मावळतीला सूर्य जाता
मावळतीला सूर्य जाता
पहाटेच्या वेळी तुझ्या
स्पर्शाने दिला फाटा
रातराणीचा सुगंध
रातभर दरवळतोय
एकवटलेल्या जीवांना
पहाटवारा पळवतोय.
मध्यरात्रीचा श्वास तुझा
कानामागे जाणवला
तेव्हा खरंच तुला सांगू
माझा आनंद दुणावला
रक्ताळलेले तुझे ते ओठ
पुन्हा दाताखाली येतात
ओथंबून भिजण्यासाठी
पुनः पुन्हा आतुरतात.
No comments:
Post a Comment