इंग्लिश भाषा सोपी कशी वाटेल ?
शालेय शिक्षणात गणित,विज्ञान आणि इंग्लिश हे विषय अवघड आहेत असं आपण पुन्हा पुन्हा सांगून बालमनावर बिंबवतो. खरंतर कोणतीही विशिष्ट भाषा अवघड किंवा सोपी असते का? इंग्लिश भाषा अवघड असती तर जगातील इतक्या लोकांनी कम्युनिकेशन साठी ही भाषा स्वीकारली असती का ? कुणालाही परकी भाषा शिकताना अवघड वाटत असते. जगातील अनेक देश, लोकसमूह इंग्लिश भाषा बोलतात , वाचतात आणि लिहितात .मग आपणाला इंग्लिश भाषा अवघड का वाटते . आपण मराठी भाषा जपली पाहिजे हे बरोबर आहे,पण इंग्लिश भाषा शिकू नये असं नाही.प्रत्येक माणसानं बहुभाषिक व्हायला हवे. आपल्या शेजारील गावाची,जिल्ह्याची ,राज्याची ,देशाची आणि जगाची भाषा शिकायला हवी. मुलांना इंग्लिश भाषा सोपी वाटावी म्हणून मोठ्या व्यक्तींनी आधी इंग्लिश जवळ केली पाहिजे. माझं आता वय झालं मला आता काय जमतंय ? मी आता इंग्लिश शिकून काय उपयोग ? असे उगीचच प्रश्न निर्माण करू नयेत.
आज आपण दैनंदिन जीवनात अनेक इंग्लिश शब्द बोलतो, तरीही इंग्लिश भाषे बद्दल इतका द्वेष का ? आज आपली सकाळ इंग्लिश ने सुरू होते आणि रात्री चा शेवट देखील इंग्लिशने होतो .खरंय ना ? तरीही दिवसभर इंग्लिश चा राग राग .
इंग्लिश मध्ये स्पेलिंग पाठांतर ही शेवटची पायरी आहे . आपण ती पायरी सर्वात अगोदर शिकवतो . मग मुलाला इंग्लिश शिकायला आंनद वाटेल का ?
एक लक्षात घ्या भारतीय संसदेचे कामकाज दररोज कोणत्या भाषेतून चालते ? पर्यटन व्ययसायमध्ये , कृषी बी - बियाणे, औषधे खते ही माहिती इंग्लिश मधून एव्हलेबल आहे .ते कळण्यासाठी तरी इंग्लिश भाषा शिकायला हवी.
प्रथम पालकांनी इंग्लिश भाषा शिकायला हवी.जरी नाही शिकता अली ,तरी पाल्यांना प्रोत्साहन दिले पाहिजे . मग इंग्लिश भाषा सोपी वाटायला लागेल.
🙏 🙏🙏🙏🙏
इतर आणखी काही लेख वाचण्यासाठी माझ्या
bhausahebmahanor.blogspot.com
ला भेट द्या. / ब्लॉगला फॉलो करा ./ subscribe करा .
🙏🙏🙏🙏🙏
🙏🙏share करण्या साठी निळ्या रंगामधील whatsapp किंवा facebook वर टच करा.🙏🙏

नमस्कार सर मी हणमंत कोळी डफळापूर माझा ही ब्लॉग आहे मला या बद्दल माहिती हवी आहे तुमच्या ब्लॉग वर व्हाटसप व फेसबुक येते व इतर माहिती हवी आहे
ReplyDelete