माझे इतर लेख वाचण्यासाठी ब्लॉगच्या होम पेज वर कॅटेगरी (catagory ) वरील ऑप्शनला जा आणि आपल्या आवडीचा ब्लॉग वाचा. आवडलेला ब्लॉग आपल्या मित्रांना ,सहकाऱ्यांना whatsapp, facebook द्वारे शेअर करा. किंवा पेजची लिंक तुमच्या whatsapp ग्रुपला share करा.धन्यवाद.....!

Sunday, April 26, 2020

संतान



संतान



मी एक फूल, ना वासाचं ना फळाचं
मी एक निखारा, ना फुलणारा  ना पेटणारा

 जन्म झालाय म्हणून जगतोय
  जीवनाची मी भीक  मागतोय

 हसता तुम्ही मजकडे पाहून
 जगतोय ते सर्व साहून


माणूस म्हणून वणव्याच्या खाईत
ढकललेत बरेच पावसाळे
असेच कुडकुडत अजून हिवाळे
सोसतो आयुष्यभर उन्हाळे


 दिवाळीचा सण 
आमच्या  नाही  वाटा
 शिमग्याचंच सुख आम्हा,
 त्याला लय वाटा

 राब राब राबलो ,
 हाती हातोली नाही
 काय करावं जन्माला
 पोटी संतान नाही


 वंश नाही जन्मात माझ्या
 जगावं मी कुणासाठी ?
 त्याचीच तर ही अनंत लेकरं 
मी का रडतो  माझ्यासाठी   ?




No comments:

Post a Comment