माझे इतर लेख वाचण्यासाठी ब्लॉगच्या होम पेज वर कॅटेगरी (catagory ) वरील ऑप्शनला जा आणि आपल्या आवडीचा ब्लॉग वाचा. आवडलेला ब्लॉग आपल्या मित्रांना ,सहकाऱ्यांना whatsapp, facebook द्वारे शेअर करा. किंवा पेजची लिंक तुमच्या whatsapp ग्रुपला share करा.धन्यवाद.....!

Wednesday, April 22, 2020

शाळा सुटल्यानंतर पाच मिनिटे थांबा ..............

   
       
 शाळा सुटल्यानंतर फक्त पाच मिनिटे शाळेत थांबा . कारण ती पाच मिनिटे आजच्या चुकांचा पश्चाताप आणि उद्याच्या नवीन विचारांची दिशा देणारी ठरणार आहेत.  त्यासाठी केवळ पाच मिनिटे शाळेत थांबा. संसार , प्रपंच सर्वांनाच आहे .त्यामुळे तुम्ही घाई कराल . पण ही पाच मिनिटे तुमचे ध्येय असणाऱ्या आजण ,अज्ञान आणि कोमल मुलांकरिता  खर्च करा.
मला जाणीव आहे की दिवसभराच्या कामाने तुम्ही थकला असाल , पण आता केवळ पाच मिनिटे खर्च करण्यात का कुचराई करता ?  या पाच मिनिटं थांबण्याऐवजी जर तुम्ही सर्वांच्या कल्याणासाठी जाणार असाल तर आवश्य जा. पण विनाकारण ती पाच मिनिटे वाया घालवणार असाल तर मग थांबा.  तुमच्या सहकाऱ्यांशी चर्चा करा. तुमचा एखादा विदयार्थी अगर विद्यार्थिनी घराकडे रेंगाळत जात असेल तर  त्यांच्याशी हितगुज करा.ते त्या मुलाला आवडेल. टाटा ,बाय बाय करा , ते ही त्या मुलाला आवडेल.     दिवसभरातील विनोद आठवा आणि एकमेकांना शेअर करा.
 ती वाया घालवू नका ,करण हीच पाच मिनिटे तुमचा थकवा तर घालवतील  आणि उद्याच्या कामाची दिशा देणारी ठरतील .............................
शाळा    

1 comment: