माझे इतर लेख वाचण्यासाठी ब्लॉगच्या होम पेज वर कॅटेगरी (catagory ) वरील ऑप्शनला जा आणि आपल्या आवडीचा ब्लॉग वाचा. आवडलेला ब्लॉग आपल्या मित्रांना ,सहकाऱ्यांना whatsapp, facebook द्वारे शेअर करा. किंवा पेजची लिंक तुमच्या whatsapp ग्रुपला share करा.धन्यवाद.....!

Friday, February 05, 2021

कळसुबाई शिखर- एक आनंददायी ट्रेक

 


कळसुबाई शिखर , तिसऱ्या शिडीच्या वरचे पठार

ट्रेकर्सना आनंद देेणारा अनुभव 

कळसुबाई शिखर हे एक महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर आहे. कळसूबाई शिखराची उंची समुद्र सपाटीपासून १६४६ मीटर आहे, तर पायथ्याच्या बारी गावातून याची ऊंची अंदाजे ९०० मीटर आहे. पश्चिम घाटामध्ये हरिश्चंद्र डोंगर रांगेत आहे.  कळसुबाई मंदिरावरून कळसुबाई शिखर हे नाव पडलेले आहे .  प्रत्येक मंगळवारी आणि शुक्रवारी  देवीची पूजा करतात . देवीची ओटी भरतात .  अमावस्या पौर्णिमेला गर्दी असते .नवरात्र, दिवाळी आणि होळी या सणाला यात्रा भरते . शिखरावरील मंदिराचे बांधकाम इंदोर  गावातील कोळी समाजाने केले असे सांगितले जाते

कळसुबाई शिखरावरून दिसणारा सूर्यास्त 

  यातील अर्ध्या ऊंची पर्यंत गावकर्‍यांनी पायर्‍यांची शेती केलेली आहे. कठीण कातळटप्प्यांवर शिड्या बसविलेल्या आहेत. त्यामुळे ३ ते ४ तासात कळसूबाईचे शिखर सर करणे सहज शक्य आहे. भंडारदरा धरण येथून ६ कि.मी वर आहे. तेथे २ दिवस मुक्काम करून कळसूबाई , रंधा धबधबा, कोकणकडा इत्यादी ठिकाणे पाहता येतात.

कळसूबाई शिखरावर जाण्यासाठी शिखराच्या पायथ्याला असणाऱ्या बारी या गावात जावे लागते .हे गाव अकोले तालुक्यात अहमदनगर जिल्ह्यात आहे .  बारी गावाला वेगवेगळ्या मार्गाने जाता येते त्यापैकी  नाशिक-इगतपुरी महामार्गावरील घोटी या गावापासून घोटी-भंडारदरा रस्त्याने गेल्यास बारी हे गाव लागते. 

पुणे -अहमदनगर मार्गाने शिरूर मधून  आळेफाटा-कोतुळ-राजूर-भंडारदरा-बारी असे पोहचता येते . शिर्डी मधून सिन्नर घोटी खुर्द वरून बारी ला पोहचता येते .शिवाय शिर्डी मधून संगमनेर-अकोले-राजूर -भंडारदरा-बारी असे कळसुबाईला पोहोचता येते.

                      कळसुबाई शिखर पावसाळी दृश्य

बारी हे गाव  महादेव  कोळी या  आदिवासी जमातीचे आहे.कळसुबाई शिखरावर जाण्यासाठी पेंडशेत, इंदोरे आणि बारी या गावातून जाता येते .परंतु बारी  या गावातून कळसूबाई शिखरावर जाण्याचा सर्वात जवळचा  आणि सोपा   मार्ग आहे.  इतर दोन मार्ग अवघड आहेत . ते चॅलेंजिंग  आणि अनुभवी

 ट्रेकर्स साठी अंदाज घेऊन करण्यासारखे आहेत.

कळसुबाई  शिखरावरून दिसणारा सूर्योदय

           कळसुबाई  शिखरावरून दिसणारा विलोभनीय दृश्य

कळसूबाईचा इतिहास म्हणजे एक सत्यकथा आहे. काहिलोक त्याला दंतकथा म्हणतात .  प्राचीनकाळी कळसू नावाची कोळ्याची मुलगी होती.  काळसू रागाने जंगलात निघून गेली.   कळसू डोंगरावर  राहू लागली. तोच आज कळसूबाईचा डोंगर होय. कालांतराने तिच्या मृत्यू नंतर गावातील लोकांनी तिची आठवण म्हणून शिखरावर एक छोटे मंदिर बांधले. त्यानंतर त्या शिखराला  कळसुबाई शिखर म्हणून संबोधू लागले.  आदिवासी समाजामध्ये पूर्वजांना देव मानले जाते म्हणून आजही  अकोला तालुक्यातील  "महादेव कोळी " समाज  कळसुबाईला आपली देवी मानतात. कळसुबाई ही आदिवासींची कुलदेवी आहे.  संगमनेर गावापासूनही  भंडारदरा मार्गे बारी  गावास जाता येते. ट्रेकिंग चा छंद असेल तर भेट द्यायला हे एक उत्तम ठिकाण आहे..


कळसुबाई  शिखरावरून दिसणारा विलोभनीय दृश्य


पाहण्याची ठिकाणे 


कळसूबाईचा डोंगर चढायला सुरुवात केल्यावर पहिल्या टप्प्यावर कळसूबाईचे नविन मंदिर लागते. ज्या लोकांना शिखरावर जाणे शक्य नाही, त्यांच्या सोईसाठी हे मंदिर बांधलेले आहे. पुढे दुसरी शिडी पार केल्यावर कातळात दोन पावले कोरलेली आहेत, ती कळसूबाईची पावले आहेत अशी श्रध्दा आहे. शेवटच्या शिडीच्या खाली विहिर व बाजूला एक पत्र्याची शेड आहे. शिखरावर कळसूबाईचे छोटे मंदिर आहे. देवळात साधारण ३ माणसे बसू शकतील एवढीच जागा आहे. येथून समोरच खाली भंडारदरा धरणाचा अथांग पसरलेला जलाशय लक्ष वेधून घेतो. या शिखरावरून उत्तरेला रामसेज, अचला, अहिवंत, सप्तश्रुंग, मार्कंडा, धोडप, रवळया जवळया, कोळधेर अशी डोंगररांग नजरेस पडते. पूर्वेकडे  पंद्याड, औंढा, विश्रामगड, अलंग, मदन, कुलंग, माथेरान, हरिश्चंद्रगड लक्ष वेधून घेतात.



पोहोचण्याच्या वाटा 


या शिखरावर जाण्यासाठी मुख्य वाट ही बारी गावातून जाते. भंडारदर्‍यापासून ‘बारी’ हे गाव अवघ्या ६ कि.मी अंतरावर आहे. बारी गावात जायचे झाल्यास मुंबई-नाशिक मार्गावर इगतपुरी गाठावे. इगतपुरीवरून भंडारदर्‍याला जाणार्‍या एसटी ने बारी या गावी यावे. येथून शिखरावर जाण्यास ३ तास लागतात. वाटेत तीन ठिकाणी आता लोखंडी शिडया बसविलेल्या आहेत. गावातच सामान ठेवून ५ ते ६ तासात शिखरावर जाऊन येता येते. गावातून बाहेर पडल्यावर एक ओढा लागतो. हा ओढा ओलांडून झाल्यावर थोडयाच अंतरावर एक मंदिर लागते. या मंदिराच्या मागच्या बाजूने जाणारी वाट थेट शिखर माथ्यापर्यंत घेऊन जाते.


स्वतःचे वाहन असल्यास मुंबई - कसारा मार्गे घोटी (खुर्द) गाठावे. घोटी - सिन्नर मार्गावर भंडारदरा फाटा आहे.या फाट्यावरुन भंडारदर्‍याला जातांना, भंडारदर्‍याच्या अलिकडे ६ कि.मी अंतरावर ‘बारी’ हे गाव आहे.


राहाण्याची सोय


येथे शिखरावर राहण्याची सोय नाही. शिखरा खालील काही शेडमध्ये किंवा भंडारदर्‍याला किंवा बारी गावात राहण्याची सोय होऊ शकते. शिखराच्या पायथ्याला बारी गावात काही हॉटेल्स आहेत .तिथे राहण्याची सोय होऊ शकते . शिवाय बारी गावात घरगुती राहण्याची सोय करतात. 


जेवणाची सोय


बारी गावात/ भंडारदर्‍याला जेवणाची सोय होते. तसेच सध्या शिखरावर असणाऱ्या विहिरीलगत चहा आणि भजी उपलब्ध आहे. मध्ये चढण चढताना एक दोन हॉटेल्स झाली आहेत.



पाण्याची सोय


शिखरावर जाताना शेवटच्या टप्प्यावर शिडीच्या अगोदर एक विहीर आहे. ते शिखरावरील शेवटचे पाणी .पहाटे किंवा शिरवाळात चढाई केली तर पाणी कमी लागते. सकाळी नऊ ते सायंकाळी पाच पर्यंत चढाई केली तर पाणी अधिक लागते. वाटेत पाणी मिळत नसल्याने बारी गावातच पाणी भरून घ्यावे लागते.


बारी , पेंडशेत,  आणि  इंदोरे या चार गावातून कळसुबाई ला जाता येते. पाऊलवाटेने शिखरावर जाता येते. पेंडशेत वरून लांब पडते पेंडशेत मार्गे कळसुबाई ला चढण्यासाठी अवघड रस्ता आहे .शेवटच्या शिडी जवळ एक पठार आहे.  त्या पठारावर सर्व वाटा एकत्र येतात. दक्षिणेला भंडारदरा धरण आहे.  पश्चिमेला शहापूर तालुका ठाणे जिल्ह्यात येतो. उत्तरेला  नाशिक मधील सिन्नर तालुका येतो. दक्षिणेला पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुका घाटघर कोकणकडा पासून लागतो . बारी गावातील लोकांचे भात शेती इतकच उत्पन्न आहे. जून ते सप्टेंबर भरपूर पाऊस असतो.  बारी तुन कसारा घाट मार्गे मुंबईला थेट बसची सोय आहे . बारी मधून मुंबईला जायला तीन तास लागतात .नगरला तीन तास लागतात. बारीमधून बाजाराला लोक घोटी (खुर्द)ला जातात.  इगतपुरी तालुक्यातील नाशिक जिल्ह्यातील घोटी या गावापासून देखील कळसुबाई ला येता येते.  कळसुबाई ला पुणे नगर हायवे वरून आळेफाटा वरून राजुर मार्गे ब्राह्मणवाडा ते भंडारदरा यावरून कळसूबाईच्या पायथ्याशी असणाऱ्या बारी गावात पोहोचता येते.  दुसरा मार्ग शिर्डी वरुन संगमनेर मार्गे अकोल्यावरून देखील कळसुबाई ला येता येते. त्याशिवाय शिर्डी सिन्नर मार्गे भंडारदरा फाट्यावरुन घोटी मार्गे बारी येथे येता येते.इगतपुरी वरून मुंबई वरून येणाऱ्या लोकांसाठी इगतपुरी वरून घोटी ला येऊन कळसुबाईला येता येते. बारी गावात पिण्यासाठी उन्हाळ्यात पाणी बोरवेल चे असते.   पर्यटन आणि वाहतुकीची साधने यामुळे कळसुबाई गिर्यारोहणचे महत्व या अलीकडील दहा वर्षात वाढले.  मंदिराचे नवरात्रात यात्रा असते. लोक देवीची ओटी भारतात.  नऊ दिवस बाहेरचे बरेचसे लोक येतात. पायथ्यापासुन वरपर्यंत रस्त्याच्याकडेला दुकाने थाटली जातात.  कळसुबाईच्या शिखरावर मधुकरराव पिचड साहेब हे आमदार असताना त्यांनी  विजेची सोय केली. किरण लहामटे हे सध्याचे आमदार आहेत.  त्यांच्याकडून देखील कळसुबाईची मंदिराचा विकास होण्याची आशा आहे. 


लक्षवेधी फोटो 
















आमचे नियोजन 



उषःकाल  ट्रेक अँड टूर्सच्या वतीने  कळसुबाई व रतनगड हा ट्रेक यशस्वीपणे पूर्ण केला .29 जानेवारी 2021 ला वसंत नारायण माने सर काराजनगी शाळेत आले आणि कळसुबाई शिखर गिर्यारोहण नियोजन असल्याचे सांगितले. राहुल टकले  सरांनी चांगले नियोजन केले होते .या आधी त्यांनी वासोटा किल्ला  ट्रेकिंग केले होते. सर्व ट्रेकर्सना राहुल सरांनी आधीच माहिती दिली . 


सर्व ट्रेकर्सचे भटकंती एक्सप्रेस अंतर्गत उषःकाल ट्रेकर्स ग्रुप तर्फे सहर्ष स्वागत. 

आपण सर्वजण कळसुबाई  या महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखरावर आणि शेजारी असलेल्या रतनगडावर ट्रेकिंग करण्यासाठी  जाणार आहोत .



सदर प्रोग्राम खालील प्रमाणे राहील 


🛑शनिवारी दुपारी ठीक चार वाजता सांगोला (जि-सोलापूर)  येथून आपण कळसुबाई कडे प्रस्थान करू. 

🌍साधारणपणे नऊ तासाचा प्रवास करून आपण कळसूबाईच्या पायथ्याशी बारी या गावात पोहोचू. 

🎪  तंबूमध्ये  पहाटे पाच वाजेपर्यंत मुक्काम करू.

   पाच वाजता कळसुबाई शिखर सर करण्यासाठी निघू. शिखरावरती बघण्यासारखे काही नाही परंतु आपण पण

 🌄  जर सूर्योदयापूर्वी शिखरावर दाखल झालो तर शिखरावर वरून दिसणारा सूर्योदय हा विलोभनीय आहे.

 धबधबा पॉईंट , दरी विव्ह पॉईंट आणि सह्याद्रीच्या इतर रांगा इत्यादी नजरेखाली घालता येतात. 

🛑एक तासाच्या विश्रांतीनंतर आपण शिखरावरून खाली उतरू. 

🛑शिखराच्या पायथ्याशी घरगुती जेवणाचा आस्वाद घेऊ.

 आपण येथूनच सहा किमी अंतरावर भंडारदरा धरण पाहू. 

 🛑 पुढे 12 किमी असणाऱ्या सांदन व्हॅली या निसर्गरम्य दरीकडे प्रस्थान करू.सायंकाळी पाच ते सहा वाजेपर्यंत व्हॅलीमध्ये  मध्ये फिरु. 

 🛑  पुढे 5-6 किमी असणाऱ्या   रतनगडाच्या पायथ्याशी मुक्काम ला जाऊ. 

🌍 मुक्काम झाल्यावर सोमवारी सकाळी आपण रतनगड ट्रेकला जाऊ. सायंकाळी पाच वाजता परतीच्या प्रवासाला लागू. 

    🛑🛑🛑🛑 महत्त्वाचे 🛑🛑🛑🛑

  आपण ट्रेकिंगसाठी जाणार आहोत, हे लक्षात घेऊन आपले कपडे हे  सैल, आरामदायी असावेत. पायांमध्ये बूट असावेत.

🛑कळसूबाई ला थंडी असल्याने थंडीपासून संरक्षणासाठी उबदार कपडे असावेत.

🛑 सोबत एक बॅटरी असावी. चालताना त्रास होऊ नये म्हणून काठी असावी ..

एनर्जी वाढवणारे खाद्यपदार्थ घ्यावेत ,जसे गुळ ,लेमन गोळ्या, ड्रायफ्रूट, तिळाच्या पोळ्या इत्यादी .

शनिवारी संध्याकाळचे  भोजन  घरून सोबत घ्यायचे आहे .

जेवण सोबत घेताना आपणाला जेवढे लागते  तेवढेच घ्यावे. शिळे राहील इतके जेवण घेऊ नये..


🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
 इतर आणखी काही लेख वाचण्यासाठी माझ्या
bhausahebmahanor.blogspot.com
  या ब्लॉगच्या होम पेज वरील कॅटेगरी (catagory ) वरील ऑप्शन ला जा आणि इतर ब्लॉग वाचा .आवडलेला ब्लॉग आपल्या मित्रांना ,सहकाऱ्यांना  whatsapp, facebook द्वारे शेअर करा .
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
 भविष्यात इतर आणखी काही लेख वाचण्यासाठी माझ्या
 bhausahebmahanor.blogspot.com
या ब्लॉगला फॉलो करा ; की जेणेकरून नवीन लेख पब्लिश झालेची नोटीफिकेशन आपोआप मिळेल.
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
  एखादा ब्लॉग आवडल्यास , पोस्ट वाचताना उजव्या कोपऱ्यात वरील ऑपशन(तीन टिंब ) वर  जाऊन आपल्या मित्रांना  whatsapp किंवा facebook द्वारे  share करु शकता.किंवा आपल्याला आलेली  लिंक शेअर/फॉरवर्ड करा.
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

#####################################








1 comment:

  1. सुंदर नियोजन आणि सुंदर प्रवासवर्णन.

    ReplyDelete