माझे इतर लेख वाचण्यासाठी ब्लॉगच्या होम पेज वर कॅटेगरी (catagory ) वरील ऑप्शनला जा आणि आपल्या आवडीचा ब्लॉग वाचा. आवडलेला ब्लॉग आपल्या मित्रांना ,सहकाऱ्यांना whatsapp, facebook द्वारे शेअर करा. किंवा पेजची लिंक तुमच्या whatsapp ग्रुपला share करा.धन्यवाद.....!

Friday, May 01, 2020

जगण्याच्या प्रेरणा

जगण्याच्या प्रेरणा
माणसांच्या जगण्याच्या प्रेरणा कोणत्या ?  माणूस कोणती ध्येये समोर ठेऊन जगतो ? प्रत्येकाचे उत्तर वेगळे असेल . पण ज्या माणसाला वैयक्तिक जीवनात यशस्वी व्हायचंय त्याला प्रेरणा हव्यातच .  मग त्या स्वयं असतील अथवा दुसऱ्यांकडून घेतलेल्या असतील .माणूस कधी जागा होतो माहीत आहे का? जेव्हा आपली अस्मिता  डिवचली जाते , तेव्हा आपल्यापुढे आव्हाने उभी राहतात . तेव्हा जागा होतो.अशाच वेळी आपल्याकडून चांगले कार्य घडून येते. व्यक्तीने असंच असमाधानी असायला हवे .तरच आपण नव्या आव्हानांना तोंड देऊ शकू. आपले ध्येय कायम आपल्याला मार्ग दाखवत असलं पाहिजे . आपण आपले ध्येय पूर्ण करण्यासाठी कायम प्रयत्नशील असायला हवे. त्यासाठी कधीही नाराज होता काम नये . नाराज मन आपल्याला ध्येयापासून परावृत्त करते.  तर उत्साही मन ध्येयासक्ती राखते .ध्येयापर्यंत पोचण्याची धड पड आपल्या मनाला कायम असू द्यावी. हार खाण्याची भीती आपल्या प्रयत्नांना मारक ठरते . म्हणून अपयशाच्या शेवटच्या  क्षणी देखील जिंकण्याची जिद्द सोडता कामा नये.हीच आपली जगण्याची प्रेरणा असू शकते .




🙏🙏🙏🙏🙏
 इतर आणखी काही लेख वाचण्यासाठी माझ्या
 bhausahebmahanor.blogspot.com
ला भेट द्या./ ब्लॉगला फॉलो करा ./subscribe करा ....
 🙏🙏🙏🙏🙏

🙏🙏share करण्या साठी निळ्या रंगामधील whatsapp किंवा facebook वर टच करा.🙏🙏

No comments:

Post a Comment