आयुष्यात सुख-दुःख किती आहे हे पाहणाऱ्याची नजर नाही तर जगणाऱ्याचं मन सांगतं. सुख हा निव्वळ आभास आहे, पण तेच शोधण्यासाठी आयुष्यभर हा सारा प्रवास आहे.
कोणतीही गोष्ट न चिडता, न रागावता समोरच्याला सांगणे हे ज्याला जमलं त्याला आयुष्य जगायचं जमलं. कारण समोरच्या वर चिडणं खूप सोप्पं आहे. पण त्याला न दुखावता त्याला ती गोष्ट सांगणं खूप अवघड आहे.निसर्गाचा नियमच आहे की ,एका जागी दुसरी गोष्ट आली की ,पहिली निघून जाते. जसे पाणी आले की धूळ किंवा घाण निघून जाते, हवा आली की उष्णता निघून जाते ,प्रकाश आला की अंधार निघून जातो तसे आपल्या मनात चांगले विचार आले की वाईट विचार आपोआप निघून जातात. जीवनात जर शांतता हवी असेल, तर दुसऱ्यांशी वाद घालण्यापेक्षा स्वतःला बदलून घ्या.कारण पूर्ण जगातच कार्पेट घालण्यापेक्षा स्वतःच्या पायात चप्पल घालणं केव्हाही चांगलं आहे.
आयुष्याच्या रस्त्यावर चालताना पडलंच पाहिजे, तेंव्हाच तर कळतं कोण हसतंय, कोण दुर्लक्ष करतंय ,आणि कोण सावरायला येतंय. कधी कधी शांतच राहणे खूप गरजेचं असते.आयुष्याकडे सगळ्याच प्रश्नाची उत्तरे मागायची नसतात. कारण ओंजळीत पाणी तर पकडू शकतो पण टिकवून नाही ठेवू शकत...पंगतीमध्ये मिठ वाढणारा पुन्हा मिठ वाढायला येत नाही तसेच आयुष्यात काही लोकं असेचं मिठासारखे असतात प्रत्यक्षात त्यांच्या असण्याने कदाचित काही फरक पडणार नाही पण त्यांच्या नसण्याने खूप फरक पडतो. त्यामुळे तुम्हाला तुमच्यासाठी महत्वाच्या वाटणा-या लोकांना जपा, कारण आयुष्याच्या पंगतीमध्ये ते कदाचित पुन्हा येणार नाहीत. "कुछ लोगों के सीने में दिल की जगह कॅल्क्युलेटर होता है । हाथ मिलाने से पहले हिसाब लगा लेते हैं । इससे मुझे कितना फायदा होनेवाला है ।"
"कोणी कसं वागावं ?"हे आपल्या हातात केव्हाच नसतं. पण त्याचा आपण स्वत:वर कितपत परिणाम करून घ्यायचा हे मात्र निश्चित आपल्या हातात असतं. वेळ येण्याची वाट पाहण्यापेक्षा वेळ आणण्यासाठी प्रयत्न केलेले कधीही चांगलेच.
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
या ब्लॉगच्या होम पेज वरील कॅटेगरी (catagory ) वरील ऑप्शन ला जा आणि इतर ब्लॉग वाचा .आवडलेला ब्लॉग आपल्या मित्रांना ,सहकाऱ्यांना whatsapp, facebook द्वारे शेअर करा .
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
*श्री.भाऊसाहेब महानोर, जत.*
No comments:
Post a Comment