कोरोना ( कोविड 19) च्या प्रादुर्भावामूळे पालक संभ्रमात
कोरोना ( कोविड 19) च्या प्रादुर्भावामूळे दि.16 मार्च पासून शाळेची घंटा बंद झाली आहे. दि.15 जून 2020 रोजी तब्बल तीन महिने झाले. सन 2020/ 21 शैक्षणिकवर्ष सुरू होत आहे.परंतु शाळा सुरू करण्यात अनेक अडचणी समोर उभ्या ठाकत आहेत. अशात कोरोनाच्या प्रभावाखाली शाळांचे शैक्षणिक सत्र सुरू करण्याचा घाट घातला जात आहे. कोरोनाच्या साथीत शाळा कशा सुरू होणार? हे केवळ येणारा काळ सांगेल.
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सोशल डिस्टंसिंग पाळण्यासाठी सोशल गॅदरिंग टाळले पाहिजेत. तेव्हा मग शाळा कशा सुरू करता येतील ? यामध्ये अनेक अडचणींना फेसिंग करावे लागणार आहे.
ऑनलाईन शिक्षण हा पर्याय उपलब्ध असला तर तो कुचकामी ठरत आहे, कारण जिल्हा परिषद शाळेत शिकणाऱ्या मुलांकडे फक्त 26 टक्के विद्यार्थ्यांकडे स्मार्ट फोन उपलब्ध आहेत. उरलेल्या 74 टक्के विद्यार्थ्यांचे शिक्षण कसे होणार ?
26 टक्के स्मार्टफोन उपलब्ध असणाऱ्या पालकांमध्ये , काहीजणांच्या दोन दोन मुले शाळा शिकतात. अनेक एकत्र कुटुंबांमध्ये चार ते सहा पाल्य शाळा शिकतात .
त्यांच्या घरी एकच सामूहिक स्मार्ट फोन असतो. शिवाय वेगवेगळ्या इयत्तांमध्ये पाल्य शिकत असतात. तसेच पालक कामानिमित्त बाहेर जातात. तेव्हा पालक फोन घेऊन जातात. त्याचबरोबर डोंगराळ भागात नेटवर्क किती उपलब्ध आहे त्यावर अवलंबून आहे. शिवाय पावसाळ्यामुळे वीज खंडित होऊन नेटवर्क आणि डाटा चा प्रश्न उद्भवणार आहे. ऑन्लाइन शिक्षण किती लक्षपूर्वक करणार तोही एक प्रश्न आहे.

ऑनलाइन शिक्षाणाला पर्याय म्हणजे इयत्ता वाईज प्रत्येक वर्गाला TV चॅनल चालू करणे. TV समोर प्रत्येक विद्यार्थी सोशल डिस्टनसिंग पाळू शकेल .त्याचबरोबर प्रिलोडेड टॅब द्वारे देखील शिक्षण होऊ शकेल पण टॅब विकत घेणे हे सर्व पालकांना शक्य आहे का?
कोरोना संपुष्टात आल्याशिवाय पालक आपल्या पाल्याला शाळेत पाठवणार नाहीत. असा पालकांनी ठाम निर्धार केला आहे. काही पालक म्हणतात की, " आधी लस मगच शाळा. " याला प्रशासन आणि सरकार यांच्याकडे ठोस उत्तर नाही.
कोणत्याही शाळेला सोशल डिस्टनसिंग पाळणे ,मला तरी वाटत नाही की हे शक्य होईल. अध्यापन करताना ,अभ्यास तपासताना ,खेळ घेताना ,सकाळी शाळा भरताना आणि शाळा सुटताना सोशल डिस्टनसिंग कसे पाळणार ?
एका बेंचवर एक विद्यार्थी बसवले तर उरलेल्या विद्यार्थ्यांचे काय ? शाळेतील प्रत्येक विद्यार्थी आपापल्या मित्रांसोबत वही, डबा ,पेन ,बॉटल, शेअर करणार नाहीत आणि करता येणार नाही. प्रत्येक वेळी हे सॅनिटायझ करायचं का ? दैनंदिन परिपाठ घेता येणार नाही.

गतीमंद आणि अप्रगत यासारख्या विद्यार्थ्यांना जवळ घेऊन शिकवावे लागते. हातात हात घेऊन अक्षर गिरवावी लागतात. तसेच प्रयत्नवादी विद्यार्थ्यांना शाबासकीची थाप द्यावी लागते. त्यामधून त्यांना प्ररणा मिळते. हे प्रलोभन सोशल डिस्टनसिंग पाळावे लागल्याने देता येणार नाही. त्यामुळे कोरोनाच्या प्रभावाखाली शिक्षण कसे होणार हे कुणी कसे सांगणार?
देश किंवा राज्य अनलॉक केल्यानंतर शाळेत पूर्वीसारखी किलबिलाट ऐकायला येईल का ?
उत्तर नाही असं आहे ना !
उत्तर नाही असं आहे ना !
( हा लेख लिहिण्याचा उद्देश केवळ कोरोना (कोविड19) प्रभावाने शाळा कशा सुरू होतील ? याविषयी मत मांडलेले आहे . शासन, प्रशासन, शिक्षक अथवा पालक यापैकी कुणाच्याही बाजूने हे मत मांडलेले नाही. केवळ लेखकाचे वैयक्तिक विचार आहेत . धन्यवाद ! )
🙏🙏🙏🙏🙏
इतर आणखी काही लेख वाचण्यासाठी माझ्या
bhausahebmahanor.blogspot.com
ला भेट द्या./ ब्लॉगला फॉलो करा ./subscribe करा ....
🙏🙏🙏🙏🙏
🙏🙏share करण्या साठी निळ्या रंगामधील whatsapp किंवा facebook वर टच करा.🙏🙏
No comments:
Post a Comment