व्यथा
मोरीला बोळा अन दरवाजा मोकळा
ही रीत झालीय आमची
भारतमातेच्या सौभाग्याचं कुंकू
अजून किती जणांना कळायचंय?
अंह.... इथं मात्र
माळ्याची मका अन् कोल्ह्याचं भांडण,
आज बरखास्त उद्या उद्धवअस्त
त्यांना मात्र अनेकांचा नरबळी
द्यावा लागेल , स्वातंत्र्याच्या हक्कासाठी
कोण कुणास ठाऊक कुणासाठी ?
पण मारताहेत बेळगावकर आजही
मुसकी बांधून, आपल्याच जीवनासाठी
लोकशाही धाब्यावर बसली ,
अन् जनमत वेशीला
कमरेच काढून ह्यांनी
केव्हाच बांधलय डोकीला
हैद्राबाद विलीन झालं
तिथं बेळगावची काय कथा
आमचा प्रश्न आम्ही सोडवत व्हाय ,
हीच आमुची व्यथा,
####
No comments:
Post a Comment