सांदन व्हॅली -आशिया खंडातील दुसरी खोल दरी (घळ)
महाराष्ट्राला लाभलेला निसर्गाचा वरदहस्त म्हणजे 'सह्याद्री'. सह्याद्रीच्या अंगा-खांद्यावर भटकायला सर्वांनाच आवडते. सह्याद्रीच्या डोंगर रांगेतील एक निसर्गातील अद्भुत चमत्कार म्हणजे "सांदन व्हॅली ". अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील कळसुबाई शिखराच्या दक्षिणेकडील दक्षिणोत्तर डोंगर रांगेत भंडारदरा धरणाच्या दक्षिणेला साम्रद गावाच्या दक्षिणेला दीड-दोन किमी अंतरावर सांदन व्हॅली आहे . भंडारदरा धरणाच्या सुरुवातीला शेंडी गावातून अथवा धरणाच्या दक्षिण बाजूने रातनवाडी मधून जाता येते.
सुट्टी मिळाली आणि फिरण्याचा विषय निघाला की, पहिल्यांदा डोळ्यासमोर येतो तो म्हणजे 'सह्याद्री'. सह्याद्रीच्या कुशीत लपलेली अनेक ठिकाणे नेहमीच पर्यटकांना आणि ट्रेकर्सना भूरळ घालत असतात. याच निसर्गाच्या कुशीत दडलेलं 'सांदन व्हॅली' अर्थात 'सांदन दरी' हे आश्चर्य आजही आपल्यापैकी अनेकांच्या नजेरेपासून खरोखरंच दूर आहे. अहमदनगर जिल्ह्यातल्या साम्रद या गावातून पुढे दीड ते दोन किमी नागमोडी वळणे घेत जाणारी ही खोल दरी ट्रेकर्ससह इतर भटक्यां पर्यटकांनाही मोहात पाडते .
पावसाळ्याचे चार महिने वगळता वर्षभर पर्यटक इथे मोठी गर्दी करतात. सांदन दरीतल्या निमुळत्या वाटेवरून पुढे जात रात्री तिथेच मुक्काम करायचा हा इथे आलेल्या अनेकांचा प्लॅन असतो. ही चिंचोळी वाट पुढे इतकी निमुळती होत जाते की, कित्येक ठिकाणी सूर्याचा प्रकाश जमिनीपर्यंत पोहचत नाही. समोर आजोबा पर्वत, रतनगड आणि मागे अलंग-मदन-कुलंग गड आणि कळसुबाई शिखर सह्याद्रीच्या विशालतेची साक्ष देत असताना ही सांदन दरी सर करणे एक आनंददायी अनुभव आहे. सांदन दरीतील उतरण आणि चढण आपल्याला वाटते तितकी सोपी नाही. हलक्या आणि चपळ व्यक्तीला हे सहज शक्य आहे .
सर्वात खोल दरी
आशिया खंडातील सर्वात खोल दऱ्यांमध्ये 'सांदन व्हॅली'चा दुसरा क्रमांक लागतो. म्हणूनच ती पाहण्यासाठी जगभरातून पर्यटक इथे गर्दी करतात. एका अतिप्राचीन जिओग्राफिक फॉल्टलाईन (भौगोलिक प्रस्तरभंग रेषा) म्हणजे जमिनीला पडलेली एक मोठी भेग यामुळे निर्माण झालेली ही दरी किंवा घळ हा निसर्गाचा अद्भुत असा चमत्कारच आहे. सांदन दरी काही ठिकाणी दोनशे ते चारशे फुट खोल आणि जवळ-जवळ दीड-दोन किमी लांबवर पसरलेली आहे.
कधी भेट द्याल?
पावसळ्यात सांदन दरीला जाणे अशक्य आणि धोक्याचे असते. कारण पावसाचे पाणी याच दरीतुन वेगाने खाली कोसळते. तरीही काही स्थानिक लोक पावसाचे प्रमाण कमी असल्यास भेट देतात . काही हौशी ट्रेकर्स कॅम्प आयोजित करतात . येथे जाण्याचा उत्तम कालावधी म्हणजे किंवा . म्हणजे ऑक्टोबर ते मे अर्थात हिवाळा आणि उन्हाळा. दुपारच्या प्रहरात दरीतील ऊन-सावल्यांचा खेळ बघण्यासारखा असतो. दरीत गेल्यावर मार्गक्रमण करताना पाण्याचे दोन पुल लागतात. पहिला पुल 2 ते 4 फुट आणि दुसरा पुल 4 ते 6 फुट पाण्यात असतो.उन्हाळ्यापेक्षा हिवाळ्यात या पाण्याची पातळी थोडी अधिक असू शकते.
कसे पोहोचाल?
'सांदन व्हॅली'ला पोहचण्यासाठी अहमदनगर जिल्ह्यातील भंडारदरा धरणाच्या जलाशयाच्या काठाने साम्रद या गावी जावे लागते. पुण्यावरुन पोहचण्यासाठी आळेफाटा- संगमनेर-अकोले- राजूर-शेंडी(भंडारदरा)-उडदावणे-साम्रद असा रस्ता आहे. मुंबईकरांसाठी कल्याण-कसारा घाट-इगतपुरी-घोटी मार्गे शेंडीला पोहचता येते. तर नाशिकहूनही घोटीमार्गे - भंडारदरा - साम्रद असे सांदन व्हॅली ला पोहचता येते.
काय-काय बघाल?
घळीच्या मुखाजवळच उजव्या हाताला पाणवठा आहे. नैसर्गिकपणे डोंगरातून झिरपणारे थंडगार नितळ पाणी म्हणजे जणू अमृतच! माणसं आणि जनावरांसाठी दगड रचून वेगळी सोय केलेली दिसते. अतिशय अरुंद घळ, कधी बारा पंधरा फूट तर कधी चार -सहा फूटा पेक्षा कमी जागा अगदीच जेमतेम दोन माणसांना जाता येईल एवढी चिंचोळी जागा .त्या चिंचोळ्या भागातून जाताना वर पहिलं तर आकाश दिसत नाही. दोन्ही बाजूंना अंगावर येणारा कातळ कडा . दगडी कातळ कमीतकमी दोनशे आणि जास्तीत जास्त चारशे फूट उंचीचा पाषाणकडा आहे. त्याच घळीतून खाली उतरत दरीच्या अगदी शेवटच्या मुखाशी जाता येते. या निमुळत्या घळीची लांबी अंदाजे एक किलोमीटर आहे. घळी च्या मुखाशी कोकणचे नयनरम्य दृश्य पहावयास मिळते .
त्यानंतर समोर विराट कोकणकड्याचा भाग दिसतो. एकदम हजार दीडहजार फुटांचा ड्रॉप आणि समोर करुळ घाटाचा कडा आहे. सांदन घळीत पावसाळ्यात काही ठिकाणी बरेच पाणी भरते. त्यामुळे त्या जागा थोड्या जपूनच किंबहुना दोराच्या आधारानेच पार कराव्यात. तुम्हीही येत्या सुट्टीत 'सांदन व्हॅली'ला भेट देण्याची योजना आखत असाल, तर मुक्कामाची आणि जेवणाची सोय जवळच्या साम्रद गावात होऊ शकते. मग वाट कसली बघताय? बॅग भरा आणि चला सांधण दरीच्या सफरीला...
फक्त सांदन व्हॅली साठी जाऊच नका .जवळच महाराष्ट्राचे एव्हरेस्ट कळसुबाई शिखर आहे . रतनगड आहे , कोकणकडा, घाटघर धरण , चोंडा रिव्हर्स वॉटर लेक , भंडारदरा धरण आहे. पूर्वेला 110 किमी अंतरावर शिर्डी आहे .दक्षिणेला आळेफाटा ते शिरूर दरम्यान निघोज येथे पॉट होल्स म्हणजे रांजण खळगे आहेत.
आपल्या डोळ्याखालून अशी चमत्कारिक निसर्ग दृश्य आपण पहिली पाहिजेत .....
आमचे नियोजन
उषःकाल ट्रेक अँड टूर्सच्या वतीने कळसुबाई व रतनगड हा ट्रेक यशस्वीपणे पूर्ण केला .29 जानेवारी 2021 ला वसंत नारायण माने सर काराजनगी शाळेत आले आणि कळसुबाई शिखर गिर्यारोहण नियोजन असल्याचे सांगितले. राहुल टकले सरांनी चांगले नियोजन केले होते .या आधी त्यांनी वासोटा किल्ला ट्रेकिंग केले होते. सर्व ट्रेकर्सना राहुल सरांनी आधीच माहिती दिली .
सर्व ट्रेकर्सचे भटकंती एक्सप्रेस अंतर्गत उषःकाल ट्रेकर्स ग्रुप तर्फे सहर्ष स्वागत.
आपण सर्वजण कळसुबाई या महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखरावर आणि शेजारी असलेल्या रतनगडावर ट्रेकिंग करण्यासाठी जाणार आहोत .
सदर प्रोग्राम खालील प्रमाणे राहील
🛑शनिवारी दुपारी ठीक चार वाजता सांगोला (जि-सोलापूर) येथून आपण कळसुबाई कडे प्रस्थान करू.
🌍साधारणपणे नऊ तासाचा प्रवास करून आपण कळसूबाईच्या पायथ्याशी बारी या गावात पोहोचू.
🎪 तंबूमध्ये पहाटे पाच वाजेपर्यंत मुक्काम करू.
पाच वाजता कळसुबाई शिखर सर करण्यासाठी निघू. शिखरावरती बघण्यासारखे काही नाही परंतु आपण पण
🌄 जर सूर्योदयापूर्वी शिखरावर दाखल झालो तर शिखरावर वरून दिसणारा सूर्योदय हा विलोभनीय आहे.
धबधबा पॉईंट , दरी विव्ह पॉईंट आणि सह्याद्रीच्या इतर रांगा इत्यादी नजरेखाली घालता येतात.
🛑एक तासाच्या विश्रांतीनंतर आपण शिखरावरून खाली उतरू.
🛑शिखराच्या पायथ्याशी घरगुती जेवणाचा आस्वाद घेऊ.
आपण येथूनच सहा किमी अंतरावर भंडारदरा धरण पाहू.
🛑 पुढे 12 किमी असणाऱ्या सांदन व्हॅली या निसर्गरम्य दरीकडे प्रस्थान करू.सायंकाळी पाच ते सहा वाजेपर्यंत व्हॅलीमध्ये मध्ये फिरु.
🛑 पुढे 5-6 किमी असणाऱ्या रतनगडाच्या पायथ्याशी मुक्काम ला जाऊ.
🌍 मुक्काम झाल्यावर सोमवारी सकाळी आपण रतनगड ट्रेकला जाऊ. सायंकाळी पाच वाजता परतीच्या प्रवासाला लागू.
🛑🛑🛑🛑 महत्त्वाचे 🛑🛑🛑🛑
आपण ट्रेकिंगसाठी जाणार आहोत, हे लक्षात घेऊन आपले कपडे हे सैल, आरामदायी असावेत. पायांमध्ये बूट असावेत.
🛑कळसूबाई ला थंडी असल्याने थंडीपासून संरक्षणासाठी उबदार कपडे असावेत.
🛑 सोबत एक बॅटरी असावी. चालताना त्रास होऊ नये म्हणून काठी असावी ..
एनर्जी वाढवणारे खाद्यपदार्थ घ्यावेत ,जसे गुळ ,लेमन गोळ्या, ड्रायफ्रूट, तिळाच्या पोळ्या इत्यादी .
शनिवारी संध्याकाळचे भोजन घरून सोबत घ्यायचे आहे .
जेवण सोबत घेताना आपणाला जेवढे लागते तेवढेच घ्यावे. शिळे राहील इतके जेवण घेऊ नये..
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
या ब्लॉगच्या होम पेज वरील कॅटेगरी (catagory ) वरील ऑप्शन ला जा आणि इतर ब्लॉग वाचा .आवडलेला ब्लॉग आपल्या मित्रांना ,सहकाऱ्यांना whatsapp, facebook द्वारे शेअर करा .
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
#####################################
No comments:
Post a Comment