माझे इतर लेख वाचण्यासाठी ब्लॉगच्या होम पेज वर कॅटेगरी (catagory ) वरील ऑप्शनला जा आणि आपल्या आवडीचा ब्लॉग वाचा. आवडलेला ब्लॉग आपल्या मित्रांना ,सहकाऱ्यांना whatsapp, facebook द्वारे शेअर करा. किंवा पेजची लिंक तुमच्या whatsapp ग्रुपला share करा.धन्यवाद.....!

Friday, April 10, 2020

कोरोना आपत्ती व्यवस्थापन - आपली भूमिका

कोरोना आपत्ती व्यवस्थापन -  आपली भूमिका

    27 डिसेंबर 2019 रोजी संपूर्ण मानवजातीला धक्का देणारा ' कोविड19' हा कोरोना पसरवणारा विषाणू लक्षात आला. गेले शंभर दिवस जगात त्याने थैमान घातले आहे. जागतिक महासत्तेचे केंद्र असणारी अमेरिका आणि जगात प्रगत असणारी फ्रान्स, इटली,स्पेन ह्या राष्ट्रांनी देखील नांगी खाली टाकली आहे. संपूर्ण जगाच्या प्रगतीचे चक्र आज थांबलंय .
            आजपर्यंत अनेक युद्ध, संप झाले पण कोविड 19 मुळे जे चालू आहे त्यापेक्षा ते कमीच आहे. ह्या कोविड19 मुळे मानवजात धोक्यात आली आहे. ही जागतिक महामारी मध्ये आपलं योगदान असायला हवं. जगायचंय सर्वांना ,आणि मरायचंही आहे एक दिवस सर्वांना . आपला जन्म इतका स्वस्तात द्यायचा नाही. आपलं जगणं केव्हाही दुसऱ्याचा हिताचं व्हावं .
    मला कायम वाटतं की आपल्या जगण्याने दुसऱ्याला ताप होत असेल तर ते पाप आहे.  आपल्याला कोविड19 ची लागण झाली तर  काय होईल ? मी तंदुरुस्त आहे.मला काही होणार नाही . तुम्हाला वाटत असेल माझ्या स्वतःपुरते फार बिघडणार नाही ,पण आपल्यामुळे त्याचा प्रसार होईल आणि आपण कोविड 19 च्या वाहकाचे काम करू .आणि जी साखळी थांबायलाया हवी ती न थांबता तशीच पुढे चालू राहील .
      जागतिक कोविड 19 च्या प्रादुर्भाव टाळण्यासाठी  जागतिक आपत्ती व्यवस्थापन चा एक भाग म्हणू न लॉकडाऊन केले आहे . यामध्ये प्रत्येकाने घरीच राहणे गरजेचे आहे .  आपण बळी पडू नये आणि कोरोनाचे वाहक देखील होऊ नये , याची दक्षता सर्वांनी घ्यायला नको का ?
         कोविड 19 च्या आपत्ती व्यवस्थापन मध्ये प्रत्येकाचे कर्तव्य हे आहे ,की कोविड19 चा आपण प्रसारक होऊ नये.

कोरोना  व्हायरसचा वाढता प्रभाव व लाॅकडाऊनमुळे देशभरात किंबहुना जगात झालेली परिस्थिती पाहता अनेक सामान्य कुटुंबाना जगणं मुश्किल झालं आहे. या परिस्थितीत हातावरील पोट असणारी अनेक कुटुंबं, त्यांच्या घरात असलेली लहान-लहान मुलं यांना उपाशीपोटी रहावे लागत आहे.लाॅक डाऊनमुळे रोजगार बंद असल्याने अशा अडचणीत सापडलेल्या कुटुंबाकडे कोणताही पर्याय शिल्लक नाही.
                "आम्ही तुम्हाला मरु देणार नाही. "
             हे ब्रीदवाक्य उराशी घेऊन  काही सामाजिक  सेवा देणाऱ्या संस्था आणि मंडळ  संपूर्ण देशात , शहरी आणि ग्रामीण भागात सातत्याने काम करत आहेत.
                    ▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
                  मी एक शिक्षक आहे .या आपत्ती व्यवस्थापन मध्ये माझाही वाटा  असायला हवा.  आपण आपल्या सर्व विद्यार्थ्यां पर्यंत मेसेज पोहचवला पाहिजे की पुढील शैक्षणिक वर्षात आपल्याला पाठ्यपुस्तके कशी उपलब्ध करता येतील ?यासाठी आपण काय करायला हवे?  आपण आपल्या विद्यार्थ्यांपर्यंत  मेसेज पोचवायला हवा. गेल्या वर्षात म्हणजे सन 2019-20 मध्ये जी पाठ्यपुस्तके वाटप केली त्या संदर्भात माहिती  द्यायला हवी !
   आपण आपल्या शाळेतील सर्व विद्यार्थ्यांच्या पालकांपर्यंत मेसेजद्वारे पोचायला हवे.  पालक, विदयार्थी ,SMC  सदस्य ,ग्रामपंचयातसदस्य या सर्वांना   विनंती करण्यात यावी, की सन 2019-20 या शैक्षणिक वर्षामध्ये विद्यार्थ्यांना मोफत  देण्यात आलेली  पाठयपुस्तके जपून ठेवा. निकाल देताना ,ही  सारी पुस्तके आम्ही शाळेत जमा करून घेऊ. तसेच जितक्या विषयाची पाठयपुस्तके असतील तेवढी पाठयपुस्तके शिवाय डबल पुस्तके ,जुनी पुस्तके ,  कृपा करून आपल्या शाळेत जमा करा .  जुन्या वह्या जपून ठेवा ,  स्वाध्याय लिहिलेल्या वह्या देखील जपून ठेवा .त्यातील कोरी पाने पुढील वर्षी वापरता येतील .
                          याचं कारण असं की सध्या प्रति वर्षीप्रमाणे मिळणारी पाठयपुस्तक व वह्या यांची छपाईचे काम पूर्ण बंद आहे. शाळा सुरू झाल्यावर लगेच साहित्य उपलब्ध होणार नाहीत. याची सर्वांनी नोंद घ्यावी. तसेच हा मेसेज जास्तीत जास्त फॉरवर्ड करावा ,जेणे करून आपल्या गावातील आणि शाळेतील  सर्वांना त्याचा फायदा होईल. तसेच आजूबाजूला असणाऱ्या पालकांना  तुम्हाला जसे शक्य असेल तसे संदेश पाठवून ही  शैक्षणिक जागृती करावी ही विनंती.
          आपण विद्यार्थ्यांचे शिक्षक,पालक म्हणून काम करायला हवे .  प्रत्येक वर्षी प्रमाणे वह्या फाटलेली पुस्तके रद्दीला न घालता ती जपून ठेवावीत .शाळेत जमा करावीत .शाळा त्याचे योग्य नियोजन करेल .आणि जास्तीत जास्त आपल्या गावातील विदयार्थ्यांना त्याचा फायदा होईल .                                   ..................…....


(या लेखाचा उद्देश कोरोना विषयी भीती पसरविणे अगर उपाय सुचवणे नसून , पालक विद्यार्थी आणि शिक्षक यांनी आपत्ती व्यवस्थापनामध्ये आपला वाटा काहीतरी असावा हा  विचार वाचकांसमोर  ठेवणे हा आहे.)

🙏🙏🙏🙏🙏
 इतर आणखी काही लेख वाचण्यासाठी माझ्या
 bhausahebmahanor.blogspot.com
ला भेट द्या./ ब्लॉगला फॉलो करा ./subscribe करा ....
 🙏🙏🙏🙏🙏

🙏🙏share करण्या साठी निळ्या रंगामधील whatsapp किंवा facebook वर टच करा.🙏🙏

No comments:

Post a Comment