माझे इतर लेख वाचण्यासाठी ब्लॉगच्या होम पेज वर कॅटेगरी (catagory ) वरील ऑप्शनला जा आणि आपल्या आवडीचा ब्लॉग वाचा. आवडलेला ब्लॉग आपल्या मित्रांना ,सहकाऱ्यांना whatsapp, facebook द्वारे शेअर करा. किंवा पेजची लिंक तुमच्या whatsapp ग्रुपला share करा.धन्यवाद.....!

Thursday, March 12, 2020

ध्येयवेडे शिक्षक - समीर माने सर,(माहुली)

ध्येयवेडे शिक्षक - समीर माने ,सर (माहुली)




                           श्री समीर हिम्मत माने मुळगाव माहुली,ता -खानापूर,जि-सांगली. सध्या ते जि. प.शाळा ,भिकवडी. केंद्र - नागेवाडी ,ता-खानापूर, जि-सांगली येथे कार्यरत आहेत. सरांची नेमणूक दि.  30/08/ 2011असून त्यांना खो खो चे वेड आहे. स्वतः ग्राउंड वर उभे राहून खेळाडूंचे प्रॅक्टिस घेतात.समीर माने सर दररोज शाळा सुटल्यानंतर रात्री नऊ वाजेपर्यंत ग्राउंड वर असतात.
                       भिकवडी येथील जि. प.शाळेतील विद्यार्थी राज्यस्तरीय खो खो स्पर्धेमध्ये पर्यंत नुसता जाऊन आली नाहीत तर विजेते होऊन  आलेले आहेत . ही  त्यांच्या विषयी अभिमान वाटणारी गोष्ट आहे. गावाला आउटपुट दिसल्यानंतर गाव काय करू शकतं याचं ते उत्तम उदाहरण आहे. शालेय स्पर्धा आणि अमॅच्युअर स्पर्धामधील कामगिरी पाहून ग्रामपंचायत ने शाळेच्या मैदानावर एल ई डी लाईट बसवले आहेत.
 आज त्यांनी घडवलेले विद्यार्थी राज्य स्तरावर खेळत आहेत.
 सानिका चाफे ही सहावीत शिकणारी विद्यार्थिनी राज्यस्तरावर उत्कृष्ट कामगिरी करते. अमॅच्युअर मधून सानिका इयत्ता चौथीत असल्यापासून खेळते.
     चालू वर्षी सन 2019-20 मध्ये सांगली जिल्हा क्रीडा स्पर्धा पार पडल्या.  त्यामध्ये  भिकवडी शाळेची कामगिरी वाखाणण्यासारखी आहे.  सांगली जिल्हास्तरीय  स्पर्धेमध्ये भिकवडी  शाळेने भाग घेऊन एकट्या शाळेने ७८ गुण मिळवून सांगली जिल्हास्तरीय  स्पर्धेमध्ये खानापूर तालुक्याला जनरल चँपीयनशिप मिळवून देण्यामध्ये मोलाची कामगिरी केली आहे . त्याच शाळेने अधिकची कामगिरी करून राज्यातही आपला दबदबा निर्माण केला आहे .

     
दि.५/३/२०२०ते दि ८/३ २०२०या दरम्यान डेरवण ता. चिपळूण येथे डेरवण ट्रस्ट मार्फत राज्यस्तरीय खो खो स्पर्धा आयोजित करण्यात आली होती .सादर क्रीडा स्पर्धेमध्ये 14 वर्षे वयोगटातील पुणे ठाणे,मुंबई सांगली रत्नागिरी आणि इतर जिल्ह्यामधून एकूण 20 संघ सहभागी झाले होते .

         या स्पर्धेमध्ये सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील भिकवडी गावातील मुलींनी १४ वर्षाखालील गटात भाग घेऊन राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये राज्यात द्वितीय क्रमांक प्राप्त करून, सांगली जिल्ह्याचे नाव राज्यात केले.
त्या नावासोबत मार्गदर्शक शिक्षक समीर माने सर ,यांचे कष्ट निश्चितच अभिनंदनीय आहेत.
                डेरवण जिल्हा रत्नागिरी येथे झालेल्या राज्यस्तरीय खो खो स्पर्धेत सानिका चाफे हिने पुणे संघाबरोबर सेमीफायनल सामन्यात सात मिनिटे संरक्षण केले आणि नॉट आऊट राहिली . फायनल वाळवा जिल्हा सांगली या संघाबरोबर चार मिनिट संरक्षणाची कामगिरी केली . सामने पाहणाऱ्या सर्व प्रेक्षकांचे डोळ्यांचे पारणे तिने फेडले.  संदीप तावडे साहेब ,महाराष्ट्र राज्य खो खो असोशियशनचे सरचिटणीस , सानिका हिची सात मिनिटे संरक्षण पाहत होते.
                सदर स्पर्धेमध्ये सानिका चाफे इ.६ वी हिला स्पर्धेमधील सर्वोत्कृष्ट संरक्षकाचा किताब , सर्टिफिकेट व रोख १५०० रु चे पारितोषिक मिळाले.प्रेक्षकांनी सानिकाचे संरक्षण पाहून उत्स्फूर्त दाद देत 2000 रु .चे बक्षीस दिले. सदर संघाला समीर माने ,अशोक काळे ,प्रिया शरनाथे मँडम व मनिषा जाधव मँडम यांनी प्रशिक्षण दिले आहे.

              एकदा समीर माने सरांचे मित्र अशोक काळे राहणार विटा, एकदा काळे सरांच्या संघासाठी मार्गदर्शन घेण्यासाठी माने सरांकडे गेले असता ,  माने सरांनी खो खो प्रॅक्टिस सुरू करायची आहे असा मनोदय बोलून दाखवला . तेव्हा काळे सर म्हणाले की तुम्ही सुरू करा , काही अडचण आली तर आम्ही तुम्हला मदत करतो. तेव्हा माने सरांनी प्रॅक्टिस सुरू केली .
सद्यस्थितीत सदाशिव पाटील सर, प्रिया शरनाथे मॅडम,  मनीषा जाधव मॅडम या कामात  माने सरांना मदत करतात.


                    डेरवण जिल्हा रत्नागिरी येथे तिथी नुसार येणाऱ्या शिवजयंती निमित्त  राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धा भरवतात.  या स्पर्धा सर्व क्रीडा प्रकारच्या असतात.   जवळजवळ वीसेक क्रीडा प्रकारच्या स्पर्धा येथे घेतल्या जातात. या स्पर्धेसाठी स्थानिक ग्रामस्थ जवळजवळ दोन कोटी रुपये खर्च करतात.
                   स्पर्धा एक आठवडाभर चालतात. प्रत्येक क्रीडा प्रकारासाठी वेगवेगळे मॅनेजमेंट असते.  या क्रीडा स्पर्धा पार पाडण्यासाठी    जवळपास    सातशे   माणसं  आठवडाभर राबतात.  शिवजन्मोत्सव हा असा डेरवण    मध्ये आगळा वेगळा साजरा केला जातो. या ठिकाणी होणाऱ्या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत आपल्या नावाचा शिक्का चिरकाल टिकावा ही अपेक्षा आम्ही ठेवतो.
        अशा स्पर्धेत कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना गुरुदेवांची भूमिका साकारणारे सरकारी शाळेचे  ध्येयवेडे शिक्षक समीर माने सर, तुमचे अभिनंदन करावे तितके थोडेच आहे .

🙏🙏🙏🙏🙏
 इतर आणखी काही लेख वाचण्यासाठी माझ्या
 bhausahebmahanor.blogspot.com
ला भेट द्या./ ब्लॉगला फॉलो करा ./subscribe करा ....
 🙏🙏🙏🙏🙏

🙏🙏share करण्या साठी निळ्या रंगामधील whatsapp किंवा facebook वर टच करा.🙏🙏



🙏🙏🙏🙏🙏
 इतर आणखी काही लेख वाचण्यासाठी माझ्या
 bhausahebmahanor.blogspot.com
ला भेट द्या./ ब्लॉगला फॉलो करा ./subscribe करा ....
 🙏🙏🙏🙏🙏

🙏🙏share करण्या साठी निळ्या रंगामधील whatsapp किंवा facebook वर टच करा.🙏🙏




3 comments: