माझे इतर लेख वाचण्यासाठी ब्लॉगच्या होम पेज वर कॅटेगरी (catagory ) वरील ऑप्शनला जा आणि आपल्या आवडीचा ब्लॉग वाचा. आवडलेला ब्लॉग आपल्या मित्रांना ,सहकाऱ्यांना whatsapp, facebook द्वारे शेअर करा. किंवा पेजची लिंक तुमच्या whatsapp ग्रुपला share करा.धन्यवाद.....!

Monday, June 15, 2020

महाराष्ट्रातील शाळा ऑनलाईन सुरू....!



 कोरोना ( कोविड19) विषाणू प्रादुर्भावाचा परिणाम

  
कोरोना ( कोविड19) विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर 
विदर्भ वगळता  राज्यातील शाळा   मागील वर्षी प्रमाणे याही  वर्षी  विद्यार्थ्यांविना ऑनलाईन सुरू झाल्या. 

दिनांक 16 मार्च  2020 पासून शाळा  बंद आहेत . शैक्षणिक वर्ष 2020/21 मध्ये  अल्पशा  शाळा सुरू झाल्या .चालू शैक्षणिक वर्षात मात्र ऑनलाईन शाळा सुरू होत आहेत. पालक आणि शिक्षक यांच्यामध्ये मात्र चिंतेचे वातावरण आहे .
  महाराष्ट्र शासन ,  शिक्षण तज्ञ ,शिक्षक आणि पालक  यांच्या मते कोरोनाचे संकट अद्याप दूर झाले नसल्याने शाळा सुरु करण्याबाबत कोणताही निर्णय घेऊ नये असे मत आहे . त्यामुळे फेस टू फेस शाळा सुरू करण्याविषयी  पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये  संभ्रम  तसाच आहे.

  




चालू शैक्षणिक वर्ष दि.15 जून पासून सुरू होत आहे. विद्यार्थ्यांना मात्र शाळेत बोलावले नाही. 
महाराष्ट्र शासनाच्या आणि  CEO साहेबांच्या आदेशानुसार दिनांक 15 जून 2020 पासून औपचारिक रित्या शैक्षणिक वर्षाला सुरुवात झाली. 

व्हाट्सअप्प, Uट्यूब, दीक्षा अँप, ब्लॉग, स्वनिर्मित व्हिडीओ, सह्याद्री वहिनी, इत्यादींच्या माध्यमातून शैक्षणिक वर्ष सुरू होत आहे. ऑफलाईन इतके ऑनलाईन शिक्षण प्रभावी ठरत नाही. पण आपणाला शांत बसूनही चालणार नाही. गेल्या वर्षीपेक्षा अधिक प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे . 

या वर्षी नवीन पाठ्यपुस्तक छपाई झाली नसल्याने जुनी  पाठ्यपुस्तके जमा करून घेऊन पुन्हा नव्या इयत्तेची पाठ्यपुस्तके  विदयार्थ्यांना घरपोच दिली जात आहेत.


नावागतांचे स्वागत सुनेसुने

             प्रति वर्षीप्रमाणे शाळेचा पहिला दिवस हा उत्सवाचा असतो .शाळेत नावागतांचं जंगी स्वागत केले जाते. बँड पथक लावून गावातून फेरी काढली जाते. गुलाब पुष्प देऊन शाळेत येणाऱ्या प्रत्येक बालकांचे स्वागत केले जाते. शाळा सुरू होण्यापूर्वी शाळा व्यवस्थापन समितीची बैठक घेतली जाते. नव्या वर्षात आपली शाळा कोणत्या पद्धतीने वाटचाल करेल याचा बैठकीमध्ये आढावा घेतला जातो . 

उन्हाळी सुट्टीत बंद असणारी शाळा 15 जूनला पाखरांच्या पहाट किलबिलापमाणे भासत असते ....

पण याही वर्षी 15  जून , शाळेचा स्वागतोत्सव सुनासुना गेला .


शैक्षणिक वर्ष सुरू झाले,........
पण पाखरांची किलबिलाट मात्र कानी आला नाही . शिक्षक   14 जून पर्यंत शासनाच्या जी.आर.ची वाट पाहत होते. पण त्याच्या सूचना 14 तारखेला प्राप्त झाल्या. शिक्षक जुनी  पाठ्यपुस्तके ताब्यात घेत आहेत, आणि पुढच्या इयत्तेची पुस्तके विद्यार्थ्यांना वाटप करत आहेत  .







पाठ्यपुस्तके घ्यायला आणि विद्यार्थी शाळेत यायला अधीर झालेले आहेत. पण कोरोनामुळे गर्दी करता येत नाही. जे विद्यार्थी शाळेच्या जवळ राहात होती , त्यांना हस्तेपरस्ते मेसेज पाठवून , त्यांच्या घरी जाऊन पुस्तके वाटली .पण ज्या शाळेचा पट 200 किंवा त्यापेक्षा जास्त आहे त्या शाळेतील प्रत्येक इयत्तेतील पट साधारण 23 ते 28 असतो .तेव्हा वाडी वस्तीवर राहणाऱ्या सहावी ते आठवी च्या विद्यर्थ्यांची पाठ्यपुस्तके बॅग मध्ये घेऊन घरोघरी वाटायला आज फारच  दमछाक होत आहे . पाठ्यपुस्तके वाटायला फार वेळ लागत आहे.............!

आज शाळेच्या पहिल्या दिवशी घणघणणारी घंटा आज घणघणली नाही .  चिमुकल्यांकडून गुड मॉर्निंग नाही ,ना वेलकम , ना टाटा , ना बाय बाय ....तरीही .....शाळा सुरू झाल्या त्या ही ऑनलाईन.......!  आज दिनांक 15 जून शैक्षणिक वर्ष 2021/22 सुरू झाले, 
शाळा सुरू झाल्या. 
पण विद्यार्थ्यांविना.............................!

#####$$$$####$$$$####$$$$####

( हा लेख लिहिण्याचा उद्देश केवळ कोरोना  (कोविड19)  प्रभावाने  शाळा कशा सुरू झाल्या  ? याविषयी मत मांडलेले आहे . शासन, प्रशासन, शिक्षक  अथवा पालक यापैकी कुणाच्याही बाजूने  अगर  विरोधात हे मत मांडलेले नाही. केवळ लेखकाचे वैयक्तिक विचार आहेत . धन्यवाद ! )
 #####$$$$####$$$$####$$$$####

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

 इतर आणखी काही लेख वाचण्यासाठी माझ्या
bhausahebmahanor.blogspot.com
  या ब्लॉगच्या होम पेज वरील कॅटेगरी (catagory ) वरील ऑप्शन ला जा आणि इतर ब्लॉग वाचा .आवडलेला ब्लॉग आपल्या मित्रांना ,सहकाऱ्यांना  whatsapp, facebook द्वारे शेअर करा .
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
 भविष्यात इतर आणखी काही लेख वाचण्यासाठी माझ्या
 bhausahebmahanor.blogspot.com
या ब्लॉगला फॉलो करा ; की जेणेकरून नवीन लेख पब्लिश झालेची नोटीफिकेशन आपोआप मिळेल.
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  एखादा ब्लॉग आवडल्यास , पोस्ट वाचताना उजव्या कोपऱ्यात वरील ऑपशन(तीन टिंब ) वर  जाऊन आपल्या मित्रांना  whatsapp किंवा facebook द्वारे  share करु शकता.किंवा आपल्याला आलेली  लिंक शेअर/फॉरवर्ड करा.
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏


 इतर आणखी काही लेख वाचण्यासाठी माझ्या
 bhausahebmahanor.blogspot.com
ला भेट द्या./ ब्लॉगला फॉलो करा ./subscribe करा

No comments:

Post a Comment