माझे इतर लेख वाचण्यासाठी ब्लॉगच्या होम पेज वर कॅटेगरी (catagory ) वरील ऑप्शनला जा आणि आपल्या आवडीचा ब्लॉग वाचा. आवडलेला ब्लॉग आपल्या मित्रांना ,सहकाऱ्यांना whatsapp, facebook द्वारे शेअर करा. किंवा पेजची लिंक तुमच्या whatsapp ग्रुपला share करा.धन्यवाद.....!

Friday, May 01, 2020

कर्मदारिद्र्यपणा

कर्मदारिद्र्यपणा
              असेल माझा हरी तर  देईल खाटल्यावारी  हे तुकाराम महाराजांचे वचन ,आपण स्वतः संपूर्ण प्रयत्न केल्यानंतर म्हणणे योग्य वाटेल . कुणा अवतारी पुरुषाच्या जन्मण्याची वाट पाहण्यात आपली आणखी हजारो वर्षे निघून जातील. पण तोपर्यंत जगात अधर्माने कळस गाठलेला असेल.  हा आपलाच कर्मदारिद्र्याचा शाप पुसून टाकण्यासाठी आपणच आज उठलं पाहिजे. कामाला लागलं पाहिजे.
                टीव्ही सिनेमा आणि गप्पा यांच्या शिदोरीवर टाइम पास होत असला तरी पास झलेल्या टाईमाचं सोनं होत नाही, आणि सोनं करता ही येत नाही. वाचन करणारे खूप असतात,  समजून घेऊन वाचणारे त्याहून कमी असतात. समजलेले लक्षात ठेवणारे त्याहून कमी असतात .आणि लक्षात ठेऊन वागणारे मात्र त्याहून  कमी असतात. मग आपण कशात बसतो हे ज्याने त्याने ठरवायचं . विचार ,उच्चार आणि आचार यांचा समन्वय साधणारी समतोल बुद्धी आपण स्वतःच विकसित करायची असते. हुशार कुणाला म्हणायचं ? जो आपली बुद्धीयोग्य वेळी योग्य पद्धतीने वापरतो . प्रत्येक क्षणाला चांगल्याचा विचार करतो . मग आपण आतापासून चांगल्या कमला लागू हा विचार प्रत्येकवेळी का आठवून द्यावा लागतो ?




🙏🙏🙏🙏🙏
 इतर आणखी काही लेख वाचण्यासाठी माझ्या
 bhausahebmahanor.blogspot.com
ला भेट द्या./ ब्लॉगला फॉलो करा ./subscribe करा ....
 🙏🙏🙏🙏🙏

🙏🙏share करण्या साठी निळ्या रंगामधील whatsapp किंवा facebook वर टच करा.🙏🙏

No comments:

Post a Comment