माझे इतर लेख वाचण्यासाठी ब्लॉगच्या होम पेज वर कॅटेगरी (catagory ) वरील ऑप्शनला जा आणि आपल्या आवडीचा ब्लॉग वाचा. आवडलेला ब्लॉग आपल्या मित्रांना ,सहकाऱ्यांना whatsapp, facebook द्वारे शेअर करा. किंवा पेजची लिंक तुमच्या whatsapp ग्रुपला share करा.धन्यवाद.....!

Wednesday, May 13, 2020

काराजनगी जि. प.शाळेने केला ऑनलाईन निकाल जाहीर

  जि.प.शाळा ,काराजनगी  ता.-जत जि.-सांगली
                         येथील उपक्रम 

    कोविड 19 अर्थात कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे गेल्या 16 मार्च 2020 पासून    खासगी शाळा सहित जि. प.च्या शाळा देखील बंद आहेत . शासनाने इयत्ता   1ली ते 8वी पर्यंतच्या सत्र 2 च्या परीक्षा रद्द केल्या आणि आकारिक मूल्यमापनावर आधारित 100 पैकी रूपांतरण करून वार्षिक निकाल जाहीर करण्याचे निर्देश दिले . सर्व शाळांनी निकाल तयार केला परंतु 3 मे 2020 पर्यंत दुसरे लॉक डाऊन असल्याने सोशल डिस्टनसिंग पाळता येत      नसल्याने शाळांनी शाळेत निकाल जाहीर केले नाहीत .  तथापि शासनाने    ऑनलाईन निकाल जाहीर करावेत असे सुचवले .





जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काराजनगी
आपल्या सेवेत सदैव तत्पर
 कोरोनासारख्या वैश्विक महामारीमुळे आपल्या मुलाचा वार्षिक निकाल आपल्याला शाळेत जाऊन पाहता आला नाही, तरी तो आपल्याला घरबसल्या पाहता यावा याकरता आपल्या शाळेने आपणासाठी ऑनलाईन रिझल्ट पाहण्याची सोय उपलब्ध करून दिली आहे.



                जि प.शाळा काराजनगी (ता-जत, जि-सांगली ) येथील हरहुन्नरी ,अष्टपैलू, उत्साही, गुरुमित्र आणि तंत्रस्नेही शिक्षक मा.श्री. रियाज रजाक अत्तार सर यांनी सॉफ्टवेअर मध्ये निकाल तर बनवला, आणि त्याच सॉफ्टवेअर  च्या फाईल्स अपलोड करून  लिंक वर उपलब्ध करून दिलेल्या आहेत. तो निकाल सध्या सर्व पालक ऑनलाईन पाहू शकतात, प्रिंट काढू शकतात.
            बदलत्या काळाची पाऊले ओळखून माझ्या स्टाफने आत्तार सरांच्या  मार्गदर्शनाने काम केले हे शाळेच्या आणि गावाच्या अभिमानाची गोष्ट आहे .सदर निकालाच्या हार्ड कॉपी शाळा सुरू होताच पालकांना उपलब्ध करून दिल्या जातील .असे शाळेचे मुख्याध्यापक मा.श्री.आण्णाराव पाटील सर यांनी सांगितले .
          सोबत दिलेल्या  लिंकला कॉपी करून browse केल्यास अथवा  टच करून निकाल पाहता येतो.
https://sites.google.com/view/online-result/home

उदाहरणा दाखल पहा*.👇
पौर्णिमा बाबासो गायकवाड
Udise 27350205001
 इयत्ता आठवी तुकडी अ
हजेरी क्रमांक 21
जन्मतारीख 11/01/2007 
           
 इत्यादी माहिती भरल्यास आपल्या पाल्याचा निकाल पाहता येतो .

              या वर्षीचा पाल्यांचा निकाल ऑनलाईन पाहून पालक भलतेच खुश झलेले आहेत.ग्रामस्थ ,पालक, SMC अध्यक्ष सर्व सदस्य हे मोठ्या उत्साहाने मोबाईलवर आपल्या पाल्याचा रिझल्ट (निकाल ) पाहून आनंद व समाधान व्यक्त करत आहेत. शाळेचे मुख्याध्यापक श्री आण्णाराव पाटील सर आणि SMC अध्यक्ष बाबासाहेब गायकवाड यांनी आत्तार सरांचे विशेष कौतुक केले .अत्तार सरांचे पालकांमधून देखील अभिनंदन आणि कौतुक होत आहे ...........


🙏🙏🙏🙏🙏
 इतर आणखी काही लेख वाचण्यासाठी माझ्या
 bhausahebmahanor.blogspot.com
ला भेट द्या./ ब्लॉगला फॉलो करा ./subscribe करा ....
 🙏🙏🙏🙏🙏

🙏🙏share करण्या साठी निळ्या रंगामधील whatsapp किंवा facebook वर टच करा.🙏🙏

1 comment: