माझे इतर लेख वाचण्यासाठी ब्लॉगच्या होम पेज वर कॅटेगरी (catagory ) वरील ऑप्शनला जा आणि आपल्या आवडीचा ब्लॉग वाचा. आवडलेला ब्लॉग आपल्या मित्रांना ,सहकाऱ्यांना whatsapp, facebook द्वारे शेअर करा. किंवा पेजची लिंक तुमच्या whatsapp ग्रुपला share करा.धन्यवाद.....!

Monday, May 25, 2020

आसंगी केंद्रात कोरोना संदर्भात ऑनलाईन मार्गदर्शन


आसंगी केंद्रातील स्तुत्य उपक्रम
आसंगी केंद्रातील मुख्याध्यापकांना  ऑनलाईन मार्गदर्शन
                       कोविड 19 अर्थात  कोरोनाच्या वाढत्या प्रदूर्भावाच्या  पार्श्वभूमीवर शासनाच्या आदेशाप्रमाणे झुम  अँपच्या  माध्यमातून जत तालुक्यातील आसंगीतुर्क केंद्रातील एकुण १९ शाळेतील मुख्याध्यापकांना  ऑनलाइन मार्गदर्शन केंद्रप्रमुख रामचंद्र राठोड यांनी केले.
          कोरोना विषाणूच्या संसर्गाला आळा घालण्यासाठी सध्या पूर्ण देश लॉकडाऊन आहे. लॉकडाऊनमुळे जिल्हा परिषद शाळांचे कामकाज ठप्प झाले आहे. आता शाळांना सुट्टया जाहीर झालेल्या आहेत, परंतु शिक्षकांच्या शैक्षणिक कामामध्ये कोणताही अडथळा निर्माण होऊ नये. यासाठी शाळा बंद पण शिक्षण सुरू" या विषयावर शासनाने नवीन टेक्नॉलॉजीचा वापर करून 'लर्निंग फ्रॉम होमसाठी विविध शैक्षणिक ब्लॉग, वेबसाईट, दिक्षा अॅप, बोलो, स्वयंप्रभा, गुगल क्लास, पाठशाला, ई बालभारती, एस.एम.एस., टीव्ही, रेडिओ याद्वारे पालक व विद्यार्थी यांना अभ्यासाबाबत जागृती करणे सुरु आहे. शाळा बंद असल्या तरीही शिक्षण सुरु ठेवणे.तसेच अशा विविध अॅप कसे वापरावेत, ते वापरताना धोके कोणते व कोणती काळजी घ्यावी.यासह विविध विषयावर चर्चा करण्यात आली.
           स्वतः व समाजातील सर्वाची कोरोना आजाराची काळजी कशी घ्यावी.लोकांची जनजगृती कशी करावी.या बाबतीत मुख्याध्यापकांना मार्गदर्शन करण्यात आले .
            सदर मार्गदर्शन करण्यासाठी संचालक दिनकर पाटील, सांगली शिक्षणाधिकारी प्राथमिक सुनंदा वाखारे, सांगली डायट प्राचार्य रमेश होसकोटी, गटशिक्षणाधिकारी आर.डी. शिंदे यांच्या सूचनेनुसार झुम अँपच्या माध्यमातून आसंगीतुर्क केंद्रातील मुख्याध्यापकांना केद्रप्रमुख रामचंद्र राठोड यानी ऑनलाइन मार्गदर्शन केले.
          यावेळी शिवाजी गायकवाड ,शशिकांत सावंत, सिकंदर मुजावर ,बालाजी कुपसे,प्रकाश बर्डे सर,राठोड सर फुलसिंग राठोड,नरेंद्र गावित, रमेश राठोड,चंद्रशेखर पुजारी,दिलीप वाघमारे आदीनी चर्चेत सहभाग घेतला.

🙏🙏🙏🙏🙏
 इतर आणखी काही लेख वाचण्यासाठी माझ्या
 bhausahebmahanor.blogspot.com
ला भेट द्या./ ब्लॉगला फॉलो करा ./subscribe करा ....
 🙏🙏🙏🙏🙏


🙏🙏share करण्या साठी निळ्या रंगामधील whatsapp किंवा facebook वर टच करा.🙏🙏


No comments:

Post a Comment