प्रा. सौ.सुमनताई बेलवलकर
दि. 18 ते 31डिसेंबर1998 अखेर, SRVM हायस्कूल, जत येथे मराठी प्रशिक्षण होते. मला वाटलं आपण मराठीतून शिकलो, मराठीतून शिकवतो , शिवाय मराठी शिकतो .मग मराठी प्रशिक्षण कशासाठी? कोणाकडून आहे ? याविषयी सविस्तर सांगताना उदघाटन कार्यक्रम झाल्याननंतर
मॅडम प्रशिक्षणाचा हेतू स्पष्ट करत होत्या. मध्येच कुणीतरी शंका विचारण्यासाठी 'मॅडम' म्हंटलं. त्याच शब्दावरून त्यांनी ट्विस्ट घेतला. आणि म्हणल्या की मला ताई किंवा बाई म्हणा. मॅडम म्हटलं की दुरावा वाटतो. प्रशिक्षणाचं शेड्युल सांगितलं.
मधल्या सुट्टीनंतर प्रशिक्षण म्हणजे कार्यशाळेची सुरुवात झाली. प्रथम सुमनताईंनी मराठी भाषा अध्यापनात येणाऱ्या अडचणी विचारल्या. बऱ्याच जणांनी जत तालुका कर्नाटक सीमेवर असल्याने कन्नड भाषेचा प्रभाव असल्याचे सांगितले. वाक्यरचना करता येत नाही. लिंग वचन यांचा घोळ होतो.
मी देखील माझी अडचण सांगितली.
माझी शाळा लामाणी बहुल विध्यार्थी असल्याने त्यांची आंतरक्रिया लामाणी भाषेत होते . ते फक्त शाळेतच मराठी ऐकतात.घरी लामाणी बोलतात . ताईंनी सर्वांच्या समस्या कागदावर लिहून घेतल्या. बरोबर पाच वाजता सांगितलं की उद्या सकाळी ठीक अकरा वाजता आपला वर्ग सुरू होईल. आणि पहिला दिवस संपला.
दुसऱ्या दिवसापासून चौदावा दिवस कसा आला खरंच आम्हाला कळलं नाही. यामध्ये ताईंनी भरपूर मार्गदर्शन केले. , पहिलीत प्रवेश केलेल्या मुलाला अगोदर उच्चार शिकवावेत .
उच्चाराचा सराव व्हावा म्हणून लघुत्तम युग्म ( minimal pairs) तयार करून घेतले . लघुत्तम युग्म म्हणजे असे दोन शब्द की ज्या दोन शब्दांतील उच्चारामध्ये कमीतकमी उच्चार फरक असावा. उदा. जरा-झरा, पाट-पाठ, करा -खरा , कर-खर . असे शब्द सांगायचे. आपण एक उच्चार करायचा आणि दुसरा उच्चार विदयार्थ्यांना करायला सांगायचा. यामुळे श्रवण व उच्चार दोन्ही गोष्टी दृढ होतात. त्यावेळी माझ्या लक्षात आलं की आपण फक्त पास होण्यापूरते शिकवतो . म्हणजे याचा अर्थ असा की 35 टक्क्यांनी पास म्हणजे 65 टक्क्यांनी अज्ञान घेऊन पास ना (नापास ), असंच ना ?
पुढे वर्णमलेतील प्रत्येक वर्णाचा उच्चार सांगितला. स्वरांचे उच्चार सांगितले. ँँ (ऍ) व ऑ हे इंग्लिश मधून मराठीने स्वीकारलेले स्वर सांगितले. अक्षरांचे अवयव म्हणून त्यांनी फक्त उजवीकडून वर्तुळ ,डावीकडून वर्तुळ आणि वरून खाली रेघ इतकाच सराव घ्यायला सांगितला. हेच खरे अवयव आहेत. मात्र ही वर्तुळ कधी एकसारखी तर कधी एकात एक तीन वर्तुळ काढायला सांगावीत. जोडाक्षरे कशी लिहावीत हे सांगताना अर्धी अक्षरे काढण्याचा सर्व सराव द्यावा . पुढे ताईंनी प्रमाण भाषेची वाटचाल सांगितली. हे सांगताना भाषेत समान अर्थाचे शब्द नसतात मुळी , तर अर्थ स्पष्ट करण्याकरिता योजलेले शब्द असतात असं त्यांचं म्हणणं होतं. त्यानंतर मराठी आज्ञार्थी क्रियापद संग्रह केला. प्रयोग ,कृदंत यासारखे शब्द लिहीन लिहून घेतले. इयत्ता पहिली ते पाचवी मराठी पाठ्यपुस्तकातील शब्दांचा शब्दकोश तयार करून घेतला. आपण शिकवत असताना विदयार्थ्यांना बोलतं करायला हवे. असं स्पष्ट केलं.
या चौदा दिवसांच्या कार्यशाळेत दररोज दुपारी स्थानिक वक्ते बोलावून त्यांचे व्याख्यान ठेवले होते . या मध्ये पोतनीस सर यांनी मराठी साहित्य , मराठी वाङ्मयाचा इतिहास , डॉ.अशोक मोगली यांनी स्वतःचे आरोग्य , मा.गोविंदराव गोडबोले (केंद्र निर्देशक ,आकाशवाणी सांगली ) यांचे कथाकथन , डॉ.श्रीपाद जोशी सर यांनी संतकाव्य, तंतकाव्य आणि पंतकाव्य , मराठी निबंध वाङ्मय , सौ .पोतनीस बाईंनी कवितेचे अध्यापन यामध्ये कवितेचा संदर्भ, कवितेतील अर्थाची जाणीव ,कवितेची गेयता , दोन ओळीतला आशय शोधणे, कविता समग्र पद्धतीने शिकवावी, आणि डॉ.अशोक मोगली यांचे , प्राथमिक शाळातील मुलांचे वैयक्तिक आरोग्याकडे होणारे दुर्लक्ष ,इत्यादी विषयी व्याख्याने ऐकवण्यात आली .
एकंदरीत भाषा शिकवणाऱ्या शिक्षकांच्या जबाबदाऱ्या काय? हे सुमनताईंनी सांगितले. प्रत्येक प्रशिक्षणार्थ्याशी आदरानं बोलायच्या . वर्ग बरोबर 11 वा. सुरू होऊन 5 वा. सुटायचा .त्यांचा वक्तशीरपणा फार आवडला. माझ्यातील उणिवेची जाणीव मला या कार्यशाळेत झाली.
जे माझ्या वरिष्ठांनी मला सांगितलं ते काम मी इथे प्रशिक्षणात प्रामाणिकपणे केले. इथून पुढे तुम्ही तुमच्या विद्यार्थांसाठी काम करा, त्यांच्यापर्यंत हे पोचवा .
प्रशिक्षण संपल्यानंतर अनौपचारिक गप्पा मारताना कळले की सुमनताई ज्या विभागात काम करतात तेथे अमराठी अधिकाऱ्यांना मराठी शिकवण्याचे काम करतात. जिथं CEO , कलेक्टर , डेप्युटी CEO , IAS, विविध विभागाचे सचिव यांची प्रशिक्षण येथे होतात. मग खऱ्या मराठी प्रशिक्षणाची जाणीव झाली ......अन शब्दरूपाने प्रा.सौ.सुमनताई बेलवलकर आजही स्मरणात राहिल्या ...

No comments:
Post a Comment