंदर व सुबक दगडी मूर्ती आहे. या परिसात अलीकडेच केवळ दोन वस्त्या झाल्या आहेत. जवळपास कुठेही लोकवस्ती नाही. त्यामुळे मंदिराच्या निर्मितीबाबतची अधिक माहिती उपलब्ध नाही.  प्राचीन गुंफा ठिकाणी एक प्राचीन गुंफा आहे. ओढ्याच्या काठी छोट्या डोंगरात प्राचीन गुंफा आहे त्यात एक  सुंदर शिवलिंग आहे. या गुफेत अनेक साधूनी तपस्या केल्याचे सांगण्यात येते.

वळसंगमध्ये नाही मजल्याचे घर :- परंपरा हा समाज जीवनाचा एक अविभाज्य घटक आहे.  त्या परं  
समाजमनावर एवढा पगड़ा आहे, की हजारों वर्षे त्या चालत आल्या आहेत.  दुषकाळी जत तालुकाही त्याला अपवाद नाही. तालुक्यातील काही गावत का Wचे आजही पालन केले जाते. त्या केब्द्ा सुरू झाल्या कोणी सुरू केल्या अख्यायिकाही सांगितल्या जातात काही शलकापासून या प्रथा पाळल्या जाता आजच्या अधुनिक काळात त्याचा मोठा पगडा आहे, गावात अनेक उच्चशिक्षीत लोक असले सरी था प्रथना छेद देण्याचे कोणा धासस नाही, अशीच एक प्रधा अनेक वर्षापासून वळसंग गावात चालत आली आहे.

जत-उमदी-घडचण रस्त्यावरील वळसंग हे एक महत्वाचे गाव जतपासून पू्वेसा ११ किलोमीटर अंतरावर हे गाव आहे. जत ते वळसंग या दरम्यानच्या परिसराला डोण म्हणतात, डोण म्हणजे संपूर्ण काळ्या मातीचा हा प्रदेश आहे. कुठेही खडक, दगड, डोंगर, मुरमा त्यामुळे जत ते बळसंग या ११ किलोमीटर दरम्यान कोणतेही गाव अथवा लोकवस्तीही वसलेली नाही. भाग नाही. घर बांधणीयचे तरी जमीनीत अनेक फूट पाया लागत नाही.

वळसंग ही केंचराया ग्रामदैवताची नगरी केंचराया गावचे अधिपती, श्रध्दास्थान व सर्थकाही आहे, बेल, भंडारा, व घोंगडयाचा मानकरी असलेले श्री चराया हे सर्वांचे श्रध्दास्थान आहे. गावात केंचरायाचे अतिशय भव्य व दिमाखदार मंदीर उभारण्यात आले आहे. प्रचंड सभामंडप, उंच आकाशाला भीडणारे नक्षीदार शिखर आहे.

केंचराया देवाच्या या पंढरीत कोणी उच्च व कोणी निच नाही. सर्व समान आहेत.

त्यामुळे गावात कितीही श्रीमंत व्यक्ती असला तरी मजल्याचे घर व माडी अजिबात बांधली जात नाही. गावात कोणी माडी बांधली तर त्याला उतरती कळा लागते, त्याचे

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

 इतर आणखी काही लेख वाचण्यासाठी माझ्या
bhausahebmahanor.blogspot.com
  या ब्लॉगच्या होम पेज वरील कॅटेगरी (catagory ) वरील ऑप्शन ला जा आणि इतर ब्लॉग वाचा .आवडलेला ब्लॉग आपल्या मित्रांना ,सहकाऱ्यांना  whatsapp, facebook द्वारे शेअर करा .
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
 भविष्यात इतर आणखी काही लेख वाचण्यासाठी माझ्या
 bhausahebmahanor.blogspot.com
या ब्लॉगला फॉलो करा ; की जेणेकरून नवीन लेख पब्लिश झालेची नोटीफिकेशन आपोआप मिळेल.
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  एखादा ब्लॉग आवडल्यास , पोस्ट वाचताना उजव्या कोपऱ्यात वरील ऑपशन(तीन टिंब ) वर  जाऊन आपल्या मित्रांना  whatsapp किंवा facebook द्वारे  share करु शकता.किंवा आपल्याला आलेली  लिंक शेअर/फॉरवर्ड करा.
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏




No comments:

Post a Comment