माझे इतर लेख वाचण्यासाठी ब्लॉगच्या होम पेज वर कॅटेगरी (catagory ) वरील ऑप्शनला जा आणि आपल्या आवडीचा ब्लॉग वाचा. आवडलेला ब्लॉग आपल्या मित्रांना ,सहकाऱ्यांना whatsapp, facebook द्वारे शेअर करा. किंवा पेजची लिंक तुमच्या whatsapp ग्रुपला share करा.धन्यवाद.....!

Thursday, May 14, 2020

दुर्गम भागातील मुलांच्या शिक्षणावर कुऱ्हाड

 



शाळा बंद करण्याचा परिणाम

दहा पेक्षा कमी पट           

                          असणाऱ्या शाळा बंद करण्याचा परिणाम


 शासनाने नुकताच दहा पेक्षा कमी पट असणाऱ्या शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे .यापूर्वी 20 पेक्षा कमी पट असणाऱ्या शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला होता . कदाचित त्याची सुरुवात म्हणजे 10 पेक्षा कमी पट असणाऱ्या शाळा बंद करणे होय.
     

     शासन आता बंद झालेल्या शाळेतील मुलं शेजारच्या शाळेत मर्ज करणार म्हणे.  मग पुन्हा त्यासाठी वाहन ,त्याचा परवाना ,ड्रायव्हर लायसन्स, विमा ,या सारी गोष्टी ओघाने येणारच.











RTE नुसार इयत्ता 1ली ते 5 वी साठी 1 किमी च्या आत  आणि इयत्ता  6 वी ते 8 वी  साठी 3 किमी च्या आत शाळेची सोय करणे बंधन कारक असताना, शासन शाळा बंद करण्याचा घाट का घालते कुणास ठाऊक ?

       सध्या मूल ज्या प्रश्नांना आणि संकटांना फेसिंग करते त्यात आणखी काही समस्यांची अधिकची भर पडताना दिसते.  ठीक आहे की ज्या शाळांचा पट 0 , 1 किंवा 2 फार तर 5 पर्यंत आहे अशा शाळांचा जरूर मर्ज साठी विचार करावा . पण 5 ते 10 पट असणाऱ्या शाळा बंद करून शासन काय साध्य करणार  ?
     खरेच डोंगर दऱ्यातील , माळ रानावरील पालक जागृत असता तर ही परिस्थिती आलीच नसती . मूल ही राष्ट्रीय संपत्ती म्हणून जाहीर करायला हवे  . आणि वयाच्या अठराव्या वर्षापर्यंत म्हणजे  12 वी पर्यंत चे शिक्षण महाराष्ट्र शासनाने मोफत द्यायला हवे.
आणि आता जर या परिस्थितीत का शाळा बंद होण्याचा किंवा  बंद करण्याचा विचार होत असेल तर शिक्षणातून आपण काय साध्य केले?
मूल ही राष्ट्रीय संपत्ती म्हणून जाहीर व्हायला हवे. त्यासाठी प्रत्येक  मुलाला वयाच्या 18 वर्षापर्यंत  म्हणजे 12 वी पर्यंतचे शिक्षण मोफत मिळायला हवे. अनेक हुशार मुले शिकण्याची इच्छा असतानाही केवळ सोय नाही म्हणून शाळा सोडणारी मुलं अनेक आहेत . ......
          गरीब, मजूर,  शेतकरी, आदिवासी ,दुर्गम, डोंगराळ ,वाडी वस्तीवरील मुलांना सहज शिक्षण मिळायला हवे पण त्यांचा हक्क असा जर का हिसकावून घेतला जात असेल तर सर्वांनी याचा जरूर विचार करावा ..................

              तूर्तास तरी शासनाने हा निर्णय मागे घ्यावा . कारण सध्या कोरोनाच्या प्रदुर्भावाने शहरे ओस होताना दिसत आहेत. शहरातील कामगार ,मजूर आणि फळ-भाजीपाला विक्रेते आणि अनेक छोटे छोटे व्यवसाय करणारी कुटुंब यांचे खेड्यात ,वाडी वस्तीवर त्यांच्या गावाकडे स्थलांतर होत आहे . इतकाच के पण हा कोरोनाचा विळखा सैल नाही झाला तर तालुक्यात देखील मुलं यावर्षी शिकायला जाणार  नाहीत . शाळा मग दोन शिफ्टमध्ये घ्यावी की एक दिवस आड घ्यावी याचा विचार करावा लागणार आहे . आज शाळा बंद केल्या तर लगेच अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन चालू होईल. आणि एडमिशन कुठं घ्यायचं याची धांदल चालू होईल. याचाही विचार व्हायला हवा की जो स्थलांतरित समूह आहे तो गावात ,खेड्यात काम मिळत नाही ,उत्पन्न कमी म्हणू स्थलांतरित झाला आहे . कोरोनामुळे अजूनही स्थलांतर चालूच आहे .आज पटकन शाळा बंद करता येतील ओ पण नवीन शाळा  इतक्या झटक्यात   सुरू होईल का ? तिथं लगेच शिक्षक मिळतील का याचाही विचार व्हायला हवा. कोरोना चे  दूरगामी परिणाम देशाला आणि जगाला सोसावे लागणार आहेत .
   याचाच एक बाधित भाग म्हणजे शिक्षण विभाग किंवा शिक्षण क्षेत्र होय . जागतिक लॉक डाऊन चा परिणाम शिक्षण क्षेत्रावर देखील होणार आहे . शहरातील अनेक कुटुंब आपापल्या गावी खेड्यात  आल्याने , त्यांच्या सोबत त्यांची लहान मुलं देखील आलेली आहेत. कोरोनाची तीव्रता जरी कमी आली असली तरी विस्थापित झलेली कुटुंब लगेच शहराकडे वळणार नाहीत. स्थलांतरित कुटुंबातील पाल्यांना खेड्यात,  वस्तीवर , जिथं शाळा असेल तिथं प्रवेश घ्यावा लागणार आहे .त्या आधी जर ह्या शाळाच बंद  झाल्या तर ह्या मुलांनी ऍडमिशन कुठं घ्यायचं ?
   येणाऱ्या मुलांना आणि पालकांना काय शाळा बंद होणार आहे किंवा बंद  झाली असे सांगायचं काय ?
आणखी एक महत्वाचे म्हणजे स्थिर व्यावसायिक अगर नोकरवर्ग आपल्या आपल्याला घरी अभ्यास घेऊ शकतात पण मजूर ,कामगार शेतकरी ,दररोज फिरून व्यवसाय करणारे पालक आपल्या पाल्याला गजर शिकवू शकत नाहीत नव्हे अभ्यास देखील घेऊ शकत नाहीत .... 

कोणत्या तरी राज्यात म्हणे आदिवासी भागतील एका मुलीच्या शिक्षणासाठी बँड केलेली रेल्वे पुन्हा सुरू केली , करण ती मुलगी शिक्षणापासून वंचित राहू नये ....
          शासनाने कमी पटाच्या शाळा जरूर बंद कराव्यात , पण घाई करू नये .   किमान यावर्षी तरी निर्णय मागे घ्यावा. शाळांच्या पटमध्ये कायकाय बदल होतात ते पाहावं.समजा आज 10 पट असणारी शाळा बंद केली आणि पुढील वर्षी किंवा जूनमध्ये  पट 11 होणार असेल तर ........? याच्यावर ठोस  सोल्युशन आहे काय? आज बालकाच्या अंगणवाडी पासूनच्या शिक्षणाचा विचार करताना पालक दिसत आहेत ,तेव्हा आशा शाळा पुन्हा सुरू करा म्हणत भांडत बसायला कुणाला वेळ आहे ? आधीच समाणिकरणाच्या नावाखाली कमी शिक्षकांवर  शाळा चालतात. शिक्षक कमी म्हणून पालक मूल Z. P. च्या शाळेत घालत नाहीत . आणि मग पुढे काय ?मुलं नाहीत म्हणून मग शिक्षक कमी ....हे समीकरण लागू होणार .आणि मला वाटत नाही की शाळा बंद पण शिक्षण आहे हे डिजिटल क्लासरूम मधून शिक्षण चाकू राहील ......हे सारं खोटं आहे ...सत्यात उतरायला फार वेळ लागेल !.मूल स्वतः सर्वच गोष्टी शिकू शकत नाही त्याला खूप मर्यादा  येतात. त्यासाठी त्याला मुक्त शिक्षण मिळण्यासाठी घराजवळ शाळा असावी , अन्यथा दुर्गम भागातील मुलांच्या शिक्षणावर कुऱ्हाड ही येणारच ......



🙏🙏🙏🙏🙏
 इतर आणखी काही लेख वाचण्यासाठी माझ्या
 bhausahebmahanor.blogspot.com
ला भेट द्या./ ब्लॉगला फॉलो करा ./subscribe करा ....
 🙏🙏🙏🙏🙏

🙏🙏share करण्या साठी निळ्या रंगामधील whatsapp किंवा facebook वर टच करा.🙏🙏

2 comments: