माझे इतर लेख वाचण्यासाठी ब्लॉगच्या होम पेज वर कॅटेगरी (catagory ) वरील ऑप्शनला जा आणि आपल्या आवडीचा ब्लॉग वाचा. आवडलेला ब्लॉग आपल्या मित्रांना ,सहकाऱ्यांना whatsapp, facebook द्वारे शेअर करा. किंवा पेजची लिंक तुमच्या whatsapp ग्रुपला share करा.धन्यवाद.....!

Saturday, May 02, 2020

चारोळ्या

लग्न टिकविण्यासाठी वाढत्या ...
शेजाऱ्यांचं प्रेम पाहून
मनातल्या मनात झुरतोय
Marathi novels story | घटस्फोट भाग :- १३
शेजाऱ्यावर प्रेम करता करता
घरच्यांना पुरेपूर विसारतोय


causes of divorce | Loksatta


गंमत म्हणून मी एकदा
टीव्ही वर मालिका पाहिलेली
नवरा बायको म्हणून राहण्यापेक्षा
घटस्फोटाची संख्या वाढलेली




जागो हिंदू जागो क्या हिंदू होना ...
जे जन्मतःच असतात योगी
त्यांचं जीवन त्यागी
ज्यांची रीत असते भोगी
ते कायम राहतात रोगी

Baba Cartoon Images, Stock Photos & Vectors | Shutterstock


अपेक्षा भंग होईल म्हणून
वेदना मनाची मनात दाबली
वेदना मनात दाबत राहिलो
अन आठवण मात्र ताजीच राहिली.



अगोदर पालक म्हणायचे 
शाळांत काय शिकवत नाहीत
कोरोना काळात म्हणतात
शाळेशिवाय मुलं शिकत न्हाईत 



ज्याचा त्याचा धर्म
प्रत्येकाने पाळला पाहिजे
इतरांचा नाही
पण स्वतःचा धर्म कळला पाहिजे.



प्रत्येक धर्माभोवती
दलालांचे वेटोळे आहे
दलालांच्या स्वार्थामुळेच
चांगल्या धर्माचे वाटोळे आहे .


फुटाफुटीच्या वादात
' राज ' कारण नडलं
मंत्री झालो नाही म्हणून
उदघाटन अडलं



मी बंडखोर
फौज माझी बघा
फौजेईतकी मोठी
मला हवी जागा



एकामागून एक किल्ले घेत
दिल्लीला निघाला
दख्खनचा राजा मात्र
महाराष्ट्रात अडकला



काट्याने काटा काढायचा जमाना
आता कालबाह्य झालाय
बॉम्बला उत्तर द्यायला
कोरोना व्हायरस आलाय



लग्न झाल्यावर म्हणतात
बसते संसाराची घडी
कारण बायकांना मिळतो
आयुष्यभर चाकरीचा गडी

मनीच्या भावना तुझ्या
चेहऱ्यावर वाचतोय
कळतंय सारं मला
पण मी लपवतोय




केवळ विचाराने भरत नाही
माणसाचं पोट
त्यासाठी आठवावं लागतं
रक्त घोट न् घोट




जगण्यासाठी हवा
सर्वांनाच पैका
त्यासाठी प्रत्येकजण म्हणतो
माझं ते ऐका




Try This Effective Solution To Remove Nazar Dosh - आजमाएं ...



तुझी केविलवाणी नजर
अनेकदा भिरभिरली दयेसाठी
मी कशी देऊ भिक्षा
मी भटकतो पोटासाठी




जीवन जगायचं असेल तर
मरणाची भीती बाळगू नये
मरणच पत्करायचं असेल तर
जगण्याची धडपड करू नये ...

Five Character Appears In Both Ramayana And Mahabharata - पांच ...



गळणारा मोहर
गळायचा कधी थांबत नाही
गळणार आहे म्हणून
यायचा देखील राहत नाही.
आंबा मोहोर जपा! |


सवतपणाच्या वागणुकीला
बायको सुद्धा घटस्फोट देते
कितीही पुरुषार्थ असला तरी
निम्मा वाटा हिसकावून घेते.
पत्नीने नवऱ्याला आसाराम म्हणून ...पती भांडण करत नाही, त्याच्या ...



संमेलनात एकच प्रश्न
कविता केली सीमाची
ऐकली अन मन हळहळले
पण झाली नाही दमाची


डोळ्यात मिळते
जेव्हा अश्रूंना वाट
त्याच्याही अगोदर
चिंबतात यातना दाट



पाऊसही आता येईना
कारण तो फितूर झाला
पवनचक्कीच्या नावाखाली
रडारची वाट पाहू लागला



नाटकातली उंदरं कशी
राजासारखी वाटतात
मांजराची चाहूल लागता
बिळात पळत सुटतात.


 
 बऱ्याच भावना विस्कटल्या तर
 त्याही एकवाटतात
 एकवटलेल्या भावनानांना मग
 कधीतरी कोंब फुटतात








पिवळ्याधामक माळरानावर
करंजला पालवी फुटली
मला काही कळेना
ही जगण्याची जिद्द कुठली ?



तू कोणाचीही नव्हतीस
तेव्हा वाटायचं तू सर्वांची आहेस
आता मात्र एकट्याची आहेस
हे कायमचं विसरायचं नाहीस




 
उच नीच न कोणी
सरस्वतीच्या दारात
ज्याचे त्याचे फळ मिळो
ज्याच्या त्याच्या पदरात





मध्यरात्रीचा दीर्घ श्वास
कानामागे जाणवला
तेव्हाच माझा आनंद
पुन्हा एकदा दुणावला


जे शाळा सोडुन 
मुंबईला पळाले
त्यांना कोरोनाने
पुन्हा शाळेत बसवले 



चूकतो तो माणूस आणि
पुन्हा चूक करतो तो वेडा माणूस ,
जो स्वतःच्या नाही तर ,
दुसऱ्याच्या चुकापासून शिकतो तो शहाणा माणूस... 



अभिमानाने सारी
लहान राहिली
कारण स्वाभिमान विकून
बाकीची मोठी झाली




पुन्हा अभिमानाने 
आम्ही लहानच राहिलो
कारण पूर्वी स्वाभिमान विकून 
मोठं झालेलो


रुळलेल्या पायवाटेवरून
सारेच चालतात
यशासाठी धडपडणाऱ्यांना
अनेक वाटा मिळतात


जमाना बदलला
सारेच बदलले
Hard work   गेले
अन Smart work आले  



अनेक उन्हाळे खाऊन
रोपट्याचा वटवृक्ष होतो
जिथं झाडांची वाणवा
तिथं एरंड वृक्ष होतो 



घरातलं भांडण 
लोक ऑफिसात सांगतात
शिकूनसुद्धा लोक 
अडाणीच वागतात



दुरावलेली मने
एकमेकांना प्रेम मागतात
शेवटी आपलीच कथा 
मनाला सांगतात 


पावसाने चिखल झाला
थोड्यावेळाने सुकला
नंतर वाळला
शेवटी धुरळा उडाय लागला 




दूषित हवा ,
दूषित पाणी 
खरं सांग देवा 
कुणाची करणी ?



तुका युगाची वारी करी
संगे अलंकापुरी
कोण थकले जिवा 
भेटीन रे केशवा



शाळेच्या  जागेपायी
कुणीच इथं भांडलं नाही
अन्.. देवळांच्या जागेसाठी
 इथं रक्त कमी पडलं नाही




              माझाच देव मोठा म्हणण्यात
              रक्ताच्या नद्या वाहील्या
              ज्ञानगंगा कोरडी झाली अन्
               शाळा  ओसाड झाल्या






शाळा अजुनही तशीच माझी 
पडक्या,तुटक्या भिंतीची
गरीब देशामधी उभ्या 
मंदिरं  झाली सोन्याची.



             शाळे मधली दानपेटी
             भरलेली कधी पाहिली नाही
             अन् मंदिराची कधी
             रिकामी  राहिली नाही




शाळेतला पालक मेळावा
पालकांवाचून राहून गेला
जत्रा ,मेळ्यात माणुस
मात्र चेंगराचेंगरीनं  मेला.


                 विद्येचं  ज्ञान देत
                 गुरूजी गरीब राहीला
                 अंध भक्तांच्या  दानावर
                 पुजारी धनवान झाला.



खरंतर धर्म नावाचं पुस्तक
शाळेत कधीच उघडत नाही
अन् धर्माच्या नावाशिवाय
देशात पानही हालत  नाही.




🙏🙏🙏🙏🙏
चारोळ्या आवडल्यास  आपल्या मित्र मैत्रिणींना SHARE करा ......

🙏🙏🙏🙏🙏
 इतर आणखी काही लेख वाचण्यासाठी माझ्या
 bhausahebmahanor.blogspot.com
ला भेट द्या./ ब्लॉगला फॉलो करा ./subscribe करा ....
साईडबार वरील ब्लॉगला टच करा .......
 🙏🙏🙏🙏🙏

🙏🙏share करण्या साठी निळ्या रंगामधील whatsapp किंवा facebook वर टच करा.🙏🙏



No comments:

Post a Comment