माझे इतर लेख वाचण्यासाठी ब्लॉगच्या होम पेज वर कॅटेगरी (catagory ) वरील ऑप्शनला जा आणि आपल्या आवडीचा ब्लॉग वाचा. आवडलेला ब्लॉग आपल्या मित्रांना ,सहकाऱ्यांना whatsapp, facebook द्वारे शेअर करा. किंवा पेजची लिंक तुमच्या whatsapp ग्रुपला share करा.धन्यवाद.....!

Friday, September 24, 2021

शाळांची घंटा 4 ऑक्टोबर ला वाजणार

 


महाराष्ट्र राज्यातील शाळा कोरोना महामारीमुळे गेले दीड वर्षे बंद आहेत. सप्टेंबर  महिन्यात 6 तारखेपासून काही जिल्ह्यातील शाळा पालकांच्या सहमतीने सुरू झाल्या आहेत. आणि शाळातील उपस्थिती देखील चांगली आहे .   महाराष्ट्रातील उर्वरित जिल्ह्यांमध्ये शाळा सुरू करण्यासंदर्भात मा.मुख्यमंत्री यांच्यासोबत टास्क फोर्सनी चर्चा करून दि.4 ऑक्टोबर 2021 पासून राज्यातील शाळा सुरू करण्यासंदर्भात  चर्चा करून काही अतिरिक्त मार्गदर्शक सूचना दिल्या गेल्या आहेत ....... 

पालकातून समाधान 

दि.4 ऑक्टोबर 2021 पासून राज्यातील शाळा सुरू करण्यासंदर्भात  चर्चा करून राज्यातील शाळा सुरू करण्यासंदर्भात जो शासनाचा जी.आर.निघाला त्याचे पालकवर्गातून स्वागत होत आहे.

गेल्या दीड वर्षांपासून शाळा  बंद असल्यामुळे पालकांबरोबर विद्यार्थीही कंटाळलेले आहेत. कधी एकदा शाळा सुरू होत आहेत. असा प्रश्न प्रत्येक पालक आणि विद्यार्थी याना सतावत होता.तिसऱ्या लाटेची संभाव्यता लक्षात घेऊन आणि टास्क फोर्स शी चर्चा करून शासनाने योग्य पॉल उचलले. 

शाळा हळूहळू सुरू होतील. पण पालकांच्या डोक्यावरचे ओझे थोडेफार कमी होईल. घरात मुलांना अखंड कोंडून ठेवणे, ऑनलाईन अभ्यासासाठी मोबाईल खरेदी करणे, मोबाइलच्या वापराने कुमारवयीन मुलांवर लक्ष ठेवणे पालकांच्या दृष्टीने चॅलेंजिंग काम होतं.  त्याचा अतिरिक्त ताण कमी होणार आहे. सर्वच पालक विद्यार्थ्यांना शिकवू शकत नव्हते आणि लक्ष देखील देऊ शकत नव्हते . त्यामुळे पालकांच्या दृष्टीने ही बाब चांगली आहे .शिवाय विद्यार्थी देखील शाळेत येण्यास उत्सुक आहेत. पण शासनाने काही नियम घालून दिले आहेत ते काटेकोरपणे अंमलबजावणी केली पाहिजे .......

शैक्षणिक वर्ष २०२१-२२ मध्ये राज्यातील ग्रामीण भागातील इयत्ता ५ वी ते १२ वी व शहरी भागातील इयत्ता ८ वी ते १२ च्या शाळांचे वर्ग सुरक्षितपणे सुरु करण्यासाठी

महाराष्ट्र शासनाच्या अतिरिक्त मार्गदर्शक सूचना.


शालेय शिक्षण व क्रीडा विभाग महाराष्ट्र शासनाच्या क्र. २०२१०९२४१७५९०२८९२१ च्या  परिपत्रकानुसार  


 

पार्श्वभूमी :

कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर बंद असलेल्या  राज्यातील शाळांमधील वर्ग सुरु करणेबाबत मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात आल्या आहेत. मा. मुख्यमंत्री महोदयांनी राज्यातील कोविड परिस्थितीचा आढावा घेऊन लॉकडाऊनच्या अनुषंगाने शिफारशी करण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत टास्क फोर्स नियुक्त करण्यात आलेला आहे. सदर टास्क फोर्ससोबत दि. २४.८.२०२१ रोजी झालेल्या चर्चेच्या वेळी टास्क फोर्सने शाळा सुरु करण्यासंदर्भात काही शिफारशी / सूचना केल्या आहेत. 


परिपत्रक :

यापूर्वी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळा सुरू करण्यासाठी देण्यात आलेल्या सुचनाव्यतिरिक्त अधिक आणि  अतिरिक्त मार्गदर्शक सूचनांचे पालन करून राज्यातील ग्रामीण भागातील इयत्ता ५ वी ते १२ वी व शहरी भागातील इयत्ता ८ वी ते १२ वी चे वर्ग दि. ४ ऑक्टोबर, २०२१ रोजी पासून सुरू करण्यास सदर परिपत्रकान्वये शासन मान्यता देण्यात आली  आहे.




अतिरिक्त मार्गदर्शक सूचना :


अ) प्रत्येक शाळेमध्ये हेल्थ क्लिनिक सुरु करणे :

● शक्य असल्यास क्लिनिक सुरु करावे.

● विद्यार्थ्यांचे नियमितपणे टेम्परेचर तपासावे.

● शक्य असल्यास यासाठी इच्छुक डॉक्टर पालकांची मदत घेण्यात यावी.

●सर्व शाळा आरोग्य केंद्राशी संलग्न कराव्यात. 

● हेल्थ क्लिनिकमध्ये स्थानिक आरोग्य केंद्रामधील डॉक्टर व परीचारीकांची मदत घ्यावी.

● उपरोक्त कामासाठी CSR किंवा स्थानिक निधीतून खर्च करण्यात यावा.


ब) शाळेत येताना घ्यावयाची काळजी :

● मुलांना शाळेत पायी येण्यासाठी शिक्षकांनी प्रोत्साहित करावे.

● ज्या शाळांमध्ये स्कूलबस / खाजगी वाहनाद्वारे विद्यार्थी येतात, अशा वाहनांमध्ये एका सिटवर एकच विद्यार्थी बसून प्रवास करेल याची दक्षता घेण्यात यावी.

● विद्यार्थी बसमध्ये चढताना व उतरताना विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी वाहन चालक / वाहक यांनी विद्यार्थ्यांना सॅनिटायझरचा वापर करण्यास प्रोत्साहित करावे.


क) शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी नवीन मार्गदर्शक सूचना: 

● जेवण व इतर बाबी केल्यानंतर साबण किंवा सॅनिटायझरने हात धुण्याबाबत विद्यार्थ्यांना सतत सूचना दयाव्यात.

● विद्यार्थ्यांनी गृहपाठ ऑनलाईन पध्दतीने सादर करण्याबाबत निर्देश दयावेत,

● जेणेकरुन विद्यार्थ्यांमध्ये पुस्तकांची अदलाबदल होणार नाही.

● वेळ असल्यास गृहपाठ शक्यतो वर्गामध्येच करुन घ्यावा.


ड) खेळाच्या मैदानाबाबत मार्गदर्शन:

● सद्य:स्थितीत कोणत्याही प्रकारचे खेळ घेण्यात येवू नयेत.

कोरोना विषयक परिस्थिती सर्वसामान्य झाल्यानंतर काही खेळ घेण्यास हरकतनाही.  

● तथापि असे खेळ घेत असताना खालीलप्रमाणे काळजी घेण्यात यावी.

● खेळाचे साहित्य नियमित सॅनिटाईज करावे. 

● खेळ खेळणाऱ्या विद्यार्थ्यांकडे शिक्षकांनी लक्ष दयावे, विशेषतः थकलेल्या व दमलेल्या विद्यार्थ्याकडे लक्ष असावे.

● विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर मास्क असावा व त्यांच्यामध्ये २ मीटरचे अंतर असावे.

● जवळचे संबंध येणारे खेळ जसे, खो-खो, कबड्डी इत्यादी टाळावे. क्रिकेट, शारीरिक शिक्षण अशाप्रकारचे खेळ/ कार्य करण्यास हरकत नाही.


इ) आजारी विद्यार्थी शोधणे :

●  ताप, सर्दी, जोरात श्वासोच्छवास करणारे, शरीरावर ओरखडे, डोळे लाल झालेले, ओठ फुटलेले व लाल झालेले, बोटे, हात आणि सांधे सुजलेले, उलटया जुलाब व पोटदुखी असलेले विद्यार्थी वर्गात असल्याचे लक्षत आल्यानंतर त्यांना डॉक्टरकडे नेण्याची व्यवस्था करावी व डॉक्टरांच्या सल्ल्याने विद्यार्थ्यांच्या उपस्थितीबाबत निर्णय घ्यावे.


फ) विद्यार्थ्यांवरील मनोसामाजिक परिणामांबाबत शिक्षकांना अवगत करणे- खालील लक्षणे दर्शविणाऱ्या विद्यार्थ्यांची शिक्षकांनी विशेष काळजी घ्यावी.

● जास्त चिडचिड करणारे, रागीट व छोटयाशा गोष्टीने निराश होणारे. 

● वर्गात नेहमी शांत बसणारे व कोणत्याही गोष्टीत स्वारस्य न दाखविणारे.

●वयाशी विसंगत वर्तणूक दर्शविणारे उदा.अंगठा चोखणे इ.

● खाण्याच्या व झोपण्याच्या सवयीत बदल दर्शविणारे. 

● शालेय शिक्षणात असामान्य घट दर्शविणारे. 

● असहाय्य झालेले व सतत रडणारे विद्यार्थी.

●● अशी लक्षणे असणाऱ्या विद्यार्थ्यांची विशेष काळजी घ्यावी व त्याच्याशी संवाद साधावा.


ग) विद्यार्थ्यांच्या मनोसामाजिक स्वास्थ्याबाबत शिक्षकांना मार्गदर्शन :


● पहिल्या १ ते २ आठवडयामध्ये थेट शिक्षणावर भर न देता विद्यार्थ्यांस शाळेची सवय होवू दयावी.

● प्रत्येक विद्यार्थ्याची पार्श्वभूमी अवगत करुन त्यानुसार विद्यार्थ्यांशी परस्पर संवाद साधावा.

● कोविड होवून गेलेल्या विद्यार्थ्यांशी सर्वसामान्य विद्यार्थ्यांप्रमाणे वागावे. 

● विद्यार्थी व पालकांशी ऑनलाईन / ऑफलाईन पध्दतीने संपर्कात राहणे.


ह) शिक्षक-पालक बैठकीत चर्चा :

● कोविड आजाराबाबत माहिती व सदर आजार टाळण्याबाबत माहिती देणे.

● पालकांच्या प्रश्नांना योग्य संवादाने उत्तर दयावे.

 पालकांनी पुरेसे मास्क तयार करणे व सदर मास्क दररोज धुणे. 

● मुलांना मोबाईलची सवय लागू नये अशा पध्दतीने पालकांनी लक्ष ठेवण्याबाबत पालकांना मार्गदर्शन करणे.

●लवकर उठून शाळेच्या वेळेत मुलांना तयार करणे. 

● मुलांना कमीत कमी पुस्तके /वहया शाळेत  न्याव्या लागतील अशी व्यवस्था असावी.


ज) घरात प्रवेश करताना घ्यावयाची काळजी :

● घरात आल्यानंतर थेट स्नानगृहामध्ये जाणे. 

● स्नान करुन युनिफॉर्म बदलणे. 

● आंघोळीनंतर युनिफॉर्म साबणाच्या पाण्यात बुडवून ठेवावा किंवा संबंधित शाळेने विद्यार्थ्यांना युनिफॉर्म ऐच्छिक करावा.

● मास्कसुध्दा साबणाच्या पाण्याने धुवून बाहेर वाळत ठेवावा.

● पालकांनी मुलांना शाळेचे उपक्रमाबाबत अवगत करुन त्यांना पुढील दिवसासाठी तयार करावे.


ल) सीएसआर निधीचा उपयोग करणेबाबत :

● शाळांना फॅन, सॅनिटायझर या गोष्टी सीएसआर निधीमधून उपलब्ध करुन घेण्यास हरकत नसावी. 

● वैद्यकीय उपकरणे जसे, ऑक्सीमीटर, इन्फ्रारेड थर्मामीटर, औषधे, मास्क इ. सीएसआर मधून उपलब्ध करुन घेण्यास हरकत नसावी.

●■● वरील मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे. तसेच शासनाने कोविड संदर्भात वेळोवेळी दिलेल्या सूचनांचे पालन देखिल करण्यात यावे.


कोरोना संबंधित अतिरिक्त सूचना  महाराष्ट्र शासन परिपत्रक क्र. २०२१०९२४१७५९०२८९२१ वर उपलब्ध आहेत . 

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

 इतर आणखी काही लेख वाचण्यासाठी माझ्या
bhausahebmahanor.blogspot.com
  या ब्लॉगच्या होम पेज वरील कॅटेगरी (catagory ) वरील ऑप्शन ला जा आणि इतर ब्लॉग वाचा .आवडलेला ब्लॉग आपल्या मित्रांना ,सहकाऱ्यांना  whatsapp, facebook द्वारे शेअर करा .
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
 भविष्यात इतर आणखी काही लेख वाचण्यासाठी माझ्या
 bhausahebmahanor.blogspot.com
या ब्लॉगला फॉलो करा ; की जेणेकरून नवीन लेख पब्लिश झालेची नोटीफिकेशन आपोआप मिळेल.
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  एखादा ब्लॉग आवडल्यास , पोस्ट वाचताना उजव्या कोपऱ्यात वरील ऑपशन(तीन टिंब ) वर  जाऊन आपल्या मित्रांना  whatsapp किंवा facebook द्वारे  share करु शकता.किंवा आपल्याला आलेली  लिंक शेअर/फॉरवर्ड करा.
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏





No comments:

Post a Comment