पाचवी ते आठवीच्या वर्ग सुरू करण्याचे नियोजन सुरू,
शिक्षणमंत्री मा.वर्षा गायकवाड यांची माहिती.
मुंबई :
मार्च पासून बंद असलेली शाळेची घंटा 26 जनेवरीनंतर वाजणार. 23 नोव्हेंबर 2020 पासून कोरोनाचे नियम पाळून 9वी ते 12 वी चे वर्ग सुरू झाले. मात्र 5 वी ये 8वी चे वर्ग सुरू करण्याविषयी हालचाली सुरू होत्या .
नववी ते बारावीच्या वर्गांनंतर आता पाचवी ते आठवीचे वर्ग राज्यातील शाळांत केव्हा सुरू होणार? याची प्रतीक्षा आता संपली . लस नसल्याने शाळा सुरू झाल्या तर; विद्यार्थी-पालकांत संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते. लसी शिवाय शाळा या निर्णयाला पालक संघटनांनी विरोध दर्शविला होता. असे असले तरी पाचवी ते आठवीचे वर्ग सुरू करण्याबाबत केवळ चर्चा व नियोजन शासन पातळीवर सुरू होती . आता मात्र 5वी ये 8वी चे प्रत्यक्ष वर्ग सुरू करण्याचे बैठकीत ठरले आहे.
जानेवारीच्या 27 तारखेपासून प्रत्यक्ष शाळा सुरू करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आल्याचे मा.शिक्षण मंत्री यांनी सांगितले. शाळा सुरू कराव्या लागल्या तरी त्याआधी शाळा व्यवस्थापन समिती, स्थानिक प्रशासन आणि आरोग्य विभागाशी समन्वय ठेवून आरोग्याच्या व सुरक्षिततेच्या संदर्भातील आढावा घेतला जाईल, असे दिसते.
यंदाचे शैक्षणिक मूल्यमापन
यंदा शाळा अनेक महिने बंद असल्याने या वर्षीच्या शैक्षणिक वर्षाचे मूल्यमापन कसे केले जावे? त्यासाठी कोणते घटक आणि कार्यपद्धती अवलंबली जावी? याबाबत एससीईआरटीकडून प्रस्ताव तयार केला जात असल्याची माहिती दिली जात आहे. त्या प्रस्तावाला मंजुरी मिळताच राज्यातील शाळांना त्याप्रमाणे कार्यवाहीची सूचना देण्यात येणार असल्याचे सांगितले.
####################################
इतर आणखी काही लेख वाचण्यासाठी माझ्या
या ब्लॉगच्या होम पेज वरील कॅटेगरी (catagory ) वरील ऑप्शन ला जा आणि इतर ब्लॉग वाचा .आवडलेला ब्लॉग आपल्या मित्रांना ,सहकाऱ्यांना whatsapp, facebook द्वारे शेअर करा .
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
🕺🕺🕺
ReplyDelete