माझे इतर लेख वाचण्यासाठी ब्लॉगच्या होम पेज वर कॅटेगरी (catagory ) वरील ऑप्शनला जा आणि आपल्या आवडीचा ब्लॉग वाचा. आवडलेला ब्लॉग आपल्या मित्रांना ,सहकाऱ्यांना whatsapp, facebook द्वारे शेअर करा. किंवा पेजची लिंक तुमच्या whatsapp ग्रुपला share करा.धन्यवाद.....!

Sunday, May 17, 2020

चारोळ्या 2


अगोदर पालक म्हणायचे 
शाळांत काय शिकवत नाहीत
कोरोना काळात म्हणतात
शाळेशिवाय मुलं शिकत न्हाईत 




ज्याचा त्याचा धर्म
प्रत्येकाने पाळला पाहिजे
इतरांचा नाही
पण स्वतःचा धर्म कळला पाहिजे.



प्रत्येक धर्माभोवती
दलालांचे वेटोळे आहे
दलालांच्या स्वार्थामुळेच
प्रत्येक चांगल्या धर्माचे वाटोळे आहे .


फुटाफुटीच्या वादात
' राज ' कारण नडलं
मंत्री झालो नाही म्हणून
उदघाटन अडलं



मी बंडखोर
फौज माझी बघा
फौजेईतकी मोठी
मला हवी जागा


एकामागून एक किल्ले घेत
दिल्लीला निघाला
दख्खनचा राजा मात्र
महाराष्ट्रात अडकला



काट्याने काटा काढायचा जमाना
आता कालबाह्य झालाय
बॉम्बला उत्तर द्यायला
कोरोना व्हायरस आलाय



लग्न झाल्यावर म्हणतात
बसते संसाराची घडी
कारण बायकांना मिळतो
आयुष्यभर चाकरीचा गडी




केवळ विचाराने भरत नाही
माणसाचं पोट
त्यासाठी आठवावं लागतं
रक्त घोट न् घोट




जगण्यासाठी हवा
सर्वांनाच पैका
त्यासाठी प्रत्येकजण म्हणतो
माझं ते ऐका




मनीच्या भावना तुझ्या
चेहऱ्यावर वाचतोय
कळतंय सारं मला
पण मी लपवतोय



No comments:

Post a Comment