माझे इतर लेख वाचण्यासाठी ब्लॉगच्या होम पेज वर कॅटेगरी (catagory ) वरील ऑप्शनला जा आणि आपल्या आवडीचा ब्लॉग वाचा. आवडलेला ब्लॉग आपल्या मित्रांना ,सहकाऱ्यांना whatsapp, facebook द्वारे शेअर करा. किंवा पेजची लिंक तुमच्या whatsapp ग्रुपला share करा.धन्यवाद.....!

Tuesday, May 26, 2020

कोरोनसोबत जगायला शिकू या





  लस निघू पर्यंत कोरोनाशी जुळवून घ्यायला हवे .

गेले पाच महिने कोरोनाने जगात थैमान घातले आहे. संपूर्ण जग कोरोना (कोविड19) विरुद्ध लढत आहे . आपले  शासन सर्व पातळीवरून प्रयत्न करतंय. पोलीस ,पदाधिकारी ,डॉक्टर, नर्स सर्वजण जीवाचं रान करत आहेत. जगभर कोरोना वर उपाय शोधण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न चालू आहेत .
           आपणाला सर्वांनाच सुरक्षित जगायचं आहे त्यासाठी लॉकडाऊन ,सोशिअल डिस्टनसिंग, आणि सॅनिटायझिंग हें नियम आपण सर्वांनीच पळाले पाहिजेत.लस निघू पर्यंत आपणाला कोरोना सोबत राहायला  / जगायला शिकलं पाहिजे. त्यासाठी सर्वांनी काही नियम पाळले पाहिजेत.मग मात्र  कोरोना व्हायरस चा प्रसार आपण नक्की थांबवू शकू....
         
मुंबई ,पुणे येथून मूळ गावी येणाऱ्या  नागरीकांनी खालील गोष्टी पाळायलाच हव्यात ========
प्रशासनाने quarantine सेंटर सज्ज केली आहेत,
तिथे  quarantine सेंटर मध्ये जाऊन quarantine झाले पाहिजे.
आपल्या भोळ्या-भाबड्या आणि कष्टाळू गावकऱ्यांना वाचवण्यासाठी एवढं जरूर करा.नाहीतर त्यांनी विश्वास आणि प्रेमाने आपल्याला गावात दिलेला आसरा त्यांच्याच जीवावर बेतला तर यापुढे कोणीही तुम्हाला थारा देणार नाही. ही भोळी माणस मनाने खूप मोठी आहेत त्यांचा मोठेपणा त्याच विश्वासाने कायम ठेवा. आपल्या आयुष्यातील १४ दिवस एकटे  quarantaine राहिला तर पुढील 14 वर्षे काय 14 जन्म देखील एकत्र घालवू शकू . QUarantine मूळे आपले  जास्त नुकसान होणार नाही पण ह्या जगाचा पोशिंदा बाप जर कोरोनाने ग्रासला तर आपण सारेच  उपाशी जरूर मरू.

म्हणून
शहरातून येणाऱ्यांना हात जोडून विनंती
  चोरासारखे लपून छापून नका येऊ.
  सर्वांना सांगून या. राजरोसपणे या.
  गाव आपलं  सर्वांचे आहे,तुम्ही नियम पाळा, नक्कीच तुमचे स्वागत आहे...
  फक्त १५ दिवस अलगीकरण पाळा (कोरंनटाईन रहा).
   अगदी  घरातील कोणालाही स्पर्श करु नका, वस्तू एकत्रित वापरु नका.
   तुम्हाला किराणा, भाजीपाला, धान्याची गरज पडली तर फोन करुन सांगा, किंवा लांबूनच  हाका मारा.
   अलगीकरणात राहीले म्हणजे गावातील लोंकाना तुमचा अभिमानच वाटेल
   तुम्ही अलगीकरणात ( कोरंनटाईन) राहीले तर तुम्हाला हवी ती मदत गावकरी करतील, अगदी पैसे नसले तरी.
   तुम्ही गावाची व गावकऱ्यांची अलग राहुन काळजी घ्यावी, गावकरी तुम्हाला नक्कीच मदत करतील.
   लोकांत फिरुन आपला आपमान करुन घेऊ नका, गावाचे जबाबदार नागरीक बना.
   आपल्याकडे किंवा शेजारच्या कडे बाहेरगावाहून कोणी आले तर लगेचच गावात सर्वांना कळवा.की जेणेकरून ते जागृत राहतील.........
दररोजच्या जगण्याच्या धडपडीत मास्क, सॅनिटायझर ,त्यांना महागड्या वस्तू आहेत.
   भल्या भल्याना कोरोना झाला व त्याने मृत्यू झाल्याचे दिसून येते आहे, आपला पाहुणा किंवा  बाहेर गावावरून येणारा घरातील सदस्य यांना करोना होणारच नाही हा वेडपट पणा डोक्यातून काढून  टाका.
    बाहेरगावाहून येणारा किंवा अनोळखी व्यक्ती ला  कोरोना झालाय असे समजूनच काळजी घ्या.
   लहान गावात ग्रामपंचायत कार्यालय किंवा, तेथील सार्वजनिक सभागृह,शाळा  मध्ये सोयकरण्याची मागणी हे करताना शासनाचा एक रुपया खर्च होणार नाही, कारण बाहेर गावावरून आणि शहरातून येणारे लोक स्थानिक असल्याने,त्यांचे घरातील लोक त्यांची जेवणाची,नाश्त्याची सोय करतील.
या गोष्टी चे पालन केले तर करोना व्हायरस आपल्या गावात प्रवेश करूच शकणार नाही.आपला गाव तरी  वाचवा. सध्या आपल्याकडे कोरोनाला रोखणे हा एकच जालीम उपाय आहे , तो नाही पाळलातर आपल्यासोबत आपले कुटुंब ,शेजारी ,व गावकरी सर्वांनाच हानिकारक आहे .
 दररोज जीवनात दैनंदिन जीवनात सोशिअल डिस्टन्स पाळायला हवे. मास्क /गमच्या वापरायला हवे. त्यातूनही घरी आल्यावर सॅनिटायझर वापरून हात स्वच्छ केले पाहिजेत .बाजारातून आणलेल्या काही वस्तू देखील सॅनिटायझ करून घेतल्या पाहिजेत. सध्या कोरोनाला थोपवणे, अडवणे ,प्रसार रोखणे ,संसर्गाची साखळी तोडणे हा एकच उपाय आहे .त्यासाठी आपण सर्वांनी कोरोना सोबत राहायला आणि जगायला शिकलं पाहिजे.


( हा लेख लिहिण्याचा उद्देश केवळ कोरोना ( कोविड19) विषयी जागरूकता करणे हा आहे.)

🙏🙏🙏🙏🙏
 इतर आणखी काही लेख वाचण्यासाठी माझ्या
 bhausahebmahanor.blogspot.com
ला भेट द्या./ ब्लॉगला फॉलो करा ./subscribe करा ....
 🙏🙏🙏🙏🙏

🙏🙏share करण्या साठी निळ्या रंगामधील whatsapp किंवा facebook वर टच करा.🙏🙏



No comments:

Post a Comment