माझे इतर लेख वाचण्यासाठी ब्लॉगच्या होम पेज वर कॅटेगरी (catagory ) वरील ऑप्शनला जा आणि आपल्या आवडीचा ब्लॉग वाचा. आवडलेला ब्लॉग आपल्या मित्रांना ,सहकाऱ्यांना whatsapp, facebook द्वारे शेअर करा. किंवा पेजची लिंक तुमच्या whatsapp ग्रुपला share करा.धन्यवाद.....!

Sunday, June 07, 2020

शिक्षणापेक्षा जीव महत्वाचा






        कोरोनाचा प्रादुर्भाव संपेपर्यंत शाळा नकोच ;
                       पालक आक्रमक

शिक्षणापेक्षाही जिवंत राहण्याचा प्रश्न महत्त्वाचाआहे.

   राज्यात आणि देशात  कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे रुग्णसंख्या दिवसेंदिवस  अजूनही  वाढत चालली आहे. कोरोनाचा वाढता  प्रादुर्भाव  असताना परवा महाराष्ट्र शासनाने   23 नोव्हेंबरला  शासन निर्णयानुसार शाळा सुरू होणार असे समजताच  पालकांना धक्काच बसला आहे 

 पालकांना धक्का बसला .
 मुलांच्या  शिक्षणापेक्षा मुलांच्या जीविता बाबत पालक अधिक संवेदनशील आहेत. राज्याच्या शिक्षण विभागाने दि.23  नोव्हेंबरला  शाळा    सुरु करण्याचा निर्णय घेतला. त्या निर्णयावर अनेक  पालक आणि शिक्षकांनी आपले  मत व्यक्त केले. मुलांच्या जिवंत राहण्याचा प्रश्न महत्वाचा  असताना शासनाने शाळा सुरु करण्याची घाई करू नये. विद्यार्थ्यांच्या  सुरक्षिततेला प्राधान्य देऊन मगच पुढचा निर्णय घ्यावा, असे मत सर्रास  पालक, शिक्षकांकडून  व्यक्त होत आहे. प्राथमिक शाळेतील सहा ते  चौदा वर्षांच्या आतील मुलांना घराबाहेर पडू द्यायचं नाही, त्यांची  प्रतिकार क्षमता कमी असते .असे असताना कोरोनाचा धोका टळेपर्यंत मुलांना शाळेत पाठवणं कुणालाही  पटत नाही.
चार सहा महिने शाळेत उशिरा गेले किंवा सर्वांचे एखादे वर्ष उशिराने सुरू झाले तर फार नुसकान  होणार नाही . समूह आरोग्यापेक्षा  चार महिन्याचे शिक्षण  फारसे महत्वाचे नाही.
 2020 है शैक्षणिक वर्ष मुलांच्या आयुष्यात नव्हतंच, असं काही पालकांचं मत आहे. कोरोनाची धास्त विद्यार्थी, शिक्षक, मुख्याध्यापक या सर्वानाच आहे.


 मुलांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, या उद्देशाने शासन शाळा सुरु करण्याचा विचार करत आहे. शासनाने निर्देशित कार्यानुसार जिल्हा परिषद व खासगी शाळांमध्ये आवश्यक खबरदारी घेण्यात येईल. पालक आणि शिक्षकांनी कोरोनापासून बचाव करण्यासाठी खबरदारी घ्यावी .त्यांना प्रशिक्षण दयावे हे सारे गरजेचे आहे. हे सारे खरे असले तरी  कोरोनाचे संकट टळेपर्यंत मुलांना शाळेत पाठवायचं नाही, या विचारापर्यंत पालक पोहोचला आहे. त्यामुळे ऑनलाईन व डिजिटल शिक्षणाचे पर्याय खुले शासनाने सांगितलेले आवश्यक उपाययोजना करून घेण्यासाठी प्रशासन सज्ज असले तरी , ही गाजराची पुंगी किती दिवस टिकेल ? पालक आणि शिक्षका इतकेच शासनही संवेदनशीलपणे याबाबत विचार करत असून त्यातून अनेक प्रश्न निकाली काढू असे वाटत असले तरी हा प्रयत्न म्हणजे वावटळात  दिवा लावण्यासारखे आहे.


मुलांना एका बेंचवर एकाला बसविणे, शाळांचे तास कमी करणे, रेड झोनमधील भागात देखील  शाळा सुरु होणार, या बाबत सध्या काहीच सांगता येत नाही.
 आजारी विद्यार्थी-शिक्षकांनी शाळेत येता येईल का ? पटसंख्या अधिक असणाऱ्या शाळा सुरू करणे किंवा वर्ग भरवणे अवघड   त्यामुळे शाळा सुरु करण्यात फार अडचणी येणार आहेत .
 वरील मुद्द्याचा विचार केला तरी पालक त्यांच्या पाल्यांना पाठविणार का? हा प्रश्न आहे. विविध शाळांमधील विद्यार्थी संख्या लक्षात घेता सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करणे, दोन सत्रांमध्ये शाळा असल्याने तेथील शाळा निश्चितच उशिरा सुरु होतील.
  विद्यार्थी शाळेत आल्यानंतर यांच्या आरोग्याची आणि स्वच्छतेची आवश्यक ती काळजी घेण्यासाठी प्रशासन सज्ज असले तरी त्यामध्ये कितपत जबाबदारी सत्य आहे कोण जाणे ? शाळा सुरु करण्याचे शासनाचे आदेश आले की आवश्यक काळजी घेऊन आम्ही त्या सुरु करू. असे जरी प्रशासन आणि मुख्याध्यापक म्हणत असले तरी याबाबत शिक्षक किती काळजी घेतील ? प्रत्येक शिक्षकाला हे काम जमेल का ? एखादा विदयार्थी किंवा शिक्षक माहिती लापावणार नाही कशावरून ?

 सध्या कोरोनाची  तीव्रता वाढणार की कमी होणार हे अजून कुणाला नक्की सांगता येत नाही. मुलांना एका बेंचवर एकाला बसविणे, शाळांचे तास कमी करणे, रेड झोनमधील भागात शाळा सुरु करणे , हे पर्याय असले तरी ते सर्व ठिकाणी वापरता येत नाहित. विविध शाळांमधील विद्यार्थी संख्या लक्षात घेता सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करणे, दोन सत्रांमध्ये शाळा असल्याने तेथील शाळा निश्चितच उशिरा सुरु होतील. त्यामुळे मुलांचे  येणे जाणे, स्वच्छतागृहांची वारंवार स्वच्छता, अशा पर्यायांचा अवलंब शिक्षण विभागाला करावा लागणार आहे. शैक्षणिक वर्षांचा आणि अभ्यासक्रमाचा ताळमेळ असावा, यासाठी अभ्यासक्रम काही प्रमाणात  बदल व्हावा . ग्रीन झोनमध्ये विद्यार्थ्यांची सुरक्षितता महत्त्वाची असणाऱ्या  शाळा सुरु होणार आहेतच आहेच; मात्र त्यांचे शैक्षणिक नुकसान
टाळले जावे, यासाठी पण तिथेही सोशल डिस्टसिन्ग पाळणे ही तारेवरची कसरत ठरणार आहे.

 डिजिटल वर्ग ,ऑनलाईन अभ्यास , व्हर्चुअल वर्ग भरविणे, आदी अनेक  ठिकाणी अडचणीचे ठरणार आहे. ऑनलाईन व डिजिटल शिक्षणाचे पर्याय खुले होणार असले तरी  केवळ  ही फॉर्मालिटी ठरणार असे दिसते.  पालक आणि शिक्षका इतकेच शासनाने देखील  या बाबतीत संवेदनशीलपणे याबाबत विचार  करायला हवा. असा सूर शिक्षकांपेक्षा पालकातून निघत आहे.

 #####$$$$####$$$$####$$$$####

( हा लेख लिहिण्याचा उद्देश केवळ कोरोना  (कोविड19)  प्रभावाने  शाळा कशा सुरू होतील , शिक्षणाचे स्वरूप कसं असू शकेल  ? याविषयी मत मांडलेले आहे . शासन, प्रशासन, शिक्षक  अथवा पालक यापैकी कुणाच्याही बाजूने हे मत मांडलेले नाही. केवळ लेखकाचे वैयक्तिक विचार आहेत . धन्यवाद ! )
#####################################
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
 इतर आणखी काही लेख वाचण्यासाठी माझ्या
 bhausahebmahanor.blogspot.com
या ब्लॉगला फॉलो करा ; की जेणेकरून नवीन लेख पब्लिश झालेची नोटीफिकेशन आपोआप मिळेल.
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
तसेच ब्लॉगच्या होम पेज वरील कॅटेगरी (catagory ) वरील ऑप्शन ला जा आणि इतर ब्लॉग वाचा .आवडलेला ब्लॉग आपल्या मित्रांना ,सहकाऱ्यांना  whatsapp, facebook द्वारे शेअर करा .
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
  एखादा ब्लॉग आवडल्यास , पोस्ट वाचताना उजव्या कोपऱ्यात वरील ऑपशन(तीन टिंब ) वर  जाऊन आपल्या मित्रांना  whatsapp किंवा facebook द्वारे  share करु शकता.
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

1 comment: