ग्रहणे हा तर खगोलीय छाया प्रकाशाचा खेळ .
आज 21 जून 2020 ला एक सुंदर खगोलीय घटना अर्थात छाया प्रकाशाचा खेळ घडणार आहे; ती घटना म्हणजे सूर्यग्रहण. हे सूर्यग्रहण उत्तर भारतातून डेहराडून,कुरुक्षेत्र आणि इतर काही भागात कंकणाकृती दिसेल तर उर्वरित भारतात हे ग्रहण खंडग्रास स्वरूपात दिसेल.
आजच्या विज्ञान युगात खगोलीय चमत्कार कसे घडतात हे पाहून , ते का घडतात याचं करण आपण शोधायला लावण्यापेक्षा , ग्रहण पाळून अंधश्रद्धा पसरवण्याचे काम काहीजण करतात.
पण सध्या श्रद्धेपेक्षा अंधश्रद्धेचे अवडंबर जास्त माजवले जात आहे.सोशल मीडियावर ग्रहण कसे पाहावे ? त्याची शास्त्रीय माहिती देण्यापेक्षा ग्रहण कसे पाळावे ? याची भीती पसरवणारे मेसेज पसरवले जात आहेत.
छादयति शशी सूर्यं शशिनं महती च भूच्छाया
भारतीय खगोल शास्त्रज्ञांनी देखील हेच सत्य वारंवार सांगितले आहे.असे असतांना संस्कृतीच्या नावाखाली आपण निरर्थक अंधश्रद्धा पाळत हास्यास्पद कृत्ये करत असू तर आपण वैज्ञानिक वारसा असणाऱ्या आपल्याच भारतीय संस्कृतीचा आपण अपमान करत आहोत.
त्यामुळे कुठलीही अंधश्रद्धा न बाळगता ग्रहण बघणे, इतरांना बघायला लावणे आणि गैरसमजांचे निराकरण करणे हाच खरा भारतीय संस्कृतीचा सन्मान होय !
ग्रहणाविषयी अनेक अंधश्रद्धा आणि गैरसमज समाजात प्रचलित आहेत. अशाच काही गैरसमजांचे निराकरण करण्याचा हा छोटासा प्रयत्न!
गैरसमज 1:
ग्रहण अशुभ असते. ग्रहणे पाहू नयेत.
ग्रहण अशुभ असते. ग्रहणे पाहू नयेत.
ग्रहण ही खगोलीय घटना आहे.जेव्हा सूर्य, चंद्र आणि पृथ्वी हे एका रेषेत येतात तेव्हा चंद्रामुळे सूर्यबिंब झाकले जाऊन सूर्यग्रहण होते. यात शुभ-अशुभ असे काही नाही.
गैरसमज 2:
ग्रहणात हवा अशुद्ध होते
सुर्यग्रहणात चंद्राची सावली पृथ्वीच्या काही भागावर पडते.सावली ही सावलीच असते.झाडाची सावली,डोंगराची सावली किंवा चंद्राची सावली सारखीच असते.जर झाडाच्या सावलीत हवा अशुद्ध होत नसेल तर चंद्राच्या सावलीत देखील होणार नाही कशावरून ? आणि हो आपण दररोज पृथ्वी च्या सावलीत राहतो ना !

गैरसमज 3:
पाणी अशुद्ध होते -ग्रहण सुटल्यावर घरातील पाणी ओतून टाकून नवीन पाणी भरावे.
ग्रहणात जर घरातील पाणी अशुद्ध होत असेल तर शुद्ध कताफ
ग्रहणात जर घरातील पाणी अशुद्ध होत असेल तर शुद्ध कताफ
विहिर टाकीतले, नदीतले ,धरणातले पाणी सुद्धा अशुद्ध व्हायला हवे.घरातील पाणी ओतून देऊन टाकीतले पाणी भरणे हे तर्क दृष्ट्या सुद्धा हास्यास्पद आहे.घरातले पाणी झाकून ठेऊ पण संपूर्ण धरण उघड्यावर आहे त्याचे काय करणार??
गैरसमज 4:
ग्रहणात शरीर अशुद्ध होते म्हणून ग्रहण सुटल्यानंतर शरीरशुद्धीसाठी स्नान करावे.
जर चंद्राच्या सावलीत आपले शरीर अशुद्ध होत असेल तर झाडाच्या सावलीत, इमारतीच्या सावलीत पण व्हायला हवे.आणि जर पाणी अशुद्ध होत असेल तर अशुद्ध पाण्याने अंघोळ करून शरीर शुद्ध कसे होणार?

गैरसमज 5:
ग्रहणात अन्न दुषित होते ,ग्रहणात काहीही खाऊ नये. ग्रहणा आधीचे अन्न टाकून द्यावे.
ग्रहणानंतर घरातील अन्न पदार्थ जर फेकून दिले जात असतील तर सगळी शेते उघड्यावर आहेत.त्यांचे काय??शेतातील धान्य, बाजारातील अन्नपदार्थ, हे जर चालत असतील तर घरात शिजवलेल्या अन्नच कस दूषित होते??ग्रहणात जरी काही खाल्ले नाही तरी ग्रहणापूर्वी खाल्लेले अन्न पोटात असणार.ते पण दूषित होऊन विषबाधा व्हायला हवी पण तसे होताना दिसत नाही.

गैरसमज 6:
ग्रहणकालात झोपू नये
खरतर एवढी दुर्मिळ खगोलीय घटना होताना ग्राहणाचे विलोभनीय दृश्य पहायचे सोडून झोपा काढणे हा कपाळकरंटेपणाच म्हणायला हवा.पण ग्रहणात झोप काढली तरी काही फरक पडत नाही.
ग्रहणकालात झोपू नये
खरतर एवढी दुर्मिळ खगोलीय घटना होताना ग्राहणाचे विलोभनीय दृश्य पहायचे सोडून झोपा काढणे हा कपाळकरंटेपणाच म्हणायला हवा.पण ग्रहणात झोप काढली तरी काही फरक पडत नाही.
गैरसमज :7
ग्रहणकालात गरोदर महिलांनी ग्रहण पाहू नये.
ग्रहणकालात गरोदर महिलांनी ग्रहण पाहू नये.
ग्रहणकालात गरोदर महिलांनी ग्रहण पाहू नये. ग्रहणाचे नियम न पाळल्यास विकृत शरीराचे मूल जन्माला येते.
एका वर्षात कमीत कमी 4 आणि जास्तीतजास्त 7 ग्रहणे होऊ शकतात. जगात एकाच वेळी लाखो स्त्रिया गर्भवती असतात. तेव्हा जर असे काही झाले असते, तर जगाची निम्मी लोकसंख्या शारीरिक विकृत असायला हवी होती. ग्रहणाचा परिणाम जपान, अमेरिकन,ऑस्ट्रेलिया, आफ्रिकन, चिनी, पाकिस्तानी गरोदर स्त्रियांवर न होता फक्त भारतीय स्त्रियांवरच कसा काय होतो?

ग्रहण पाहताना घ्यावयाची काळजी
खंडग्रास सूर्यग्रहण पाहताना ग्रहण पाहण्याकरिता तयार केलेले विशेष चष्मे किंवा काजळी लावलेली काळी काच किंवा सूर्याचे प्रखर किरण डोळ्यांपर्यंत पोचू नयेत याकरिता उपलब्ध साधनांचा वापर करून ग्रहण पाहावे.
या सूर्यग्रहणाचे विशेष आकर्षण:
ग्रहण काळात गरोदर माता भाजी चिरणार! जेवण करणार!
आपल्याकडे ढगाळ वातावरण असेल तर चिंता करू नका, फेसबुक लाईव्ह सूर्यग्रहणाचा आनंद घ्या!
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती शाखा इस्लामपूर यांचे वतीने उद्या रविवारी 21 जून रोजी सकाळी 10 ते 2 या वेळेत (ग्रहण काळात) सूर्यग्रहणाचे फेसबुक लाईव्ह कार्यक्रम होणार आहे, यामध्ये सूर्यग्रहणाचा विलोभनीय नजराणा पाहता येईल.
सूर्यग्रहणाच्या काळात एक धाडसी गरोदर माता ग्रहणा संबधी अंधश्रद्धा दूर करण्यासाठी स्वत: भाजी चिरणार, जेवण करणार आहे. याचेही लाईव्ह प्रेक्षपण होणार आहे.
उदयाच्या सूर्यग्रहणाचा लाईव्ह आनंद घेण्यासाठी खालील लिंकवर जावा.
उदयाच्या सूर्यग्रहणाचा लाईव्ह आनंद घेण्यासाठी खालील लिंकवर जावा.
https://www.facebook.com/MaharashtraANiS/
( हा लेख लिहिण्याचा उद्देश केवळ वैज्ञानिक माहिती देणे हा आहे . श्रद्धा आणि अंधश्रद्धा यातील फरक लक्षात येण्यासाठी हा लेखनप्रपंच...
धन्यवाद ! )
🙏🙏🙏🙏🙏
इतर आणखी काही लेख वाचण्यासाठी माझ्या
bhausahebmahanor.blogspot.com
ला भेट द्या./ ब्लॉगला फॉलो करा ./subscribe करा ....
🙏🙏🙏🙏🙏
🙏🙏share करण्या साठी निळ्या रंगामधील whatsapp किंवा facebook वर टच करा.🙏🙏

ग्रहण काळाविषयी चांगली माहिती दिली आहे, लोकांच्या मनातील गैरसमज व अंधश्रद्धा निर्मुलन करण्याचा चांगला प्रयत्न केला आहे असेच कार्य करण्यासाठी शुभेच्छा
ReplyDeleteधन्यवाद