माझे इतर लेख वाचण्यासाठी ब्लॉगच्या होम पेज वर कॅटेगरी (catagory ) वरील ऑप्शनला जा आणि आपल्या आवडीचा ब्लॉग वाचा. आवडलेला ब्लॉग आपल्या मित्रांना ,सहकाऱ्यांना whatsapp, facebook द्वारे शेअर करा. किंवा पेजची लिंक तुमच्या whatsapp ग्रुपला share करा.धन्यवाद.....!

Friday, May 01, 2020

खरं प्रेम कुणावर ?

खरं  प्रेम  कुणावर ?


लहाणपणापासून मुलांना  जास्तीत जास्त  वस्तू देऊन आपण त्याला खेळण्यात दंग करतो. त्या मुलानने वास्तविक आई  वडील ,भाऊ, बहीण , काका काकू यांच्या बरोबर  गप्पा मारल्या पाहिजेत. त्याने खेळलें पाहिजे, इतराशी बोललं पाहिजे . तेव्हा  त्याचे व्यक्तीमत्व समाजात मिसळतं. आपणच त्या मुलाला सवय लावतो , बाहेरून येतांना चॉकलेट आणतो. कामावरून ,दुकानातून किंवा बाजारातून येतांना चॉकलेट आणतात म्हणजे आणतात. तेव्हा नकळत त्या मुलाला सवय लागते.  मग ते मूल, घरात कामावरून आई येऊ दे किवा बाबा येऊ दे.  घरत  कोण प्रवेश केलं याच्याकडं लक्ष देत नाही तर त्याच्यासोबत चॉकलेट आहे का?  हे बघतं. आईबाप घरात आल्याचा मुलाला आनंद झाला पाहिजे. आपले नातेवाईक घरात आल्याचा आनंद मुलाला झाला पाहिजे. पण चॉकलेट घरात आल्याचा  आनंद जास्त होतो.
             आपलं प्रोटेक्शन   घरात आलं, आपलं संरक्षण  आलं,यापेक्षा चॉकलेटवर जास्त प्रेम असल्याने वृद्धाश्रमाची  संख्या वाढत आहे. यात तीळमात्र शंका नाही. असं  प्रेम करायला मुलांना आपणच शिकवतो ना.?  चॉकलेटपेक्षा माझे आई बाबा किती महत्वाचे आहेत हे त्याला कळलं  पाहिजे, मग त्याला शिकवूया खरे प्रेम कुणावर करायचं ते .


🙏🙏🙏🙏🙏
 इतर आणखी काही लेख वाचण्यासाठी माझ्या
 bhausahebmahanor.blogspot.com
ला भेट द्या./ ब्लॉगला फॉलो करा ./subscribe करा ....
 🙏🙏🙏🙏🙏

🙏🙏share करण्या साठी निळ्या रंगामधील whatsapp किंवा facebook वर टच करा.🙏🙏

1 comment: