माझे इतर लेख वाचण्यासाठी ब्लॉगच्या होम पेज वर कॅटेगरी (catagory ) वरील ऑप्शनला जा आणि आपल्या आवडीचा ब्लॉग वाचा. आवडलेला ब्लॉग आपल्या मित्रांना ,सहकाऱ्यांना whatsapp, facebook द्वारे शेअर करा. किंवा पेजची लिंक तुमच्या whatsapp ग्रुपला share करा.धन्यवाद.....!

Thursday, May 06, 2021

25 वर्षांनंतर भेटले मित्र

 25 वर्षांनंतर भेटले मित्र

शिर्डीत साई निवास ,विश्रांती आणि मनसोक्त गप्पा ...


नमस्कार मित्रांनो,

सर्वजण सुखरुप घरी पोहोचलो !बरे वाटले , दोन दिवस साईबांबांच्या चरणी D. Ed.चा वर्ग भरला.  पुन्हा जुने सवंगडी भेटले. गप्पा तर झाल्याच; पण एकमेकावर हक्क दाखवला अगदी  पहिल्यासारखाच!  आणि अगदी हक्काने शिव्या पण दिल्या सोबत  खाल्ल्या सुद्धा !

         मनसोक्त बोललो ,हसलो, एकमेकांची अमाप मापे निघाली! खूप खूप   म्हणजे खूपच  छान वाटले. अगदी सर्वजण रिफ्रेश झाले ; अगदी कात टाकल्या सारखे! जवळ जवळ सहा महिने केलेल्या नियोजनाचे सार्थक झाले! पंचवीस  वर्षानंतर कोंडारला आपण श्रद्धांजली वाहिली.  यापेक्षा निखळ मैत्री चे उदाहरण आणखी कोठे मिळेल?सर्वजण अगदी वेळात वेळ काढून आलो. काहींना  येण्याची इच्छा असुन सुद्धा येऊ शकले नाहीत. एक सोनेरी संधी हुकली! पण असो पुढच्या नियोजनाला हुकवू नका! मला वाटते पुढील नियोजन याहीपेक्षा अधिक चांगले करण्याचा प्रयत्न करुयात! पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे हार्दिक अभिनंदन  आभार! खास करुन गणेश हासे नी मनाची  तयारी दर्शवली!त्यांनी आपल्यासाठी त्यांचा वेळ दिला.

          त्याच बरोबर  श्रीनिवास कुंभार सर  , कृष्णत चन्ने सर यांनी देखील बहुमोल वेळ आपल्यासाठी दिला .त्यांना त्यांच्या कामाच्या ठिकाणी समाधान नक्कीच मिळत असेल पण "आमचे मित्र आमचा अभिमान " या नात्याने आमची मने  अधिकच उल्हासित झालेली . TS काळेंनी भावपूर्ण व्यक्त केलेलं मनोगत माझ्या भावना हेलावून गेलं. मला देखील व्यक्त होताना शब्द अडखळले.  AP ची मात्र डी.एड. मधल्या वर्गात असल्याप्रमाणे राहुल नी मस्तच फिरकी घेतली.  एस.टी.मध्ये सर्वांच्या  पाया पडण्याच्या प्रसंगाला सर्वांनी उजाळा दिला .प्राचार्यांनी ,यावर व्यक्त केलेलं मत म्हणजे, " आपल्या कॉलेजची इज्जत घालवली तुम्ही "

          या वाक्यावर त्यात काय इज्जत जाण्यासारखं? असं म्हाकू ढवळे चं मत त्यावेळेसारखं आज ही तसंच धाडसा�

No comments:

Post a Comment