शाळा सुरू करण्यापूर्वी शासनाने परिपूर्ण म्हणजे सर्वंकष विचार करावा. ग्रीन झोनमध्ये शाळा सुरु करता येईल परंतु त्यांना शिकवणाऱ्या शिक्षकांना आणि सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांना ग्रीन झोनच्या बाहेर जाता येणार नाही, मग त्याची जबाबदारी कोण घ्यायची? पालकांना त्यांच्या पाल्यांना त्यांच्या पासून दूरवरच्या शाळेत घालता येणार नाही.शिक्षण प्रणाली मध्ये प्राथमिक, माध्यमिक, उच्चमाध्यमिक,पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण त्या त्या टप्प्यावर स्वतंत्र विचार करणे गरजेचे आहे.कोरोनाचा प्रादुर्भाव असे पर्यत शाळा सुरु करायच्या असतील तर मास्क, सॅनिटायझर कंपल्सरी वापरावे लागतील .सोशल डिस्टनसिंग चे पालन करणे अत्यंत महत्वाचे काम आहे. त्याचबरोबर पालक आणि पाल्य यांचे समुपदेशन होणे गरजेचे आहे.
सध्या जगभरात कोविड19 अर्थात कोरोनाचा प्रादुर्भाव अजूनही आहेच.याचा परिणाम उद्योगधंदे, कृषी आणि शिक्षण क्षेत्रावे मोठ्या प्रमाणावर परिणाम होत आहे . सर्व नागरिकांना सहजा सहजी न दिसणारे क्षेत्र म्हणजे शिक्षण क्षेत्र होय . सध्या उन्हाळी सुट्टी असल्याने त्याची तीव्रता लक्षात येत नाही ,परंतु उन्हाळी सुट्टीमध्ये शिक्षण विभागाकडून पुस्तक वाटपाची तयारी चालू होते . नव्या शैक्षणिक वर्षाची तयारी करावी लागते. पण कोरोनाचा विळखा भारत आणि महाराष्ट्रात अधिक घट्ट होत असल्याने शिक्षण क्षेत्रावर दूरगामी परिणाम होताना दिसत आहेत.
लॉकडाऊन नंतर शाळा सुरू करायच्या म्हंटलं तर शिक्षकांची आरोग्य चाचणी व्हायला पाहिजे .त्यानंतर 10ते 15 दिवसांनी निर्णय घ्यावा लागेल.शाळा सुरू झाल्या तर सोशल डिस्टन्सिंग पाळता येणे कठीण आहे ,त्यासाठी नवीन नियमावली तयार करावी लागेल.शाळेतील मुलांना 100% मस्कचा वापर करावा लागेल. सॅनिटायझर दिवसभरात म्हणजे शालेय वेळेत कधी कधी वापरावे ह्याचे निर्देश द्यावे लागतील . कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्या खेरीज शाळा सुरू करणे धोक्याचं आहे. समजा यावर्षी शाळा उशिराने सुरू झाल्या तर सुट्ट्या कमी कराव्या लागतील.ऑनलाईन शिक्षण सुरू करायचं तर केवळ 25 ते 27 टक्के पालकांकडे स्मार्ट फोन अथवा अँड्रॉईड मोबाईल आहेत .उरलेल्या 73 ते 75 टक्के विद्यार्थ्यांचं कसं शिक्षण होणार याचाही विचार करायला हवा.
स्मार्टफोन पालक किती पाल्यांना त्यांचे पालक देऊ शकतात?
ऑनलाईन शाळा किंवा ऑनलाईन क्लासरूम हा काही शंभर टक्के उपाय होऊ शकत नाही.शाळा ऑनलाईन झाल्याचा आनंद खरं कुणालाच नाही.
बोटावर मोजण्याइतक्या मुलांना किंवा पालकांना झाला असेल .पण हा आनंद तात्पुरता आहे.आभासी आहे. हे एक अजून मृगजळ आहे.
ऑनलाईन शिक्षण प्रणाली जर उपयोगात आणायची म्हटलं तर प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांचे काँसंट्रेशन राहील का ?
आईवडील किंवा वडीलधारी माणसं घरी नसताना मुलं100 टक्के ऑनलाईन शिक्षण घेतील का ?ऑनलाईन शिक्षण सध्यातरी मृगजळ आहे.
प्राथमिक शिक्षण शिक्षकांशिवाय करता येणं अशक्य वाटतंय.
जि.प.शाळातील २०-२२ टक्के पालकांकडे स्मार्टफोन आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील आणि जि.प.शाळातील मुले ऑनलाईन शिक्षण द्वारे होणाऱ्या शिक्षणाला वंचित राहतील.
`
व्हर्चुअल लर्निंग वर मर्यादा येतातच. ऑनलाईन लर्निंग मध्ये शंका विचारता येत नाहित.अन् प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचता येत नाही.
11वीपासून पुढे शाळा किंवा ऑनलाईन क्लासरूमएखादे वेळेस योग्य आहे करण ती मुलं समजूतदार असतात.पण माध्यमिक आणि प्रथमिक स्तराला हे योग्य वाटत नाही.
कोविड 19 चा प्रादुर्भाव कमी झाल्या खेरीज अनेक पालक त्यांच्या पाल्यांना शाळेत सहजासहजी पाठवणार नाहीत. वॅक्सीन जोपर्यंत येणार नाहीत तोपर्यंत पालक मुलांना शाळेत पाठवायला तयार होणार नाहीत .पालकांनी आपल्या पाल्यांना शाळेत पाठवण्यासंबंधी काउन्सलिंग करावे लागेल, समुपदेशन करावे लागेल.अजूनही पालक विद्यार्थी पुस्तक आणि वहीची पाने थुंकी लावून उलटतात.
प्रत्येक गावाला ,जिल्ह्याला झोन वाईज स्वातंत्र्य दिलं तर ग्रामीण भागातील शाळा सुरू करता येणे शक्य आहे.
शिक्षण म्हणजे केवळ वाचन-लेखन नव्हेतर ; शाळा हे एक संस्कार केंद्र देखील आहे. त्या मुलाला समूहात राहणे हे देखील कळायला हवे.
उदयोगधंदे बंद झाल्याने आणि मजूर कामगारांचे स्थलांतर झाल्याने शालाबाह्य विद्यार्थ्यांचे प्रमाण वाढणार आहे.
अपूरी शिक्षक संख्या हा देखील उद्याच्या शिक्षण पद्धतीवर परिणाम करू शकतो .सोशल डिस्टनसिंग पाळायचं झालं तर शाळा दोन सत्रात भरवावी लागेल किंवा वर्गाचे दोन ग्रूप करून एक दिवस आड शाळा भागवावी लागेल. प्रत्येक वर्गापुढे सॅनिटायझर ठेवावं लागेल .त्यासाठी त्याला वेळ देखील अधिक द्यावा लागेल. शिक्षणाशिवाय ज्या इतर ऍक्टिव्हिटीज आहेत त्यासाठी टाईम मॅनेजमेंट करावे लागेल.
महाराष्ट्रातील वेगवेगळे जिल्हे वेगवेगळ्या झोन मध्ये म्हणजे ग्रीन,येलो,ऑरेंज आणि रेड झोन असल्याने; झोन वाईज शाळांची नियमावली तयार करावी लागेल .पाठ्यपुस्तक प्रमाणे मास्क आणि सॅनिटायझर पुरवावे लागतील यांचे विचार करायला हवा;शाळा. समाज, कोचिंग क्लासेस ,ऑफीस इत्यादी ठिकाणी सोशल गॅदरिंग कसं कमी करता येईल ;आणि त्याचा धोका कमी करता येण्यासाठी प्रयत्न करायला हवेत.कोरोना बाधित जगातील इतर देश आणि भारतातील इतर राज्यातील शिक्षण शिक्षण व्यवस्था कशी असेल ? त्यातील काही बदलांचा देखील अभ्यास केला पाहिजे.
🙏🙏🙏🙏🙏
इतर आणखी काही लेख वाचण्यासाठी माझ्या
bhausahebmahanor.blogspot.com
ला भेट द्या./ ब्लॉगला फॉलो करा ./subscribe करा ....
🙏🙏🙏🙏🙏
🙏🙏share करण्या साठी निळ्या रंगामधील whatsapp किंवा facebook वर टच करा.🙏🙏
Nice article👌👍
ReplyDeleteNice 👌👌👌👌👌👌
ReplyDelete