पोटं भरली भरली
खाली कष्टाची जाती
आणखी फिरली फिरली
उन्हाळल्या सावलीत
कष्टकरी ऊभा राही
एकटाच लढवय्या
त्याच्या सूतकाला कोणी नाही
उभी शासनाच्या दारात
रांग भुकेल्या रंकेची
पाटी पेन्सिल घेऊन
अशी झिंगत केंव्हाची
पोरक्या या जनतेला
विद्यादेवी ही मिळेना
सा-या डोळ्यामधी थेंब
तोही आक्रंदता येईना
ऐसी कैसी देवा रीत
राजा रंकाची ही प्रीत
मतासाठी ऐक्य हवे
नको संगे प्रेम गीत
No comments:
Post a Comment