माझे इतर लेख वाचण्यासाठी ब्लॉगच्या होम पेज वर कॅटेगरी (catagory ) वरील ऑप्शनला जा आणि आपल्या आवडीचा ब्लॉग वाचा. आवडलेला ब्लॉग आपल्या मित्रांना ,सहकाऱ्यांना whatsapp, facebook द्वारे शेअर करा. किंवा पेजची लिंक तुमच्या whatsapp ग्रुपला share करा.धन्यवाद.....!

Sunday, May 16, 2021

करोना आणि वास्तव जीवन !

 


एक विमनस्क अवस्था ....करोनाकाळ आणि वास्तव जीवन !

खरंच करोना आहे का? 

तर याचं उत्तर होय असं म्हणावं लागेल ..................

पण उत्तर देताना मात्र कन्फ्युज व्हायला लागतं.  कारण पहिल्या फेज मध्ये कॊरोना आमच्याकडे खेड्यात जास्त आला नाही . त्यामुळे कोरोना खोटा आहे असं वाटत होतं.  पण दुसऱ्या फेज मध्ये मात्र वाडीवस्तीवर पोहोचला आहे .

हा करोना अगदी चीन मधून जगभरातील प्रत्येक  विकसित देशात पोहोचला आहे. आज भारतातील प्रत्येक शहरातील अगदी गल्लीबोळात,वाड्या वस्तीवर ,डोंगर दऱ्यात राहणाऱ्या पर्यंत पोहचला. आता याचे चित्र सर्वांची झोप उडवत आहे.

स्टेज 1,2,3,4, ...................वगैरे...

 हा कोरोना व्हायरस किती स्वतःला अनुकूल करून घेईल तितके भारतासाठी आव्हानात्मक आहे. मात्र प्रत्येक भारतीयाला त्रासाचे आहे.  बळी जातोय ते म्हणजे गरीब आणि मध्यम वर्गीय समाजाचा ......मार्च 2020 पासूनच्या या काळात ना सरकार कडून ना आरोग्य यंत्रनेकडून ठोस अशी काहीही माहिती देण्यात आली नाही . मुंबईतील माहिती आणि कोरोना मृत्यूचे आकडे लपवले अशी विरोधी पक्षाकडून आरोप केले जातात. आणि कोरोना केव्हा संपुष्टात येईल हे कोणीही सांगत नाही. 

 सुरुवातीला  श्रीमंत लोकांचा वाटणारा हा आजार गरिबाला कवेत घेऊ पाहत  आहे . शहरी भागातला करोना ग्रामीण भागात हा हा म्हणता  पोहचला .आधीच ग्रामीण भागात वैद्यकीय सुविधा अपुऱ्या असल्याने मर्यादित असलेल्या शहरी भागातील सुविधांवर मोठ्या प्रमाणांत ताण पडू लागला ...यातच वाढती रुग्ण संख्या अनं हॉस्पिटल चे बाजारीकरणं यात सामान्य जनता मेटाकुटीला आली आली आहे .कोरोनाच्या नावाखाली चाललेले  हे बाजारीकरण त्वरित थांबवलं पाहीजे . सिस्टीम मधील व्यक्ती आपले कर्तव्य व्यवस्थित पार पाडत नसतील तर सरकारला देखील हात टेकावे लागतील.




 काही दिवस हाच रुग्ण वाढीचा दर राहिला तर आरोग्यसेवा विस्कळीत होऊन जाईल ...उपाययोजना वेळेत झाल्या नाही तर रुग्ण वाढीचा उद्रेक होईल.सुरवातीच्या काळांत करोना लक्षण असतील तर कोणते  औषधोपचार करावेत टेस्ट कधी करावी , किती दिवसांनी करावी याबद्दल अज्ञान आणि  अस्पष्टता असल्यामुळे सर्वांच्याच मनात संभ्रम कायमचं घर करून बसला आहे.चाचणी करण्यापासून ते उपचार करुन आणि परत घरी  जाण्यापर्यन्त प्रत्येक जण दलाली करतोय. अगदी उदाहरण द्यायचं म्हटलं तर रिपोर्ट्स् आलें कि लगेच लॅबोरेटरी कडून फोन यायला लागतात. रिपोर्ट पॉझिटिव्ह हवा की निगेटिव्ह.  फक्त बेड हवा की व्हेंटिलेटर देखील हवे? कुणाची चिठ्ठी आहे? लस देताना देखील चिठ्ठी घेऊन जावे लागते. 

रेमडिसिव्हीर चा काळाबाजार दररोज बातमीत ऐकायला येतो. व्यापाऱ्यांशीवाय नर्स , डॉक्टर्स देखील यांचं जाळं आहे. औषध, दवाखाना,ऍम्ब्युलन्स,  क्वारंटाईनसाठी बेड,  ऍडमिट साठी बेड, व्हेंटिलेटर, ऍडमिट होण्याकरता आगाऊ पैसे ,  यात प्रत्येक वेळी रुग्णास जादा चे पैसे मोजल्या शिवाय कोणतीही वस्तू अथवा साधन उपलब्ध होत नाही.यात सामान्य माणुस कंगाल झालाय. उद्योग धंदे बंद झाले, परिणामी पैसे कमवायचे मार्ग बंद झाले असले तरी, काम बंद घरभाडे चालू,कर्जाच हफ़्ते चालू, दुकान बंद दुकानभाडे चालू अशी आजची एकंदरीत परिस्थिती आहे.

 चीनने मुद्दाम केलेली क्लृप्ती जगाला मागे खेचू पाहत असताना ही एक नैसर्गिक आपत्ती म्हणायला हरकत नाही.पण काही संधी साधू लोक वाहत्या गंगेत हात धुवून घेत आहेत, जसे की ही मानवनिर्मित आपत्ती वाटत आहे.

उद्या यात अनेक परिवार उध्वस्त झालेले दिसतील. कित्येक आज उध्वस्त  होत आहेत, उपचाराअभावी, पैशाअभावी कितीतरी  गरीबरुग्ण दगावले. याला कोणाला जबाबदार धरायचे? विमानातून परदेशी गेलेल्या लोकांनी हा व्हायरस आणला .म्हणजे श्रीमंतांनी कोरोना भारतात आणला आणि गरिबांचे जीव घेऊ लागला हे सत्य नाकारता येत नाही. यावर कळस म्हणजे रिकाम्या रेमडिसिव्हीर च्या कुप्प्यात पॅरासिटेमॉल चे औषध भरून तीस तीस हजारांना ही इंजेक्शन विकली आणि पेशंट्स ना दिली देखील. यात जे वाचले ते  बलवत्तर म्हणून पण जे   जीवाला मुकले त्यांची चौकशी कुठे करायची?  

परदेशातून भारतात असा प्रवास न करणारा आपला गरीब बांधव , खेड्यात वाडी वस्तीवर राहणार गरीब, चुकून देखील शहरात न जाणारा गरीब ,त्याचा कोणताही    दोष    नसताना  दवाखाण्याचे बिल भरावे लागत आहे. आता हा रोग प्राण्यांना होत आहे.म्हणजे कोरोना जगातून कधी नष्ट होईल सांगता येत नाही.  

भारत सरकारने  अथवा प्रत्येक राज्य  सरकारने त्वरित मोफत औषधोपचार चालू करायला हवेत. कितीतरी कुटुंब देशोधडीस लागले, कितीतरी अनाथ झाले, लहान मुलंबाळं आई वडिलांपासुन वेगळी होऊ लागली, नातेवाईक असतानाही बेवारस होण्याची वेळ येत आहे, छोट कुटुंब असेल तर विचार करा काय अवस्था होत असेल?वाहनाची गैरसोय यामुळे ना कोणाला भेटता येते ना, कोणी इच्छा असुन कोणाला मदतही करू शकत नाही,ना आपल्याच नात्यातील रुग्णास भेटु शकत नाही, ना त्याची जेवणाची सोय करू शकत नाही,ना कोणाच्याही  अंत्यविधीला ही जाऊ शकत नाही.जिवंतपणी सगळ्यांची अवहेलना होत आहे. पण ती  व्यक्ती मेल्यानंतरही  ही अवहेलना संपत नाही .हे तुमचं आमचं दुर्दैव म्हणायच की सरळ-सरळ रचलेलं छडयंत्र म्हणावं? 

दो गज की दुरी, अभी कितने दिन तक जरुरी,

मास्क वापरून जीव घुसमटत आहेत,

सॅनिटायझर मारून मारून सेंट विस्मरणात गेलाय.

तरीही जी वाचवण्यासाठी पाळावे लागणार आहे ....

जान है तो जहाँ है!

आप मेला जग बुडाले असं वागू नका.आपल्यानंतर देखील आपली पुढची पिढी आनंदात राहावी या साठी आपणाला कोरोनाचे नियमांचे पालन करावे लागणार आहे ........


नियमा चे पालन करूया, करोना ला हद्दपार करूया.

सोशल गॅदरिंग टाळा.

मास्क जरूर वापरा.

सोशल डिस्टनसिंग पाळा

सॅनिटायझरचा वापर करा.......


आपण जगलो तर आपल्या कुटुंबाला अर्थ आहे

................................

( एक प्रसार माध्यमावरील बातम्या ऐकून ही विचारांची

बनलेली अवस्था आहे)


🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

 इतर आणखी काही लेख वाचण्यासाठी माझ्या
bhausahebmahanor.blogspot.com
  या ब्लॉगच्या होम पेज वरील कॅटेगरी (catagory ) वरील ऑप्शन ला जा आणि इतर ब्लॉग वाचा .आवडलेला ब्लॉग आपल्या मित्रांना ,सहकाऱ्यांना  whatsapp, facebook द्वारे शेअर करा .
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
 भविष्यात इतर आणखी काही लेख वाचण्यासाठी माझ्या
 bhausahebmahanor.blogspot.com
या ब्लॉगला फॉलो करा ; की जेणेकरून नवीन लेख पब्लिश झालेची नोटीफिकेशन आपोआप मिळेल.
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  एखादा ब्लॉग आवडल्यास , पोस्ट वाचताना उजव्या कोपऱ्यात वरील ऑपशन(तीन टिंब ) वर  जाऊन आपल्या मित्रांना  whatsapp किंवा facebook द्वारे  share करु शकता.किंवा आपल्याला आलेली  लिंक शेअर/फॉरवर्ड करा.
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏



No comments:

Post a Comment