कोरोनाच्या प्रभावाखाली अडकले प्राथमिक शिक्षण !
कोविड 19 अर्थात कोरोनाचं संकट येणारे किमान वर्ष दीड वर्षभर तरी भारतात राहिल असं तज्ज्ञांच मते आहे. या काळात शैक्षणिक वर्ष वाया जाता कामा नये. शिक्षण चालू राहिलं पाहिजे. यासाठी शासनाला प्रयत्न करावे लागणार आहेत. तूर्तास तरी शासनाने शाळा, कॉलेज 15 जूनला सुरू करण्याची घाई करु नये. असं मला वाटते , कारण कोविडच्या पार्श्वभूमीवर मदतीसाठी बऱ्याच शिक्षकांच्या ड्युटी दिलेल्या आहेत . तसेच लॉकडाऊन मुळे अभ्यासक्रम, अध्यापन आणि अध्ययन पद्धतीत बदल करावे लागणार आहेत.
शाळा, कॉलेज सुरू करण्यापूर्वी काही पूर्वनियोजित ठोस अशा उपाययोजना कराव्या लागणार आहेत. महाराष्ट्रात 70 टक्क्यांहून अधिक शिक्षक हे कोरोना आणि तत्सम ड्युटीवर आहेत. त्यांना कोरोना ड्युटी संपवून पुन्हा शाळेत पाठवण्यापूर्वी किमान 14 आणि अधिकचे 14 दिवस होम कॉरंटाईन करण्याची आवश्यकता आहे. अन्यथा कोविड ड्युटी केलेल्या शिक्षकांमार्फत विद्यार्थ्यांपर्यंत आजाराचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता नाकारता येत नाही. शिवाय राज्यभर बहुतेक सर्व शाळांच्या इमारतीही कॉरंटाईन सेंटर बनवल्या गेल्या आहेत. शाळा, कॉलेज सुरू करण्यापूर्वी शिक्षकांना नव्या अध्यापन पद्धतीबद्दल आणि बदलांबाबत ऑनलाईन प्रशिक्षण देण्याची आवश्यकता भासणार आहे. नव्या शैक्षणिक वर्षात कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी वैयक्तिक आणि सामाजिक आरोग्य बाबत जागृती करण्याची गरज आहे .
ग्रीन झोन , ग्रामीण आणि दुर्गम भागात जिथे कोरोनाचा प्रादुर्भाव अजिबात नाही, तिथे शाळा, कॉलेज सुरू करण्यास हरकत नाही. परंतु तेथील शिक्षक लांबून प्रवास करून शाळेला येणार हे गृहीत धरावे लागणार आहे.
शहरामधील शाळा अर्थात जिथं पटसंख्या अधिक आहे आणि शिवाय ती शाळा ऑलरेडी दोन शिफ्ट मध्ये भरते त्या शाळेतील वर्गांमध्ये शारीरिक किंवा सामाजिक अंतर कसं राखलं जाईल ? याचा विचार करावा लागेल. त्यादृष्टीने स्थानिक पातळीवर शाळा, पालक, पदाधिकारी ,शिक्षण तज्ञ , संस्था, शिक्षणाधिकारी आणि तहसिल / जिल्हा परिषद अधिकारी / पालिका प्रशासन यांनी एकत्रित बसून निर्णय घ्यावा लागेल. पहिल्या टप्यात 8/9 वी ते 12वी या इयत्तांचे वर्ग सुरू करण्याचा प्रयत्न करावा. त्याचा अभ्यास करून मग प्राथमिक शाळा सुरू करण्याचा विचार करावा . चालू वर्षात काही वर्गांचे अभ्यासक्रम मर्यादित करावे लागतील किंवा मूल्यमापन पद्धत बदलावी लागेल .
सर्व विषय शिकवावेत मात्र परीक्षा कोणत्या विषयाची द्यावी याचं स्वातंत्र्य मुलांना देण्यात यावं. अथवा कोणत्या विषयांचं मूल्यमापन करावं हे शासनाला ठरवावं लागेल. विषय अध्ययनात अध्यापनात भाषा ,गणित आणि विज्ञान या विषयांना प्राधान्य देणेत यावे. प्रथमतः जूनपासून शिक्षकांच्या ऑनलाईन प्रशिक्षणाला सुरवात करावी लागेल. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर येणाऱ्या अडचणी, अभ्यासक्रम, अध्ययन व अध्यापनात करावे लागणारे बदल या संदर्भात हे प्रशिक्षण असलं पाहिजे.
मोठ्या महानगरातून म्हणजे मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर, औरंगाबाद इत्यादी शहरांमधून कामगार स्थलांतरित होऊन आपापल्या गावी निघून गेले आहेत. ते आपल्या सोबत मुलांना गावी खेड्यात घेऊन गेले आहेत. यासाठी आपल्या राज्यातील जे कामगार आहेत त्या कामगारांच्या मुलांना स्थानिक शाळांमध्ये तात्पुरता प्रवेश घ्यावा लागेल .त्यामुळे येत्या शैक्षणिक वर्षात शाळांचे पट बदलणार आहेत .
स्थलांतरित कामागरांमुळे शहरांमधील शाळांच्या पटावर परिणाम होणार आहे. शाळांचा पट कमी झाला तरी चालू वर्षी शिक्षकांना सरप्लस (अतिरिक्त ) करण्याची घाई करू नये. स्थलांतरित कामगार पुन्हा परत आल्यानंतर म्हणजे वर्षानंतर निर्णय घ्यावा लागेल. सोशल डिस्टनसिंग राखून शाळा चालवण्यासाठी शाळा शिफ्ट मध्ये भरवणे तसेच वर्गाचे विभाजन करणे यांमुळे शिक्षक संख्या अधिक लागण्याची गरज आहे . शिक्षक भरती तात्पुत्या स्वरूपात का होईना करावी लागेल. लॉकडाऊन मुळे मुले एकाकी झालेली असतील . त्यांना कधी एकदा मुलांमध्ये खेळू असं झालं असेल . आता मुलांना खेळ आणि कलेची गरज भासणार आहे. मोट्या वर्गासाठी गरज भासल्यास अधिकच्या रात्र शाळा सुरू कराव्या लागतील .
डिजिटल अध्ययन अध्यापन , टीव्ही चॅनल आणि ऑनलाईन शिक्षणा देण्यासाठी तंत्रज्ञान भरपूर लागेल.
प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांना शाळेत येताना दप्तर आणावे की नको याचविचार करावे लागेल . प्रत्येकाचे दप्तर शाळेतच ठेवले जावे.किंवा त्यांच्या अभ्यासाचा विचार करावा लागेल.
दुर्गम आणि ग्रामीण भागात जिथे नेटवर्क नाही, तिथे ऑनलाईन आणि टीव्ही शिक्षणाची शक्यता धूसर आहे, म्हणजे दुर्गम भागासाठी ते मृगजळ आहे. त्यामुळे अशा ठिकाणी प्रचलित अध्ययन पद्धती राबवावी लागेल.
#####$$$$####$$$$####$$$$####
( हा लेख लिहिण्याचा उद्देश केवळ कोरोना (कोविड19) प्रभावाखाली प्राथमिक शिक्षण कसं असू शकेल ? याविषयी मत मांडलेले आहे . केवळ याच उपाय योजना आहेत असा कुणीही समज करून घेऊ नये.)
🙏🙏🙏🙏🙏
इतर आणखी काही लेख वाचण्यासाठी माझ्या
bhausahebmahanor.blogspot.com
ला भेट द्या./ ब्लॉगला फॉलो करा ./subscribe करा ....
🙏🙏🙏🙏🙏
🙏🙏share करण्या साठी निळ्या रंगामधील whatsapp किंवा facebook वर टच करा.🙏🙏
वास्तव लेख
ReplyDelete