- डफळापूर,ता-जत(सांगली) येथील घटना
आज रात्री डफळापूर चेकनाका येथे पोलीसांसोबत कर्तव्य निभावत असताना ,कर्तव्यदक्ष शिक्षक श्री.नानासाहेब सदाशिव कोरे (माळी) यांचे डफळापूर जवळ दुर्दैवी अपघाती निधन झाले
जत तालुक्यातील जनतेच्या सुरक्षेसाठी प्रामाणिक पणे कर्तव्य बजावत असतांना ही घटना घडली. कोविड 19 अर्थात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी काही ठिकाणी शिक्षकांना ड्युटी लावलेली आहे. दि.3 मे पासून शिक्षकांना उन्हाळी सुट्टी सुरू झाल्याने , जत तालुक्यात सर्व बाजूंनी चेक पोस्ट लावून शिक्षकांना ड्युटी दिलेल्या आहेत. जत तालुका कर्नाटक सीमेलगत असल्याने तालुका ,जिल्हा आणि राज्याच्या सीमेवर कडक चेक पोस्ट चालू केली होती. कर्नाटक मधून अथणी अनंतपुर वरून डफळापूर येथे चेकपोस्ट वर कोरे सरांची ड्युटी होती . मंगळवारी पहाटे चेकपोस्टवर ड्युटी बजावत होते . ड्युटीवर असताना एका ट्रकला मोटार सायकल वरून अडवताना ट्रक खाली चिरडून त्यांचा जागीच मृत्यू झाला.
नानासो कोरे जि .प. शाळा, कोळीवस्ती ( डफळापूर ) येथे शिक्षक म्हणून कार्यरत होते . वय वर्ष 35 राहणार डफळापूर .अत्यंत उत्साही , कार्यतत्पर कर्तव्यदक्ष अशी ख्याती असलेले आणि नोकरीत प्रामाणिक असलेले , चेक पोस्ट वरील नोकरी ही प्रामाणिक करत असताना मंगळवारी
पहाटे 2.30 वाजता झालेली घटना सर्वांचे हृदय पिळवटून टाकणारी अत्यंत दुर्दैवी घटना घडलेली आहे. . सदर शिक्षकांच्या कुटुंबियांवरती काळाने फार मोठा घाला घातला आहे . या घटनेमुळे शिक्षक बांधवांमध्ये आणि जत तालुक्यातील शिक्षण विभागात शोककळा पसरली आहे.
का रुसला काळ तुम्हावर
घाई केली कुणी ?
एका झडपेत नेला
आमचा मित्र इमानी
कुणाचे काय चुकले
कोरोना हे कारण ठरले
आठवणींचे धागे राहिले
फक्त हळहळणे उरले
कोविड 19 अंतर्गत सेवा बजावत असतांना कोरेसरांचा मृत्यू झाल्याने ,जिल्हापरिषद सांगली मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.राऊतसाहेब व शिक्षणाधिकारी सौ.वखारेमॅडम यांनी तत्परतेने दखल घेवून कोविड 19 अंतर्गत विम्याचा प्रस्ताव आजच सादर करण्याचे आदेश जत गटविकासअधिकारी व जत शिक्षणाधिकारी यांना दिले आहेत................
🙏🙏🙏🙏🙏
इतर आणखी काही लेख वाचण्यासाठी माझ्या
bhausahebmahanor.blogspot.com
ला भेट द्या./ ब्लॉगला फॉलो करा ./subscribe करा ....
🙏🙏🙏🙏🙏
🙏🙏share करण्या साठी निळ्या रंगामधील whatsapp किंवा facebook वर टच करा.🙏🙏
फार दुःखद घटना आहे.
ReplyDeleteVery very bad news
ReplyDeleteBad news
ReplyDelete