माझे इतर लेख वाचण्यासाठी ब्लॉगच्या होम पेज वर कॅटेगरी (catagory ) वरील ऑप्शनला जा आणि आपल्या आवडीचा ब्लॉग वाचा. आवडलेला ब्लॉग आपल्या मित्रांना ,सहकाऱ्यांना whatsapp, facebook द्वारे शेअर करा. किंवा पेजची लिंक तुमच्या whatsapp ग्रुपला share करा.धन्यवाद.....!

Saturday, July 01, 2023

श्री.कृष्णा धोंडिबा तेरवे सर यांच्या सेवानिवृत्ती निमित्त

 श्री कृष्णा धोंडीबा तेरवे सर यांच्या

सेवानिवृत्ती निमित्त




श्री कृष्णा धोंडीबा तेरवे ( वरिष्ठ मुख्याध्यापक) जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा- देवनाळ ,तालुका- जत,जिल्हा- सांगली.

सेवानिवृत्ती तारीख 31 मे 2023 

नाव:-श्री कृष्णा धोंडीबा तेरवे 

जन्मगाव -  दरीबडची, तालुका- जत,

प्राथमिक शिक्षण - जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दरीबडची ( इयत्ता पहिली ते सातवी )

माध्यम शिक्षण-  श्री भैरवनाथ हायस्कूल दरीबडची ता- जत, जि- सांगली. 

डी एड  :- श्री विठ्ठलराव देशमुख अध्यापक विद्यालय माहुली. ता- खानापूर,  जि- सांगली.

बी.ए.-  शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर.

बी.एड.-  यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक.


             तेरवे सर हे  एक मनमिळावू ,  विद्यार्थीप्रिय , समाजप्रिय , आणि उपक्रमशील शिक्षक असून त्यांना अद्याप पर्यंत अध्ययनाची आणि अध्यापनाची अत्यंत रुची होती ;आणि त्यांनी ती टिकवून ठेवली. तेरवे सरांच्या नोकरीची सुरुवात जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सोन्याळ ता-जत, जि-सांगली  येथून 17 मार्च 1989 रोजी झाली. 

सेवकाल 

17 मार्च 1989 -  जि. प. शाळा सोन्याळ, ता-जत  (सहाय्यक शिक्षक ) 

06/01/1998- जि. प. शाळागोंधळेवाडी. ( पात्र पदवीधर  शिक्षक.)

21/01/2004 - जि. प. शाळा,  घोलेश्वर. ( पात्र पदवीधर  शिक्षक.)

27/04/2004 -  जि. प. शाळा ,तिप्पेहळ्ळी , ( पात्र पदवीधर  शिक्षक.)

21/06/2012 -   जि. प. शाळा .खानापूर , तालुका-  खानापूर ( पात्र पदवीधर  शिक्षक.)

04/01/2013 - जि. प. शाळा  कोळगीरी, ता-जत  ( वरिष्ठ मुख्याध्यापक)

29/05/2018 - जि. प. शाळा देवनाळ ( वरिष्ठ मुख्याध्यापक)

आज 31 मे 2023  रोजी  त्यांची सेवानिवृत्ती जिल्हा परिषद प्राथमिक शाळा , देवनाळ ता-जत, जि-सांगली  या शाळेतून होत आहे. 





             अध्यापनाची एकूण सेवा 34 वर्षे 2 महिने 14 दिवस झाली.  प्रत्येक शाळेमध्ये तेरवे  सरांनी वेगवेगळ्या स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांना व्यासपीठ उपलब्ध करून दिले. मराठी , गणित या विषयांच्या बरोबर पात्र पदवीधर शिक्षक  म्हणून त्यांनी इंग्लिश या विषयाचे अध्यापन देखील उत्कृष्ट पद्धतीने केले आहे. इंग्रजी अध्यापनात त्यांचे अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम शाळेत राबवले गेले. इंग्रजी भाषेत त्यांचा हातखंडा होता आणि अजूनही आहे. शिकवणे हे  एक केवळ सोपवलेले किंवा लादलेले  काम नसून ही एक कला आहे आणि ती कला विद्यार्थीप्रिय विद्यार्थ्यांना रुचेल समजेल अशा भाषेत, सोप्या  पद्धतीने समजावून देण्याचा त्यांचा नेहमी अट्टाहास होता.  

        चौतीस वर्षाच्या अखंड सेवा काळात तेरवे सरांचे अनेक विद्यार्थी उच्च पदावर पोहोचलेले आहेत. स्कॉलरशिप परीक्षा बद्दल मार्गदर्शन, विविध स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन आणि नियमित इंग्रजी  विषयाचे अध्यापन तसेच भाषेचे अध्यापन यात त्यांचा हातखंडा होता. आजही त्यांनी खडू आणि पुस्तक खाली ठेवले नाही. त्यांनी अध्यापन केलेल्या शाळेतील अनेक विद्यार्थी आज मोठ्या पदावर विराजमान झालेले आहेत.  विविध ठिकाणी त्यांचे विद्यार्थी विखुरलेले आहेत. त्यांच्या ज्ञानाचा पाझर, ज्ञानाचा प्रवाह तळातल्या प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचलेला आहे. त्यांनी केवळ डी. एड. वर समाधान न मानता ग्रॅज्युएशन , पोस्ट ग्रॅज्युएशन , आणि बी. एड. देखील केले आहे . आज सेवा निवृत्त होत असताना ज्ञानाच्या संग्रहाने आणि समृद्ध मनाने सेवा निवृत्त होत आहेत. 

           आजच्या युगात इंग्लिश बोलता आले पाहिजे , हा अट्टाहास ठेऊन शाळेत विद्यार्थ्यांसाठी  इंग्लिश भाषेचे अनेक उपक्रम राबवले आहेत. सरांच्या आवडीचा विषय भाषा मराठी. परंतु गेली पंधरा वर्षे त्यांनी इंग्रजी विषयाचे  पात्र पदवीधर शिक्षक म्हणून सेवा केली . एकूण सेवेच्या कालखंडामध्ये अध्यापनाबरोबर इयत्ता चौथी व सातवी शिष्यवृत्ती परीक्षेचे अनमोल असे मार्गदर्शन केले. त्याचबरोबर तालुका व जिल्हा स्तरावर वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये सक्रीय सहभाग घेतला आहे. विद्यार्थी गुणवत्ता वाढीसाठी विविध उपक्रम शाळास्तरावर राबवले आहेत.  

         शाळेच्या भौतिक सुविधा मिळवण्यासाठी पालक संपर्क ,पदाधिकारी तसेच प्रशासकीय अधिकारी यांची मदत घेऊन शाळा व शाळेचा परिसर उत्तम ठेवण्याचा कायम प्रयत्न केला आहे. स्वच्छ सुंदर शाळा स्पर्धेमध्ये भाग घेऊन शाळेला पुरस्कार मिळवून दिला आहे.  विद्यार्थ्यांना शिस्त लावणे स्वतः प्रयत्नशील राहिले व त्यांच्यासोबत सहकारी शिक्षक यांनासुद्धा शिस्त लावली.  तसेच त्यांच्या अंगी असणाऱ्या जिद्द, चिकाटी मेहनतीच्या जोरावर त्यांची शाळा व विद्यार्थ्यांच्या प्रगतीकडे नेहमीच वाटचाल राहिली आहे.  शालेय सहकारी शिक्षकांना सोबत घेऊन मुलांच्या गुणवत्तावाढीसाठी नेहमी  दक्ष राहिले आणि  लक्ष दिले. 

शालेय परिसर सुशोभित करण्यासाठी वृक्षारोपण आणि वृक्षसंवर्धन यासारखे कार्यक्रम हाती घेतले. त्याचबरोबर राष्ट्रीय कामे जनगणना, कुटुंबनियोजन , साक्षरता अभियान, लसीकरण  आणि मतदारनोंदणी यासारख्या कार्यक्रमात सहभाग नोंदवून उत्तम रित्या काम केले. त्यांच्या एकूण सेवा कालामध्ये विद्यार्थी,  शिक्षक, पालक , पदाधिकारी,  अधिकारी व समाज यांच्याशी आदराची, सहकार्याची व सहानुभूतीची भावना राहिली.



      सेवाकार्य बजावत असताना शिक्षकांसाठी देखील  सुरुवातीपासून  शिक्षक संघटनेत काम केले आहे . शिक्षकांच्या प्रश्नांसाठी कायम झटत त्यांनी उदार मनाने सेवा केली . 





इतकी वर्षे नोकरी केल्यानंतर प्रत्येकाच्या आयुष्यात न टाळता येणारा दिवस म्हणजे ‘सेवानिवृत्तीचा’. कामावर असताना सेवानिवृत्त झाल्यानंतर काय काय करु आणि काय काय नको, याची स्वप्नं अनेकांनी पाहिलेली असतात. पण न कळत हा दिवस आल्यानंतर अनेकांच्या डोळ्यात पाणी तरळते. आयुष्याची थर्ड इनिंग सुरु होते.  ज्या मित्रांच्या आणि सहकाऱ्यांच्या साथीने तुम्ही तुमचे दिवस घालवलेले असतात ते पुन्हा येण्याची संधी आयुष्यात परत मिळणार नसते. ज्यांना तुम्ही गुरूस्थानी मानून गुरूपौर्णिमेच्या शुभेच्छा ही दिलेल्या असतात. ते ही आज नसतात.  मनावर दगड ठेवून या दिवशी आपण आनंद साजरा करतो. पण या दिवशी दु:खही तेवढेच होत असते. 


सेवानिवृत्तीचा दिवस आला.. 

अगदी मनासारखं काहीतरी करण्याचा काळ आला.. 

जे जे तुम्ही ठरवलं ते सगळं करावं… 

तुम्हाला जे जे हवे ते सारे मिळावे.. 

कुटुंबाची जबाबदारी घेण्यासाठी

तुम्ही कष्ट केले अपार 

आता ही वेळ म्हणते थांबा 

आणि करा थोडा आराम.. 



 कौटुंबिक पार्श्वभूमी - 

 आज तेरवे सर सेवानिवृत्त होत असताना त्यांच्या कुटुंबात  त्यांच्या सुविद्य पत्नी ,दोन मुले  आहेत. त्यापैकी एक मुलगा सागर तेरवे हा आय.टी.कंपनीत इंजिनिअर म्हणून सेवा करत आहे. तर संदीप तेरवे याचे MBA शिक्षण पूर्ण झाले आहे.   त्यांच्या सौभाग्यवती  शोभाताई या गृहिणी आहेत. आईचे निधन 1996 सली झाले तर वडीलांचे  2013 साली निधन झाले. श्री तेरवे सरांसहित तिघे भाऊ त्यापैकी दोघे हयात आहेत.  मोठे भाऊ कृष्णा ,श्रीमंत आणि बाळासाहेब.  बहिणी चार आहेत. त्यापैकी सौ. लक्ष्मीबाई शिवाजी माने (दरीबडची ,शेती) सौ. अनुसया बाळासाहेब पुकळे (हंगिरगे- ता- सांगोला ,शेती) सौ. चिंगाताई सखाराम कुलाळ (जाडर बोबलाद -  शेती) सौ. कल्पना रावसाहेब ठोंबरे ( संख - शेती )

मनापासून शुभेच्छा

तेरवे सरांना सेवानिवृत्ती नंतर महत्वाचे म्हणजे  आरोग्य लाभो ते आरोग्य अनुभवायला उदंड आयुष्य लाभो.  जसा  सेवपूर्व काल झगडत गेला, सेवाकाल  अनेक यश मिळवत आनंदात गेला  तसा सेवापाश्चात्य काल निश्चिन्त जावो. सेवानिवृत्ती नंतरचा काळ सुखात ,आनंदात समाधानात , जावो ही मनापासून कामना . 


जाणा-या ला निरोप देणे 

हा फक्त शिष्टाचार नाही 

तर तो संस्कृतीचा भाग आहे 

संस्कृतीचा अविष्कार आहे. 



निरोप दयावा, 

परि न क्लेश मनी ठेवाल 

आयुष्यात जेंव्हा जेंव्हा भेटाल 

स्मितहास्य जरुर कराल .............


🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

 इतर आणखी काही लेख वाचण्यासाठी माझ्या
bhausahebmahanor.blogspot.com
  या ब्लॉगच्या होम पेज वरील कॅटेगरी (catagory ) वरील ऑप्शन ला जा आणि इतर ब्लॉग वाचा .आवडलेला ब्लॉग आपल्या मित्रांना ,सहकाऱ्यांना  whatsapp, facebook द्वारे शेअर करा .
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
 भविष्यात इतर आणखी काही लेख वाचण्यासाठी माझ्या
 bhausahebmahanor.blogspot.com
या ब्लॉगला फॉलो करा ; की जेणेकरून नवीन लेख पब्लिश झालेची नोटीफिकेशन आपोआप मिळेल.
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  एखादा ब्लॉग आवडल्यास , पोस्ट वाचताना उजव्या कोपऱ्यात वरील ऑपशन(तीन टिंब ) वर  जाऊन आपल्या मित्रांना  whatsapp किंवा facebook द्वारे  share करु शकता.किंवा आपल्याला आलेली  लिंक शेअर/फॉरवर्ड करा.
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏





No comments:

Post a Comment