गाय म्हशी ववाळी
गयचा चारा
बैल नवरा
बैलांचं बाशिंग
किकऱ्यान ताशीन
किकार झालं मॉण्ड
गायला झालं खॉंड
गायच्या गळयात घाटी
दी गं म्हातारी खोबऱ्याची वाटी
न्हायतर घालीन कुबडात काटी
माळावरचं मुंगास
त्यानं दिली हाळी
ज्यानी गाय फळी
ज्यानीची खोंडं
रेशमाची गोंडं
रेशमाची सावली
तिफण मावली
तिफणीचं देण्याळ
हाणीन बुक्की
फोडीन चाडं
नव्वा गाडं
आली वरसाची दिवाळी
सोन्या रुपांन ओवाळी
No comments:
Post a Comment