सोलापूर चे ZP शिक्षक बनले सात कोटीचे शिक्षक .
७ कोटी रुपयांचा आंतरराष्ट्रीय ग्लोबल टिचर अवॉर्ड रणजितसिंह डिसले गुरुजी यांना मिळाला , ही बातमी टीव्ही वर पहिली आणि आश्चर्याच्या धक्क्या बरोबर आनंद ही झाला. डिसले सरांच्या कामाची दखल आंतरराष्ट्रीय स्तरावर घेतली गेली या बातमीने आम्हा प्राथमिक शिक्षकांची मान अधिकच उंचावली ..
Ranjitsinh Disale Winer 'Global Teacher Prize 2020' And $1 Million
अशी बातमी स्क्रीनवर दिसताच मलाही अत्यानंद झाला .सोलापूर जिल्हयातील परितेवाडी तालुका माढा जिल्हा सोलापूर शाळेवर वर काम करणारे एक स्वतःला वाहून घेतलेले रणजितसिंह डिसले सर…..
ज्याने आज मला शिक्षक असण्याचा अभिमानच नाही तर गर्व आहे हे दाखवून दिले.
युनेस्को व लंडनस्थित वार्की फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दिला जाणारा ग्लोबल टीचर प्राईझ डिसले सरांना आज जाहीर झाला . "QR कोडेड पुस्तकांच्या माध्यमातून अनेक मुलांचे शिक्षण " या कार्याची दाखल घेत वार्कि फाउंडेशनने ही prize जाहीर केली .
जगातील अव्वल ५० शिक्षकांमध्ये स्थान मिळणे ही काय सोपी गोष्ट नाही. कारण या मध्ये रणजितसिंह सरांनी केलेली ११ वर्षांची तपश्चर्या मनावी लागेल. कारण हे शिक्षक केवळ शिक्षकच नाहीत, तर जगात शिक्षणासोबत शांती देखील हवी आहे असा संदेश देणारे एक “शांतता दूतच” म्हणावे लागेल. कारण जगात शांतता नांदावी म्हणून या गुरुजींने मायक्रोसॉफटच्या माध्यमातून " लेट्स द क्रास बॉर्डर " हा उपक्रम राबवून पाच खंडातील १५० देशातील विद्यार्थ्यांना हजारो online तासिका घेणारे हे एकमेव शिक्षक आहेत.
केवळ उपक्रम राबवून नव्हे तर जगातील व देशातील शिक्षकांना एक प्रेरक आणि मार्गदर्शक ,उत्कृष्ट तंत्रस्नेही म्हणून आम्हा भारतातील सर्व तंत्रस्नेही शिक्षकांना अनुकरणीय व सदैव प्रेरणादायी आहे. शिक्षणात अमूलाग्रह बदल व्हावेत म्हणून डिसले सरांनी QR कोड विकसित केले. याची दखल प्रथम महाराष्ट्र सरकारने घेतली . पाठ्यपुस्तकात QR कोड आणला .नंतर भारत देशाने घेतली आणि आता जागतिक स्तरावर वार्कि फाउंडेशन ने घेतली .हे त्यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नाचे फलित आहे .
आज जगातील १० पेक्षा जास्त देशात QR कोड वापरत असून त्यापासून १० लाखांपेक्षा जास्त मुले शिक्षण घेत आहेत. एवढेच नाहीत तर सलग ७ वर्ष मायक्रोसॉप्टचा MIE मास्टर ट्रेनर म्हणून पुरस्कार मिळवलेले शिक्षक आहेत. त्यांच्या कार्याची दखल प्रथम दैनिक लोकमत ने घेतली होती . तसेच महाराष्ट्राचा पहिला "लोकमत ऑफ द ईअर" हा पुरस्कार देऊन त्यांच्या कार्याचा गौरव देखील केला. तसेच हा पुरस्कार मिळवणारे एकमेव शिक्षक आहेत.
महाराष्ट्रातील शिक्षकांसाठी, रणजितसिंह डिसले सरांनी आज पर्यंत अनेक स्वत:च वेगवेगळे प्रयोग केले आहेत. डिसले सरांनी शिक्षण संबधी, तंत्रज्ञानासंबधी आजपर्यंत १९ पेंटंट मिळवले आहेत . त्यातच सोलापूर जिल्हयात राबवलेला विज्ञानकेंद्रातून व्हर्च्युअल ट्रीपच्यामाध्यमातून देशात ,राज्यातील आणि सोलापूर जिल्हयातील सर्व शाळांना मार्गदर्शन केले आहे. त्यात लाखो मुलांना विज्ञानांची आवड निर्माण करण्यासाठी १० तास सलग काम करणारे शिक्षक म्हणजे खरोखर हा एक अवलियाच असू शकतो.
आज पर्यत अनेक शिक्षकांच्या तंत्रस्नेही कार्यशाळा, व रा्ष्ट्रीय तंत्रस्नेही कार्यशाळेत मार्गदर्शक म्हणून काम केले आहे. त्यात ई बालभारती व राष्ट्रीय पाठयपुस्तकांत QR कोड समाविष्ट करणे तसेच निवडणूक आयोगापुढे "डिजीटल तंत्रज्ञान वापरून मतदान जलद आणि कमी वेळेत कसे घेता येते ?" याचे सादरीकरण करणारे शिक्षक ! शिक्षण क्षेत्रात अनेक स्वयंसेवी संस्थांनी शास्त्रीय दृष्टया विचार न करता चुकीचे अहवाल सादर करुन सरकारची दिशाभूल केली आणि सरकारी शाळांची गुणवत्ता "कशी कमी आहे " हे निदर्शनास आणून दिले होते . तेव्हा या अहवालाला उत्त्तर म्हणून या सरकारी शाळातील ZP शिक्षकांने “असर” ला बेअर करुन शाळांसाठी अनेक लेख लिहून आणि संशोधन करुन आपल्या शिक्षकांचे सत्य शासनापर्यंत पोहोचवले आहे.
आज पर्यत आंतरराष्ट्रीय ११ पुरस्कारानी गौरव केला आहे. केंद्र सरकाराने नाविण्यपुर्ण संशोधक २०१६ मध्ये सन्मानित केले आहे. तसेच नॅशनल इनोव्हेशन २०१८ मध्ये गौरव केला आहे. आजपर्यंत ५०० पेक्षा जास्त लेख व ब्लॉगचे लेखन केले आहे. सहयाद्री चॅनेल, दुरदर्शन, साम टिव्ही, स्टार माझा अशा अनेक प्रसिदध चॅनेलवरती शिक्षणासंबधी चर्चा सत्रात या सरांना आमंत्रित करण्यात आले आहे.
आज रणजितसिंह डिसले सरांना जो आंतरराष्ट्रीय " ग्लोबल टिचर अवॉर्ड " म्हणून जे नामांकन मिळाले आहे हे आपणासर्वांसाठी भुषणावह आहे. कारण जगात अव्वल ५० मध्ये येणे हेच आपल्यासाठी नव्हे तर समस्त शिक्षकांसाठी आनंदाची पर्वणी आहे. “ नव्याचा ध्यास -शिक्षण माझा श्वास ” याचा अंगीकार करुन पुढे त्यासाठी धडपडत राहणे व त्यानुसार स्वत:ला झोकून देणे. हे हया शिक्षकांकडून शिकावे. शिक्षक समाजाचा आणि देशाचा मार्गदर्शक आहे . हे रणजित सरांनी आपल्या कृतीतून आणि तंत्रज्ञानाच्या माध्यमातून दाखवून दिले आहे. शिक्षणाच्या माध्यमातुन धर्माच्या, विषमतेच्या पलिकडे जाता येते व समाजात समानता, विविधेतून एकता, शांतता प्रस्थापित करता येते याचा जगाला अनमोल संदेश आज रणजित सरांनी दिला आहे.
भारताला पहिल्यांदाच हा सन्मान मिळाला आहे.डिसले सरांना 140 देशातल्या बारा हजाराहून जास्त नामांकन असलेल्या शिक्षकातून त्यांची निवड झाली. पुरस्कारातील 50 टक्के रक्कम ही अंतिम फेरीतील उर्वरित नऊ शिक्षकांना विभागून देणार आहेत,की जेणे करून भारताबरोबर आणखी नऊ देशातील हे शिक्षक आपल्या हजारो विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी फायदा करून देतील. पुरस्कारातील उर्वरित रक्कम शिक्षक इनोव्हेशन साठी वापरणार आहेत . हे त्यांनी सांगितले. त्याचबरोबर इतक्या रकमेचा पुरस्कार आजपर्यंत फक्त हॉलिवूड मधील लोकांना किंवा नोबेल पुरस्कारप्राप्त व्यक्तींना मिळतो .पण वार्कि फाउंडेशनला वाटलं , की हे काम संपूर्ण मानवजातीच्या कल्याणासाठी अत्यंत उपयुक्त आहे , आणि त्याचा योग्य सन्मान झाला आहे ........असं मला वाटतं .अशी प्रतिक्रिया देखील त्यांनी माध्यमांशी बोलताना दिली .......................
डिसले सरांचं शिक्षण एम.ए.बी.एड. झालेलं आहे. त्यांचे सर्व प्रयोग मोबाईल, कंप्युटर आणि टेक्निकल क्षेत्रात आहेत. सर्वात आधी त्यांनी QR कोडिंग आणले. त्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थी सहज शिक्षण घेऊ लागले. मायक्रोसॉफ्ट कंपनीने मान्यता दिली.आणि आज जगभरातील बावीस देशात QR कोडिंग अँप चा वापर सुरू झाला . जगभरातील विद्यार्थी आणि शिक्षक यांना डिसले सरांच्या या कन्सेप्ट चा उपयोग होऊ लागला .सोलापूर जिल्ह्यातील चौथी पर्यंतची ही शाळा .पण व्हर्च्युअल शाळेच्या माध्यमातून जागतिक क्लासरूम मध्ये नेऊन सोडलं.
जागतिक योग दिनाच्या दिवशी जगातील 90 देशातील हजारो विद्यार्थ्यांना सूर्यनमस्कार एकावेळी करवून घेतले होते. यापूर्वीही डिसले सरांनी आधीच्या गावात निसर्गाचे प्रगती पुस्तक या रूपाने निसर्गाचा समतोल कसा ढासळत चालला आहे हे गावकऱ्यांच्या लक्षात आणून दिल्याबद्दल नॅशनल जिओग्राफी या संस्थेने या सरांची दखल घेतली होती. त्याचबरोबर पेपरलेस इलेक्शन ही संकल्पना देखील त्यांनी कार्यान्वित करून निवडणूक आयोगापुढे मांडली आहे . त्यालाही आता मान्यता मिळेल. केवळ शिकवणे याच्या पलीकडे जाऊन आपल्याला दिलेली जबाबदारी आपल्या कौशल्याचा वापर करून अधिकाधिक यशस्वी करून दाखवणे ही मानसिकता डिसले सरांना या ठिकाणि पोचवू शकली .
आशा प्रयत्नशील शिक्षकाला माझा मनाचा सलाम ......
#####################################
इतर आणखी काही लेख वाचण्यासाठी माझ्या
या ब्लॉगच्या होम पेज वरील कॅटेगरी (catagory ) वरील ऑप्शन ला जा आणि इतर ब्लॉग वाचा .आवडलेला ब्लॉग आपल्या मित्रांना ,सहकाऱ्यांना whatsapp, facebook द्वारे शेअर करा .
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
छान लेखन
ReplyDeleteमस्त
ReplyDelete