माझे इतर लेख वाचण्यासाठी ब्लॉगच्या होम पेज वर कॅटेगरी (catagory ) वरील ऑप्शनला जा आणि आपल्या आवडीचा ब्लॉग वाचा. आवडलेला ब्लॉग आपल्या मित्रांना ,सहकाऱ्यांना whatsapp, facebook द्वारे शेअर करा. किंवा पेजची लिंक तुमच्या whatsapp ग्रुपला share करा.धन्यवाद.....!

Friday, January 07, 2022

काराजनगी शाळेत सावित्रीबाई फुले यांची जयंती

 काराजनगी शाळेत सावित्रीबाई फुले यांची जयंती विविध कार्यक्रमांनी साजरी 




क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस दिनांक 3 जानेवारी 2022 ते  दिनांक 6 जानेवारी 2022  सलग चार दिवस विविध कार्यक्रम घेऊन साजरा करण्यात आला. 

 

दिनांक 3 जानेवारी 2020 रोजी गावातील  यशस्वी महिलांचा सत्कार आणि सन्मान करण्यात आला. सौ. संगिता लेंगरे, सौ. शुभांगी लेंगरे, सौ. रुक्मिणी माने,सौ.  राजश्री जाधव आणि  सौ. छाया शेजुळ यांचा सत्कार करण्यात आला.  मुलींच्या शिक्षणाचे महत्त्व पटवून देण्यासाठी  यशस्वी महिलांचे मनोगत ,त्याचबरोबर त्या यशस्वी महिलांची  सक्सेस स्टोरी विद्यार्थिनींना  सांगण्यात आली. 



 दिनांक 4 जानेवारी 2022 रोजी  न्यू इंग्लिश स्कूल निगडी च्या ज्येष्ठ शिक्षिका सौ कांचन बोराडे मॅडम यांनी कुमारवयीन मुली सोबत आईची  भूमिका काय असावी ?  याविषयी मार्गदर्शन केले. शिक्षण आपल्या पर्यंत आले आहे ते आपल्याला व्यवस्थित घेता आला पाहिजे. हा विचार मांडला.  कुमारवयीन मुलींनी  कोणत्या गोष्टी कराव्यात आणि कोणत्या नको ; हे आपण आई म्हणून मुलीला  शिकवता  आले पाहिजे. मुलगी जेव्हा मोठी होते , त्यावेळी तिच्या मध्ये होणारे बदल सांगायला  पाहिजेत.  

जेव्हा त्यांची मुलगी बेंगलोरला एकटी निघाली होती ; तेव्हा आईनं विचारलं , "तू एकटी कशी जाणार?" तेव्हा ती  म्हणाली , " मला तर सारे जग  पाहायचं आहे आणि आता मी  फक्त बेंगलोरला चालले ! एवढ्याच उत्तरानं आई अंतर्मुख झाली. सावित्रीबाईंनी खुल्या केलेल्या शिक्षणाचा उपयोग झाला. असे बोराडे मॅडमनी स्पष्ट केलं. 


         त्याचबरोबर सौ विशाखा सावंत मॅडम जिल्हा परिषद शाळा सपताळवस्ती (बनाळी) यांनी " मी सावित्री बोलतेय" हा  एकपात्री प्रयोग सादर करून सर्वांना मंत्रमुग्ध केले. सावंत मॅडम यांनी  इ. स. 1831 मधील  घटना सावित्रीबाई यांच्या शब्दात सर्वांच्या समोर उभ्या केल्या.  सावित्रीबाईंचे  बालपण,  सावित्रीबाईंचा ज्योतिराव फुले यांच्याशी झालेला विवाह आणि त्याचबरोबर महात्मा फुले यांच्या सोबत केलेले शैक्षणिक कार्य याविषयी विशाखा सावंत मॅडम यांनी एकपात्री प्रयोगांमध्ये सादरीकरण केले.

 

   दिनांक 5 जानेवारी 2020 रोजी श्रीमती वैशाली माने मॅडम विषयतज्ज्ञ  बीआरसी पंचायत समिती जत.  यांनी

 "मुलींचे शिक्षण- एक चिंतन " हा  विषय मांडला 

 माता पालक आणि कुमारवयीन मुली यांच्यासमोर व्याख्यान देताना माने मॅडम  म्हणाल्या की,  ताणतणावांचे समायोजन करता आलं पाहिजे. यासाठी आईची खूप मोठी जबाबदारी आहे. सोशल मीडियामध्ये वेगवेगळ्या पोस्ट व्हाट्सअप वर येत असतात त्यांच्यापासून आवश्यक असलेल्या गोष्टी घ्याव्यात नको असलेल्या सोडाव्यात.  त्याचबरोबर मुलींचे शिक्षण ही आजही  समस्या आहे; ती व्यवस्थित सोडवावी.  यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न केले पाहिजेत.  आईला घरात टीचर  होता आले पाहिजे आणि समाजातलं अंतर कमी करता आलं पाहिजे.  चुकीला चूक म्हणता आलं पाहिजे.   इतरांशी स्पर्धा करण्यापेक्षा स्वतःची स्पर्धा करायला आपण आपल्या मुलाला शिकवलं पाहिजे. वळण लावणं सर्वांचे कर्तव्य आहे आणि ते चांगलं असावे असंही त्यांनी मत व्यक्त केले. 


दिनांक 6 जानेवारी 2022रोजी 

विद्यार्थिनींच्या विविध भाषणाने आणि गायनाने  जयंतीचा कार्यक्रम साजरा  करण्यात आला.  या कार्यक्रमासाठी सौ गायकवाड आणि सौ उषा जाधव उपस्थित होत्या. 


 या संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन शा.व्य. समिती ,  मुख्याध्यापक , सर्व शिक्षक स्टाफ ,  माता पालक ,

 आणि विद्यार्थी विद्यार्थिनी ,  जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा काराजनगी यांनी केले. 

 कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री भाऊसाहेब महानोर आणि रियाज आत्तार  सर यांनी केले .तर कार्यक्रमाचे आभार माननीय  रघुनाथ गडदे सर  आणि समाधान यादव यांनी मानले.

यावेळी मुख्याध्यापक श्री आण्णाराव पाटील सर, सर्जेराव साळे सर ,श्रीकांत सोनार सर, श्री  रघुनाथ गडदे सर,   श्री. भाऊसाहेब महानोर सर,  श्री सुहास उत्तरे सर  आणि  श्री समाधान यादव सर उपस्थित होते. 


🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

 इतर आणखी काही लेख वाचण्यासाठी माझ्या
bhausahebmahanor.blogspot.com
  या ब्लॉगच्या होम पेज वरील कॅटेगरी (catagory ) वरील ऑप्शन ला जा आणि इतर ब्लॉग वाचा .आवडलेला ब्लॉग आपल्या मित्रांना ,सहकाऱ्यांना  whatsapp, facebook द्वारे शेअर करा .
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
 भविष्यात इतर आणखी काही लेख वाचण्यासाठी माझ्या
 bhausahebmahanor.blogspot.com
या ब्लॉगला फॉलो करा ; की जेणेकरून नवीन लेख पब्लिश झालेची नोटीफिकेशन आपोआप मिळेल.
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  एखादा ब्लॉग आवडल्यास , पोस्ट वाचताना उजव्या कोपऱ्यात वरील ऑपशन(तीन टिंब ) वर  जाऊन आपल्या मित्रांना  whatsapp किंवा facebook द्वारे  share करु शकता.किंवा आपल्याला आलेली  लिंक शेअर/फॉरवर्ड करा.
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏



No comments:

Post a Comment