आमचं गाव आमची परंपरा -कोळगिरी
कोळगिरी हे गाव तालुका- जत, जिल्हा-सांगली (महाराष्ट्र) मध्ये आहे.जत -उमदी राज्यमार्ग क्रमांक 140 वर ,जतपासून पूर्वेला 16 किमी अंतरावर आहे.
कोळगीरी हे नाव कोळ्ळदगिरी पासून तयार झाला आहे. या कन्नड शब्दाचाअर्थ असा की ,कोळ्ळ म्हणजे दरीतील सपाट भाग , गिरी म्हणजे पर्वत.कोळ्ळद+ गिरी अशा दोन शब्दापासून अपभ्रंश होऊन कोळ्ळगिरी-कोळगिरी हे नाव आज प्रचलित आहे.
कोळगिरी या गावाची उत्पत्ती वाल्या कोळी म्हणजे वाल्मिकी ऋषींनी काही काळ तप केलीली गुहा कोळगिरी हद्दीत आहे,असे मानतात म्हणून कोळगिरी हे नाव पडले असावे, असा देखील तर्क लावला जातो.

गावापासून उत्तरेला साधारण दीड किमी अंतरावर डोंगराच्या कुशीत काळभैरवनाथाचे हेमाडपंथी मंदिर आहे. मंदिराचे बांधकाम पूर्ण हेमाडपंथी असून मंदिरावर तत्कालीन शिखर नाही.
मंदिरात महादेवाचे शिवलिंग मंदिराचा गाभारा पूर्वाभिमुख असून त्याच्या उत्तरेला काळभैरवनाथाचा गाभारा दक्षिणाभिमुख असा स्वतंत्र आहे. मंदिरावर कोरीव काम केले आहे .मंदिरात शिलालेख असून तो कन्नड भाषेत आहे .लिपी कन्नड असली तरी त्यातील शब्द मात्र तत्कालीन मराठी, संस्कृत आणि हाळी कनडा भाषेतील आहेत. तिन्ही भाषेतील शब्द हे ग्रामीण बोली भाषेतील असल्याचे समजते. त्यामुळे शिलालेखाचा अर्थ लवकर लागत नाही.

कोळगिरी गावाची वैशिष्ट्य पूर्ण परंपरा म्हणजे भैरवनाथाची यात्रा होय.
( पावसाळ्यात भैरवनाथ मंदिराजवळचा धबधबा असा प्रवाहित होतो ....)
भैरवनाथाची यात्रा ही श्रावण महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी भरते. आदल्या दिवशी देवाची पालखी तिर्थस्नान घडवून आणण्यासाठी नेली जाते. पूर्वी पालखी ही कोळगिरी पासून जवळच असलेल्या संगतीर्थाला नेली जात असे, पुढे कृष्णा नदीच्या पाण्याने देवाला स्नान घातली जायची. आत्ता ही पालखी माचनूर येथे नेली जाते. पूर्वी पालखी खांद्यावर घेऊन जात असत. आता पालखी टेम्पोमध्ये घालून घेऊन जातात.
श्रावण महिन्यात आता पालखी माचनूर ता.मंगळवेढा जि. सोलापूर येथे भीमा अर्थात चंद्रभागा नदीवर जाते.आपल्या कुलस्वामीची पालखी येते म्हणून ब्रह्मपुरी. बटाण ,पुळज येथील भक्तलोक प्रसाद तयार करतात. यात्रेच्या आदल्या दिवशी देवाला पूर्वी संगतीर्थ येथे घेऊन जात होते. आता भीमा नदीवर घेऊन जातात , याला गंगा स्नान म्हणतात. श्रावणाच्या तिसऱ्या सोमवारी भैरवनाथाची यात्रा भरते .
गावात चांद्रगिरीचे मंदिर आहे. संध्याकाळी चांद्रगिरी मंदिरात पालखी ठेऊन भक्तांना जेऊ घातले जाते.रात्री डोंगरातील मंदिरात पालखी येते. आदल्या दिवशीआलेली सासनकाठी पश्चिमेकडील पावतका जवळ ठेवली जाते,तेथे पालखी येते. पाच फेऱ्या मारून पालखी मंदिरात प्रवेश करते. त्यानंतर मुर्ती स्थानापन्न करतात. रात्री 8-9 च्या दरम्यान आरती होते. रात्रभर हरजगरण असते, धनगर लोक ढोलगाणी म्हणतात.
स्वातंत्र्य पूर्व काळात भैरवनाथाची यात्रा ही ह्याडगी ज्यात्रा व्हायची. पुजारीलोक आणि भक्तलोक घरातून पोळ्या बनवून आणत .सोबत गुळवणी ,आमटी, भात हे सारं मोठ्या फोकांच्या पाटीत भरून देवळाजवळ आणायचे . देवाजवळ जे काही पन्नास -शंभर माणसं असायची त्यांना प्रसाद म्हणून जेऊ घालायचं. अन तासात जत्रा संपायची.

आता जत्रेचे स्वरूप बदलून गेले आहे. पार्किंग, स्टॉल, प्रसादालाय , भक्तनिवास यांची स्वतंत्र सोय केली आहे . अनेक भक्त जे दंडवत घालून उघड्यावर कपडे बदलत होते, त्यांना आता तात्पुरती चेंजिंग रूम तयार केली जाते, तिथे लोक कपडे बदलतात.
इस्लामी आक्रमणात मंदिराची पडझड झालेली आहे. त्यावेळी शिखर फोडलेले असावे . 1980 च्या दरम्यान मंदिराचा जीर्णोद्धार केला आहे. मूर्तीची तोडफोड करून भग्न अवस्थेत फेकलेली होती. शिवलिंग आणि जोगेश्वरीची मूर्ती देखील फोडलेली आहे. मंदिराच्या बाहेर वीरगळ आहेत. वीरगळ म्हणजे शूर क्षत्रिय लोकांच्या शौर्य कथा , पराक्रमाच्या कथा दगडावर कोरुन ठेवल्या जातात. जे लोक युद्धात कामी आले ,त्यांच्या शौर्य कथा दगडावर कोरून ठेवणे म्हणजे वीरगळ होय. मंदिराच्या परिसरात सद्यस्थितीत नऊ वीरगळ आहेत. त्या नऊ पराक्रमी पुरुषांची नावं इतिहासाला माहीत आहे की नाहीत हेही आम्हाला माहीत नाही.
कोळगिरी मध्ये पूर्वी बाबर लोक राहत होते. पूर्वीचे गाव सध्याच्या गावाच्या उत्तरेला हाळ जमिनीवर होते. हाळ म्हणजे पडीक जमीन . बाबरांची पूर्वी 28 एकरावर वस्ती होती. तात्कालीन चार विहिरी अजून आहेत. घरे ,वाडे पडून जमीनदोस्त झालेली आहेत. आज त्या ठिकाणी लोक जमिनी कसतात. नांगरताना जाती ,उखळ सापडतात. त्याच क्षेत्रात महादेवाची मूर्ती सापडलेली आहे. लक्ष्मण कृष्णा भोसले यांनी रस्त्याच्या बाजूला ठेऊन पूजा चालु केली आहे. सावलीसाठी पिपरणीचे झाड लावले आहे. काळाच्या ओघात बाबर हे डोंगरगाव, मानेगाव ,चोपडी,आलेगाव ,माचनूर, ब्रम्हपुरी, पुळूज येथे स्थायिक झाले आहेत. मंदिराच्या चारही बाजूला देवाच्या पादुका ( पावतका) आहेत. त्यापैकी दक्षिणे कडील पावतकावर प्रत्येक अमावस्येला बाराघडी विद्या काळ म्हणून त्या वर गोवारी वर ,तेल /सरकी घालून पेटती ठेवली जाते. चमकेरीच्या स्वामींनी ऐकलं होतं की सर्पदंश झाल्यावर बाधित व्यक्तीला मंदिरात ठेवतात आणि मंदिराला प्रदक्षिणा घालतात . म्हणून त्यांनी विसाव्यातला एक दगड चमकेरीला न्यायचा प्रयत्न केला पण तो अयशस्वी झाला. मंदिराच्या पूर्वेला देवाचा रक्षणकर्ता वेताळ आहे . वेताळाला बोकडबळी दिला जातो. वेताळ आहेत की ते नवग्रह आहेत हे कुणाला नेमके माहीत नाही. मंदिराच्या परिसरात पशुहत्या नको म्हणून ते वेताळ स्थान मंदिरापासून 200 फुटावर पुनर्स्थापित केले आहेत. गावातील लोक आजही पोलीस स्टेशन पेक्षा जास्त मंदिरातील भैरवनाथाला घाबरतात.
कार्तिक कृष्ण अष्टमीला काळभैरवनाथाची जयंती साजरी करतात . डोंगरगावहून बाबारांचा एक प्रतिनिधी येऊन नाथ अष्टमी साजरी करायचे. पण 1938 मध्ये एक घटना घडली . या वर्षी बाबर यांनी कोण्या एका घरगड्याला पाठवले . विहिरीत पाणी आणायला गेल्यावर पडला अन मेला. त्या व्यक्तीचं थडगं तिथं आहे. सोन्याळचा पुजारीही विहीरीत पडला. तेव्हापासून काळभैरवनाथ जन्मसोहळा बंद झाला.
त्यानंतर रामचंद्र गोविंद घोगावकर नावाचा ब्राम्हण पुजारी होता . त्यांच्या काळात जतच्या डफळे सरकारनी फॉरेस्टमधून दोन नंबर म्हणजे जवळजवळ पन्नास एकर जमीन देवस्थानला दिली.
इस्लामी आक्रमणात देवाच्या मूर्तीची तोडफोड झालेली होती त्यामुळे भंगलेली मूर्तीची पूजा केली जात नव्हती. मंदिरात एक भली मोठी शिळा आहे . त्याशीळेवर लोक वेगळा दगड ठेऊन पूजा करायचे. घोगावकराच्या काळात श्रावण महिन्यात भजन कीर्तन म्हणून सप्ताह साजरा केला गेला . घोगवकाराच्या मनात आलं की भैरवनाथाची इथं मंदिरात मूर्ती नाही तेव्हा इथं विठ्ठलाची मूर्ती आणून ठेऊ. सनमडीचा वयस्कर माणूस श्री मदगोंडा पाटील सज्जन माणूस . तप करायचा. एक साधू पुरुष म्हणून मदगोंडा पाटील यांना समजायचे. त्यांच्या कानावर ही बातमी लागली. तिथे विठ्ठल मंदिर नव्हे तर काळभैरवनाथाचेच मंदिर व्हावे म्हणून सलग पाच दिवस एका पायावर उभे राहून तप केले. तरिही घोगावकर ऐकेनात. मदगोंडा पाटील यांना सहन झालं नाही. त्यांनी डोक्याच्या जटा उपसल्या .भैवनाथाच्या गादीवर टाकल्या. अन म्हणाले की भैऱ्या तू सत्वाचा असशील तर ही माणसं जिवंत ठेऊ नको. इतकं म्हणून सनमडीतील आंबाबईच्या खडीवर तपाला बसले. हीच तक्रार घेऊन मदगोंडा पाटील जतच्या डफळे सरकारकडे वाड्यावर गेले. त्यांची तक्रातर सरकारनी ऐकून घेतली.
सप्ताहाच्याया शेवटच्या दिवशी रात्री पूर्वेच्या धबधब्याकडून आगीचा गोळा येऊन मंदिरात घुसला. सर्वांना शॉक बसला. भजन करणारे लोक पालथे पडले . विणा तुटला, फुटला. गळ्यात फक्त पट्टा राहिला. पेटी फुटली . घोगावकर पालथा पडला. धोतरातच हागून घेतला. काहीवेळाने शुद्धीवर आला. आता इथं मला बास झालं, म्हणून तो जातो म्हणाला. वरती पश्चिमेला संगमावर त्याच ढुंगण, धोतर धुतले. मग गावच्या माणसांनी त्याला वळसंगच्या हद्दीत सोडून आले.
देवाला पूर्वी लोक शिडगाई करायचे. शिडगाई म्हणजे नारळ फेकून मारून फोडणे होय. ही शिडगाई मंदिराच्या मुख्य प्रवेश द्वारावर व्हायची .
पूर्वी म्हणजे 2010 पूर्वी मंदिराच्या चारही बाजूने साधारण आठ दहा फूट जागा होती. ईशान्य कडेच्या चिंचेच्या झाडाखाली खीर शिजवायचे . केळीचे बंबाट कापुन सोपटात खीर वाढायचे. खीर पातळ झाली की सोपटातून खाली पाळायची. वाढताना ते ही बादलीने वाढायचे .
आता प्रसादाचे स्वरूप बदलेले आहे. मोठ्या रव्याची सजक म्हणजे सांजा, तांदळाचा भात आणि टोमॅटो आमटी . ताटं आहेत. स्वतःला किती हवय तितकं घ्यायचं. पोट भरून प्रसाद घेतला तरी चालतो भैरवनाथ देवाला धनगरी लोक ओव्या म्हणतात . तबला, ढोल, झांज च्या साहाय्याने ओव्या म्हणतात. त्याला हाडा म्हणतात.
चोपडीच्या भक्त लोकांनी 50 फुटाची सासन काठी तयार केली आहे, त्याचा मान चोपडीकारांना आहे. आदल्या दिवशी सासन काठी पावतका जवळ पूर्व बाजूला आणून उभी ठेवली जाते. मानेगावचे लोक देवाजवळ त्यांच्या पुरती भांग करून प्यायचे आता ट्रस्ट कडून प्रसाद म्हणून भांग केली जाते .यात्रेत येणाऱ्या प्रत्येक भक्ताला भांग दिली जाते. भांग हे सोमनाथाचे पेय आहे . भांग हा पातळ पदार्थ असून यामध्ये खोबरे, खारीक, बदाम, काजू, खसखस , बडीशोप, वेलदोडे, जायफळ, मनुका एकत्रीत भिजत ठेवतात. चांगले भिजल्यावर चेचून रस काढतात. गाळून, त्यात गूळ, दूध आणि प्रथा म्हणून थोडी गांजा घालतात. मग प्यायला देतात. गाळून झाल्यानंतर राहिलेल्या चोथ्यामध्ये थोडा गूळ घालून तेही प्रसाद म्हणून वाटतात. भांग वाटपानंतर सासन काठी फिरते.
दुपारी सव्वा एक च्या दरम्यान सासन काठी सवाद्य मिरवणूक काढली जाते. सासन काठीवर गुलाल ,खोबरं उधळायचं नाही असा दंडक केला आहे. ज्याला कुणाला उधळू वाटतंय त्यांनी फुलं उधळायची.
पाच प्रदक्षिणा घालून सासन काठी दक्षिणेकडून भैरवनाथाच्या चरणी स्पर्श करून बाजूला काढून ठेवली जाते.
सासन काठी नंतर कुस्तीचा आखडा होतो.
दिवाळी पाडव्या दिवशी मायथाळ चे लोक चांद्रगिरी ला भेटायला हिरवड्या /नरसिंह देवाची पालखी घेऊन येतात . गावाच्या पूर्वेला ओढ्यात पालख्यांची भेट होते. तेव्हा भैरवनाथाची पालखी हनुमान मंदिरापुढे येते.तिथं तिन्ही पालख्यांची भेट होते. या भेटी दरम्यान बोकडाचा निवड दाखवून पुजारी भाकणूक सांगायचे .आता बोकड कापण्याची पद्धत बंद केली आहे.
जोगेश्वरी भैरवनाथाची बहिण आहे की पत्नी आहे माहीत नाही. काळभैरवनाथाचे मूळ मंदिर हे कश्मीर मध्ये वैष्णवी देवी पेक्षाही 15 किमी दूर उंचावर हिमालयात आहे. काशिक्षेत्राचा रक्षणकर्ता तो कालभैरव .काशीचा क्षेत्रपाल होय . आजही वाराणशी मध्ये एक पोलीस स्टेशन आहे की जिथं जिल्हा पोलीस कार्यालयात दोनन खुर्च्या आहेत म्हणे , एक खुर्चीवर जिल्हा पोलिस प्रमुख आणि दुसऱ्या खुर्चीवर काळभैरवनाथ बसतो .

1134 मध्ये मंगळवेढा राज्याचा राजा बिज्जळ होता. कऱ्हाड प्रांतामध्ये जी 400 गावं होती त्यात कोळगीरी गावाचा समावेश होता. कोळगिरीसोबत शेडीहाळ(शेड्याळ) , माडगीहाळ (माडग्याळ), उमदी, खरसुंडी या गावांचा देखील उल्लेख इतिहासात आहे म्हणे. परंतु ते संदर्भ मंदिराच्या किंवा गावच्या इतिहासात वाचायला उपलब्ध नाहीत.
आजही कोळगीरी काळभैरवनाथाची आरती कन्नड भाषेतून गायली जाते. त्याचा थोडक्यात अर्थ पुढील प्रमाणे होतो ......
हे जयदेवा तुम्ही इथं मालक म्हणून आला आहात. काशिखांडचा मालक तुम्ही आहात. युगानुयुगे इथं आहात. या नावखंड पृथ्वीला आता भान येईल. यासाठी आम्हाला बुद्धी द्या. हे कोळगीरी सिद्धा तू असुरांचा संहार केलेला आहेस. तू स्वयंभू आहेस. सूर्य चंद्र देखील जातात. तुझ्या आरतीसाठी देव सुरवर आलेले आहेत.
मंदिराचे बांधकाम 12व्या शतकात झाले असावे.
मंदिराविषयी अभिप्राय वाहिमध्ये अनेक लोकांचे अभिप्राय आहेत . विश्वनाथ पट्टणशेट्टी आणि मित्र मंडळी यांच्यासोबत एक महाराज आले होते. त्यांनी काही मंदिराच्या इतिहासाविषयी नोंदी केलेल्या आहेत. शिवाजी युनिव्हर्सिटी मधून कोणीतरी Ph. D. साठी आले होते . त्यांनीही शिलालेख आणि वीरगळ यांचे संशोधन करून लेखन केले आहे .तसेच माण देशाचा अभ्यास करणाऱ्या फलटण च्या चांगुणा कोकिळा मॅडम 2011 साली आल्या होत्या. माणदेशाला लागून कोळगीरी हे गाव असू तेथे शिलालेख आहे ,हा उल्लेख वाचल्यानंतर मॅडम आल्या होत्या .
शिवरायांचे नातू राजाराम महाराज जिंजीला जाताना ,त्यांचा विश्वासू सरदार नारायणराव बाबर यांनी आपल्या कुलस्वामी देवाला दर्शन घेण्यासाठी डोंगरगाव वरून कोळगीरी मार्गे गेले असल्याचे उल्लेख असल्याचे सांगतात.
कोळगीरी गावचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे , व्हासपेठ कोळगीरी हद्दी दरम्यान दानम्मा हरी म्हणून आहे. दानम्मा देवीच्या पायाच्या ,आणि त्यांच्या घोड्याच्या पायाच्या खुणा आहेत असे मानतात. व्हासपेठ आणि कोळगीरी च्या शिवेवर आणखी एक वैशिष्ट्य पूर्ण ठिकाण म्हणजे उटगी नाऱ्या हरी हे ठिकाण होय. तिथे एक नैसर्गिक घळ आहे.
या ठिकाणी उटगीचा स्वातंत्र्य सैनिक नारायण याला ठार मारले म्हणून त्या खोऱ्याला / वगळीला उटगी नाऱ्या हरीअसे म्हणतात.
श्री क्षेत्र भैरवनाथ देवस्थान कोळगिरी , याठिकाणाला पर्यटन विभागाचा 'क ' दर्जा मिळाला आहे . त्यामुळे सध्या तिथे विकासाला भरपूर वाव आहे. सद्यस्थितीत आकर्षक फुलझाडांची लागवड केली असून चिंच ,नारळ ,सप्तपर्णी ,वड अशा झाडांची वैशिष्ट्य पूर्ण लागवड केलेली आहे. पंचक्रीशीत नव्हे तर दशक्रोशीत ,भैरवनाथ मंदिर हे पर्यटनाचे प्रमुख केंद्र बनत चालले आहे. श्रावण महिन्यात आसपासच्या शाळेच्या सहली एका दिवसासाठी येतात . झाडे, डोंगर, परिसर आणि पाणी ,फुलझाडे यांचा मनमुराद आनंद घेतात.
butoons
🙏🙏🙏🙏🙏
इतर आणखी काही लेख वाचण्यासाठी माझ्या
bhausahebmahanor.blogspot.com
ला भेट द्या./ ब्लॉगला फॉलो करा ./subscribe करा ....
🙏🙏🙏🙏🙏
🙏🙏share करण्या साठी निळ्या रंगामधील whatsapp किंवा facebook वर टच करा.🙏🙏

Marvelous.. information..
ReplyDeleteThank you
छान
ReplyDeleteमस्त सर
ReplyDelete