आम्ही मात्र दोघांकडे गहाण
गर्जा महाराष्ट्र माझा
बेळगाव कधी म्हणणार
धुमसत असलेलं हृदय
प्रेमगीत कधी गाणार
कुणासाठी जगताहेत ते
मरतात कुणासाठी ?
दुसाऱ्याच्या प्रतिष्ठेसाठी
अन् स्वतःच्या पोटासाठी
कोण कसली त्यांची जमीन ?
बळी झाला का कोणी ?
त्यांनाच तुम्ही केलात बळी
रिटायर होऊनही यातना
संपल्या नाहीत अजूनही
समतेच्या ध्वजाला असा
सवतीचा कलंक का?
आम्ही राबतो कष्टतो
तूमच्या घोषणांचा डांगोरा का ?
आम्ही ना कुणाची शान ना कुणाची मान
पण आहोत आम्ही मात्र दोघांकडे गहाण
स्वतंत्र देशात राहूनही
स्वातंत्र्याची उपासमार
हेच गीत म्हणतंय, बेळगाव सांगे कारवार
No comments:
Post a Comment