प्रिय विद्यार्थी मित्रांनो,
मी शिक्षक म्हणून अनेक वर्षे काम केले असलो तरी तुमच्यासाठी मी नवीन आहे. तुम्ही आता सहावी सातवीच्या वर्गात आहात. माझ्या आधी गेली पाच सहा वर्षे तुम्हाला अनेक शिक्षकांनी शिकवलेले आहे. सातवीचे विद्यार्थी तर माझ्याकडे सहाच महिने असणार आहेत. आता मी नवीन काही शिकवून लगेच बदल होईल असं मला वाटत नाही. मी तुम्हाला पाठ्यपुस्तक शिकवणार आहेच. त्याच बरोबर मी तुम्हाला अभ्यास कसा करायचा हे सांगणार आहे. आज समाजात अनेक अनेक आदर्श तुमच्यासमोर आहेत. शिक्षकांपेक्षा अधिक माहिती देणारे स्रोत देखील उपलब्ध आहेत. मला तुमचे मन नाराज करून तुम्हाला शिकवायचे नाही. शाळेची शिस्त पाळून आपण आनंदाने शिकायचं आहे.तुमच्या शिकण्यातील अडचणी समजून घेऊन तुम्हाला उपाय सांगणे हे माझे काम आहे. तुम्ही, तुमचे पालक आणि मी मिळून हे शिक्षणाचे पवित्र कार्य आपल्याला करायचे आहे. मूल हे पालकांचं एक दिव्य स्वप्न असतं.एखाद्याने त्याचं स्वप्न माझ्याकडे दिल्यानंतर त्याचे सर्व पदर उलगडून दाखवणे हे माझे काम आहे. तुमच्यातील उणिवा पालकांच्या लक्षात आणून देणे आणि त्या उणीवा तिघांनी मिळून दूर करणे हे आपले तिघांचे काम आहे.तुमचा आदर्श कोणता असावा हे ठरविण्याचा व एखादा आदर्श तुमच्यावर लादण्याचा मला अधिकार नाही. माझे कर्तव्य एवढेच आहे की, मला माहीत असलेले सर्व आदर्श तुमच्यासमोर ठेवायचे; आणि तुमचा आदर्श तुम्हीच निवडायचा.
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
या ब्लॉगच्या होम पेज वरील कॅटेगरी (catagory ) वरील ऑप्शन ला जा आणि इतर ब्लॉग वाचा .आवडलेला ब्लॉग आपल्या मित्रांना ,सहकाऱ्यांना whatsapp, facebook द्वारे शेअर करा .
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
No comments:
Post a Comment