माझे इतर लेख वाचण्यासाठी ब्लॉगच्या होम पेज वर कॅटेगरी (catagory ) वरील ऑप्शनला जा आणि आपल्या आवडीचा ब्लॉग वाचा. आवडलेला ब्लॉग आपल्या मित्रांना ,सहकाऱ्यांना whatsapp, facebook द्वारे शेअर करा. किंवा पेजची लिंक तुमच्या whatsapp ग्रुपला share करा.धन्यवाद.....!

Thursday, September 16, 2021

शिक्षण ऑनलाईन, ऑफलाइन आणि वास्तव ............!

शिक्षण  ऑनलाईन,  ऑफलाइन  आणि  वास्तव ............!




प्राथमिक शाळांमध्ये गुणवत्ता हा विषय अनेक वेळेला चघळला जातोय .यावर्षी मात्र गुणवत्तेवर भाष्य करायला सर्वांनाच संधी चालून आली आहे .
शाळा अनेक महिने बंद असल्याने मुले बरेच काही विसरून गेली आहेत. नियमित शाळा सुरू असताना देखील ही समस्या होतीच. कारण, आपल्या बेसिक लर्निंग लेव्हलमध्ये यापूर्वीही अडथळे होतेच, हे आपण जाणतो.  त्यामुळे बेसिक / फाऊंडेशन च्या गोष्टी विद्यार्थ्याला शिकवायलाच हव्यात. या गोष्टींचे विस्मरण ज्या मुलांना फारसे झालेले नाही त्यांना फारशी अडचण येणार नाही ;त्यांची उजळणी होईल आणि जी मुले त्या गोष्टी पूर्णपणे विसरून गेली असतील, ती नव्याने शिकतील नव्हे  त्यांना शिकवावे लागेल.
मुलांच्या शाळा बंद होऊन खूपच काळ लोटला आहे. कोरोना मुळे नियमांच्या अधीन राहून शाळा उघडण्यापूर्वी काही गोष्टींकडे लक्ष द्यावे लागेल. शाळा सुरू झाल्या तरी काही पालक धोक्याच्या भीतीमुळे मुलांना शाळेत पाठवायला तयार नाहीत, तर काही पालकांना असे वाटू लागले आहे की, बराच काळ शाळा बंद राहिल्यामुळे त्यांच्या मुलांची पीछेहाट होत आहे. त्यामुळे शाळा सुरू झाल्या पाहिजेत. काही मुले उतावीळ होऊन शाळा सुरू होण्याची वाट पहात आहेत, तर काही मुले कदाचित आता शाळेत जायला घाबरतील. शाळा सुरू करण्यापूर्वी दोन्ही प्रकारची स्थिती शिक्षकांनी हाताळण्याची तयारी करायला हवी.

महत्वाचा मुद्दा असा आहे  की, शिक्षक आणि पालक यांच्यात संवाद होणे आवश्यक आहे. कारण, जर शाळा पुन्हा बंद कराव्या लागल्या तर पुढे कशा प्रकारे शिक्षण चालू ठेवायचे ? याची योजना आताच तयार केली पाहिजे. तिसरी गोष्ट अशी की, जर पुन्हा शाळा बंद करायची वेळ आलीच तर शाळांमध्ये शैक्षणिक सामग्री, वर्कशीट आदींची व्यवस्था असायला हवी आणि आठवड्यातून एक/ दोन दिवस त्या विशिष्ट वर्गासाठी शाळा उघडायला हवी; जेणेकरून पालक अथवा  संबंधित विद्यार्थी त्याच्या वर्गाची अभ्यास सामग्री घेऊन जाऊ शकतील. आठवड्यातून एकदा /दोनदा पालक आणि शिक्षक यांच्यात बातचितही व्हायला हवी; जेणेकरून मुलांनी या कालावधीत कोणता अभ्यास केला अगर  कोणकोणते उपक्रम केले, हे पालक सांगू शकतील.




शाळा सुरू करण्यासंदर्भात शाळांच्या पातळीवरही काही व्यवस्था करता येऊ शकते. एक म्हणजे, लहान मुलांना पहिली व दुसरी साठी  केवळ दोन तासांसाठी शाळेत बोलवावे. तिसरी, चौथी आणि पाचवीतील मुलांना त्यानंतर अडीच / तीन तासांसाठी शाळेत बोलवावे. सहावी ते आठवी   तीन/  साडेतीन तास शाळेत  मुलांना बोलावणे,
आणि नववी ते बारावी चार तास  असाही पर्याय उपयोगात आणता येऊ शकतो. असे केल्यानंतरसुद्धा काही मुले शाळेत येणार नाहीत. शाळेत न येणारी मुलं कच्ची असू शकतात. म्हणजे कच्ची असल्याने शाळेत येत नसतील अथवा शाळेत न आल्यामुळे कच्ची राहतील अशा दोन्ही प्रकारच्या मुलांपर्यंत पोहोचण्यासाठी शिक्षकांना कसरत करावी लागेल.  मुलं दररोज शाळेला येत होती तेव्हा अभया चुकवायची आणि आता तर त्यांना रान मोकळं घावलं आहे .अशा मुलांपर्यंत पोहोचण्यासाठीही एक खास  योजना तयार केली पाहिजे. मुलांनी पूर्वीप्रमाणेच दररोज शाळेत यावे, अशा स्थितीची कल्पना आपण इतक्या लवकर करू शकत नाही. पण वेळेचा अपव्यय मात्र नक्की होणार. याचा अर्थ मुलांच्या शिक्षणासाठी पर्यायी व्यवस्था करूच नये, असा होत नाही.




सन 2021/22  या शैक्षणिक वर्षात काही शाळांनी जुलैनंतर प्रत्यक्ष शाळा / क्लास सुरू केला. त्यात मुलांची उपस्थिती लक्षणीय आहे. यामध्ये अशी अडचण आली की तिसरी ते सहावी या वर्गातील मुलांचे वाचन आणि गणित विस्मरण झाले आहे कारण ती मुलं गेली दीड वर्षे शाळेत नाहीत. जे काही शिकलेलं होतं ते कच्चे दुवे सांधने गराजेचे आहे . पण आता सध्या अडचण अशी निर्माण झाली आहे की एकाच वर्गात विविध स्तरावरील विद्यार्थी आहेत . अशा समूहातील मुलांना शिकवणे शिक्षकांना आव्हानाचे ठरणार आहे. सहावीतील मुलांना कन्टेन्ट शिकवायचा की LBL नुसार शिकवायचे? LBL नुसार शिकवायचे म्हणजे हुशार मुले दंगा करतात आणि कन्टेन्ट शिकवायचे तर खालच्या पातळीचे विदयार्थी लक्ष देत नाहीत.यासाठी शाळा सोडल्यानंतर एक तास विद्यार्थ्यांना थांबवून घेऊन अभ्यास पूर्ण करून घ्यावा लागतोय.यामध्येही अडचण येऊ लागली आहे. ती म्हणजे रानातील आणि वस्तीवरची मुलं थांबू शकत नाहीत . पालकांना फोन करून सांगावे लागायचे. ज्या मुलांना अभ्यास टाळायचा आहे ती मुलं आजारी असल्याचं कारण सांगतात.  या प्रक्रियेत  हौसेने अभ्यास करणारी मुलं काहीतरी शिकतील आणि टाळाटाळ करणारी मुलंमात्र कच्ची राहतील हे मात्र नक्की .
त्यानंतर दोन गोष्टींवर लक्ष केंद्रित करणे गरजेचे ठरते. एक म्हणजे, तिसरी ते सहावीपर्यंतच्या सर्व मुलांना एक महिना पायाभूत गणित आणि एक महिना भाषा याविषयी रोज एक ते दीड तास उपक्रम घेणे भाग पडेल.

दुसरी गोष्ट म्हणजे, पहिली आणि दुसरी इयत्तेच्या मुलांच्या मातांना एकत्रित करणे आणि घरच्या घरी मुलांकडून अक्षर ओळख मध्ये होमवर्क दयायला हवा.  क्लासिफिकेशन करणे आणि एकसारखे अक्षर ओळखणे इत्यादी  गोष्टी करून घेण्यास सांगावे लागेल. शाळेतील शिक्षकही असे उपक्रम घेऊ शकतात. शाळा अनेक महिने बंद असल्यामुळे मुले बरेच काही विसरून गेली असतील.
त्यामुळे बेसिक फाऊंडेशनच्या गोष्टी शिकवायलाच हव्यात.
         पाया मजबूत करण्यासाठी सध्याचा कालावधी चांगला आहे. मुलांचे जे शैक्षणिक नुकसान झाले आहे ते पाहून निराश होण्याचे कारण नाही. मुलें लहान आहेत, त्यामुळे थोडेसे लक्ष येथे आपण पुरविले तर ते आपली पूर्वीची लय पुन्हा पकडू शकतील. जेव्हा शाळा पुन्हा सुरू होतील, तेव्हा पहिले  शंभर सव्वाशे दिवस मुलांना एकत्र येऊन अभ्यासातील काहीतरी मनासारखे  करण्याची संधी दिली गेली पाहिजे. 

मात्र वास्तव चित्र काय सांगते ?

गेल्या दीड वर्षात भांडवलदारांची मुले हजारो, लाखो रुपये खर्च करून परदेशात शिकत आहेत. हजारो रुपयांचे महागडे ॲप्स विकत घेवून, वैयक्तिक क्लासेस अटेंड करून शिक्षण घेत आहेत.
            तर बहुजनांची, गरिबांची, मध्यमवर्गीयांची मुले बऱ्यापैकी शिक्षण प्रवाहाबाहेर गेली आहेत.  घरीच असलेल्या शेती, पशुपालन, मजुरी, लघु उद्योग, इ. व्यवसायात अडकली आहेत. अनेक मुली अल्पवयात विवाह बंधनात अडकली. अर्थात बहुजन वर्गाची पिढी शिक्षणापासून वंचित राहिली आहे. भविष्यात ही पिढी नोकरीस लागणार नसून वेठबिगारी बनणार आहे.
           गेले दीड वर्षे मुलांचे अतोनात शैक्षणिक नुकसान होत असताना शिक्षक जमेल तसं आपल्या परीने विद्यार्थ्यांना प्रवाहात टिकवून ठेवण्यासाठी प्रयत्न करत आहे. आता कसल्याही लेखी सूचना नसताना, धोका पत्करून शिक्षक शाळेत मुलांना बोलावून अभ्यास घेत आहेत, अध्यापन करत आहेत.
            हे अजून किती दिवस चालणार काय माहीत ?


🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

 इतर आणखी काही लेख वाचण्यासाठी माझ्या
bhausahebmahanor.blogspot.com
  या ब्लॉगच्या होम पेज वरील कॅटेगरी (catagory ) वरील ऑप्शन ला जा आणि इतर ब्लॉग वाचा .आवडलेला ब्लॉग आपल्या मित्रांना ,सहकाऱ्यांना  whatsapp, facebook द्वारे शेअर करा .
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
 भविष्यात इतर आणखी काही लेख वाचण्यासाठी माझ्या
 bhausahebmahanor.blogspot.com
या ब्लॉगला फॉलो करा ; की जेणेकरून नवीन लेख पब्लिश झालेची नोटीफिकेशन आपोआप मिळेल.
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  एखादा ब्लॉग आवडल्यास , पोस्ट वाचताना उजव्या कोपऱ्यात वरील ऑपशन(तीन टिंब ) वर  जाऊन आपल्या मित्रांना  whatsapp किंवा facebook द्वारे  share करु शकता.किंवा आपल्याला आलेली  लिंक शेअर/फॉरवर्ड करा.
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏


No comments:

Post a Comment