माझे इतर लेख वाचण्यासाठी ब्लॉगच्या होम पेज वर कॅटेगरी (catagory ) वरील ऑप्शनला जा आणि आपल्या आवडीचा ब्लॉग वाचा. आवडलेला ब्लॉग आपल्या मित्रांना ,सहकाऱ्यांना whatsapp, facebook द्वारे शेअर करा. किंवा पेजची लिंक तुमच्या whatsapp ग्रुपला share करा.धन्यवाद.....!

Wednesday, March 11, 2020

यश कशात आहे?

                        आपण यशस्वी व्हायला हवं ,अशी प्रत्येकाची आंतरिक इच्छा असते,आणि ती असणे आवश्यक आहे. "आपण यशस्वी कसं व्हायचं ?" त्याबद्दल प्रयत्नशील राहणे आणि सातत्य ठेवणे , गरजेचे आहे. आळशी माणूस हा दैत्य आहे,तर प्रयत्नवादी माणूस हा देव आहे. यश हे देवाच्या हाती असते.  यशाच्या शिखराकडे वाटचाल करताना महत्वाच्या तीन गोष्टी आहेत. त्या म्हणजे तळमळ,उत्साह आणि धैर्य. या तिन्ही गोष्टी अंगिकारल्या तर खात्रीने आणि त्वरित यश प्राप्त होते.  आपल्या अंगी असलेल्या सद्गुण आणि दुर्गुण यांची यादी करा. या दुर्गुणांचा लय  कसा करावा ,याचा विचार करून प्रयत्नशील व्हा .
                 आपल्या आयुष्यात आता नजीकच्या भविष्यात काय हवे आहे ? आणि अंतिम  ध्येय कोणते गाठवायचे आहे? याचा परिपूर्ण आणि सर्वांगाने विचार करा. प्रत्येक दिवशी स्वतःच्या विकासाच्या दृष्टीने कोणती  पाऊले टाकली आणि यात किती यश प्राप्त झाले ? याची नोंद ठेवा .
                    आल्या जीवनात आनंद ,समाधान आणि स्वास्थ्य हे प्रथम  प्राधान्याने ध्येय ठेवा. आपल्या कुटुंबाविषयी प्रेम, मित्राविषयी निष्ठा व आपुलकी , सहकाऱ्यांमध्ये प्रतिष्ठा आणि वरिष्ठांकडून शाबासकी  मिळवणे हे त्वरित आणि तात्कालिक ध्येय आहे. इतरांना आनंद देण्यातच आपणाला आनंद मिळेल . खूप मित्रसंग्रह करा . हव्यास, चिंता ,मत्सर आणि संशयीवृत्ती  ,यामुळेच  दुःख मिळते; तर विशाल हृदया मुळे आपणास आणि इतरांस आनंद मिळतो.
                   समाधान हेच आनंदाचा मूळ पाया  आहे . समाधान माणसाला वेगवेळ्या मार्गाने मिळते. कोणाला दुसऱ्याची सेवा करून ,कुणाला दुसऱ्याला मदत करून ,कोणला समाजसेवा करून, कुणी सोपवलेले काम पूर्ण करून, तर कोणी राजकारणातून समाजसेवा करतो आणि समाधान मिळवतो . आपल्या कडून कोणत्या व्यक्तीला हानी पोहचत असेल तर ते पाप आहे ,आल्या निरपेक्ष भावनेतून केलेल्या मदतीने व्यक्ती लाचार होत नसेल तर तो पुण्याईचा मार्ग आहे .असे मार्ग मग माणसाला यशाच्या शिखरावर नेऊन सोडतात.

No comments:

Post a Comment