निराश अवस्थेत माणसाला व्यक्त होता आलं पाहिजे .....!
जीवनात प्रत्येक माणसाला केव्हा ना केव्हा नैराश्य येत असते .जीवन म्हणजे एक आदर्श ट्रॅक नसतो . तो आपण आदर्श बनवायचा असतो आणि दुसऱ्याला आदर्श वाटावा असा ट्रॅक दाखवायचा असतो .
नैराश्य कुणाला आलं नाही ? श्रीरामाला आलं, सीतेला आलं.अर्जुनाला आलं.संत ज्ञानेश्वर, तुकाराम म्हणजे संतांच्या पंक्तीत बऱ्याच जणांना नैराश्याचा सामना करावा लागला . पण या पुण्य आत्मानी हार मानली नाही .आपलं जीवन यशस्वी करून दाखवलं . आईसारखे सुंदर विचार देणारे आणि मृत्यूचे चुंबन घेणारे साने गुरुजी देखील आत्महत्या करुन जीवन संपवतात.मन:शक्ती नावाचं मनाला खंबीर करण्याचं शिक्षण देणारे लोणावळ्याचे स्वामी विज्ञानानंद स्वतःच कमकुवत मन घेऊन मंत्रालयावरुन उडी मारुन जीव देतात. आध्यात्मिक गुरु अशी ओळख असलेले भैय्यु महाराज यांनी स्वतःच्या आत्म्याला ओळखलं नाही . कित्येकांना त्यांनी आधार दिला.पण भैय्युजी महाराज यांनी आपलं जीवन आपल्या हातानं संपवलं. चित्रपट सृष्टीला पॉझिटिव्ह विचार देणारा सुशांत सिंग राजपुतनं देखील नैराश्यातुन आत्महत्या केली ,आणि आता सहा आठ महिन्यापूर्वी नैराश्याशी लढा कसा द्यायचा ? हे साऱ्या आनंदवनाला नव्हे तर भारतीयांना शिकवणाऱ्या शीतलआमटे-करजगी (बाबा आमटे यांची नात) यांनी आपलं जीवन नैराश्यातून संपवलं.
पण ......यातुन काय शिकायचं आपण?
आकाशात स्वच्छंदी फिरणारी पाखरं काय किंवा वनात हुंदडणारे पशु काय ? त्यांच्या मानतील घालमेल आपण ओळखू शकत नाही .त्याची धडपड त्यालाच माहीत .
माणूस आपल्या आनंदी आणि सुखी चेहेऱ्याच्या आड काय काय लपवत असतो, लपवण्याचा प्रयत्न करत असतो. माणुस वर वर आपल्याला दिसतो तितका खंबीर असेलच असं नाही.... मनात वेगळी खळबळ असू शकते, ती जी आपल्या पर्यंत पोहोचत नसते.
शेवटी काय ......?
भैय्यूजी महाराज स्वतः एक आध्यत्मिक गूरू होते , परंतू ते एक व्यक्ती पण होते , आपल्या मनातील "स्ट्रेस" बाहेर काढायला त्याच्या जवळ "outlet" नव्हता.आज परत डॉ. शितल आमटे यांचं ही अगदी भैय्यू महाराज सारखं झालं. इतकं महत्वाचं असतं का हे आऊटलेट (outlet) ? इतकं महत्वाचं असतं का हे एक्सप्रेस (express) ?
होय !
मानवी शरीर म्हणजे विवीध पंचतत्वापासून सांधलेलेलं एक धरणचं जणु ! या शरीरात समस्यांची आवक अति प्रमाणात झाली तर हे धरण फूटेल की राहील ? आज प्रत्येकाला विविध समस्या आहेत त्यामुळे ताण आहेत , म्हणून आपलं outlet सदैव सताड उघडं ठेवा . आपल्या तोंडाचे outlet वापरून आपल्या समस्या आई - पत्नीजवळ सांगा ...आपल्या अंतर्मनाचं outlet Open करण्यासाठी विपश्यना ,आनापान,योग, ध्यान, साधनेचा अवलंब आवश्य करा... आणि शक्य झाल्यास जगातील सगळ्यात मोठं outlet म्हणजे आपले डोळे............उघडा , फुटून जाऊ द्या, अश्रूंचा बांध.........वाहून जाऊद्या स्ट्रेस , दूःख , उपेक्षा, जळमटे, गाळ ,कचरा -साऱ्या मनातला............
तुम्हाला नैराश्य आलं ना एक काम करा ..........
हॉस्पिटल मध्ये पेशंट्सना सेवा द्या. एखादया किराणा दुकानात सेवा द्या. एखादया मजुराला तासभर मदत करा. सेल्समन म्हणून सेवा द्या .एखाद्या मंदिराच्या परिसरात स्वच्छतेची सेवा द्या. जवळचे पैसे संपूपर्यंत पर्यटन करा .
जेव्हा जेव्हा नैराश्य येईल तेव्हा तुम्ही तुमच्या गुरुकडे जा .तुम्ही त्यांना कोणतीही समस्या सांगू नका, अगदी निवांत, शांत रहा. तिथे तुम्हाला नैराश्यातून बाहेर पडण्याचा मार्ग सापडेल .
डॉ. शीतल दीदी तुम्हाला मैदान सदैव तयार असताना तुम्हाला बागडायचं कळलं नाही ....असं मला वाटतं डॉ. शीतल आमटे यांनी त्यांच्या मनात आत्महत्येविषयी विचार आले होते तेव्हा त्यांनी पुढारीशी एक मुलाखत दिली होती. त्यामध्ये शीतल ताई म्हणाल्या होत्या ........
काही दिवसांनी माझ्या मनात विचार आले की आपण कुणासाठी जगतोय? आपल्यामध्ये फोअर साईट डेव्हलप करणं खूप महत्वाचं असतं, की मी मृत्यूशय्येवर असताना मला मागचं काय काय बघायचं आहे?
यांनी एक मिलियन झाडं लावली. हिने दिव्यांग लोकांसाठी सबट्रायचर काही तरी काम केलं. असे काय काय काय गोल्स मी डिफाईन करत असे.
माझा जन्म 1981 साल चा. जन्मतः माझे पाय वाकडे होते. मी दिव्यांग होते. पण हळूहळू करेक्ट झाले. शाळा वरोरा येथे .आई वडिलांनी मुद्दाम अशा शाळेत टाकलं की , गरिबांच्या मुलांचा संपर्क येईल . आमचे रुट्स लोकल कम्युनिटीमध्ये स्ट्रॉंग राहिले. पुढे मी मेडिकल कॉलेजमध्ये गेले . मेडिकल कॉलेजमध्ये जाणं थोडंस चुकलं . कारण मला 98 परसेंट मार्क्स मिळाले. पण मला बनायचं होतं आर्टिस्ट. बाबांची शेवटची इच्छा होती की मी डॉक्टर बनावं. बाबांच्या इच्छेमुळे गेले . आर्ट्स स्कुलनी मला आक्सेप्ट केलं नाही, बीकॉज मी ओव्हर क्वालिफाईड होते. मेडिकलची एकच विंडो ओपन होती तिथं मला ऍडमिशन मिळाले.
मेडिकल सेक्टर मध्ये काय होतंय, की पूर्ण व्यक्तीकडे केवळ ऑब्जेक्ट म्हणून बघायला शिकवलं जातं. तुम्ही सब्जेक्ट मध्ये म्हणून बघू शकत नाही. तिला इमोशनलचा टच करू शकत नाही .
बऱ्याच लोकांशी बोलले आणि लक्षात आलं की ,माझ्या वडिलांच्या अंडरच मी काही वर्षे काम केलं तर कदाचित आयुष्यातील मला पर्पज मिळेल.
आयुष्याचा पर्पज फाईंड आउट करण्यासाठी मी आनंदवनात जॉईन झाले. फॉरच्युनेटली जोडीदार मला असा मिळाला की जो मला आनंदवनात राहून काम करायला तयार झाला , गौतम सारखा. त्यामुळे आयुष्य सुरळीत झालं, आणि छान काम होतंय .
गौतम कार्पोरेट मध्ये काम करत होता . तो श्रीलंकेला होता.आम्ही श्रीलंकेला गेलो . सेव्हन स्टार रिसॉर्टस, टीव्ही, व्हिडीओ ,सगळं सगळं. आठ दिवस झाले, दहा दिवस झाले. पंधराव्या दिवशी मला अस्वस्थ वाटायला लागले . मला कळेनासं झालं की असं का होतंय ? नंतर असं लक्षात आलं, की ही सगळी सुखं पायाशी लोळण घेत असताना आपल्या आयुष्यात काही पर्पजच नाही.कोणासाठी आपण जगतोय? आपल्यासाठी जगत नाही. आणि या मटेरियल प्लेजरसाठी तर जगतच नाही. मग तो पर्पजच काय ? मग मी हेच आयुष्य काढायचं का ?
मी त्याच्याशी बोलले, की गौतम असं नाही . आपल्याला कुठेतरी आपल्या आयुष्याचं एक कंबाईन पर्पज डिफाईन करणं गरजेचं आहे.
आज शहरामध्ये कितीही पैसे दिले , तरीही श्रीमंतातला श्रीमंत माणूस मानसिक सुरक्षितता विकत घेऊ शकत नाही.;मला स्त्री म्हणून एका टिपिकल चौकटीत बांधून आवडणार नाही .ते स्वातंत्र्य मला हवंय ..................
डॉ. शीतल आमटे यांनी स्क्रीन अडिक्शन बद्दल खूप काही गोष्टी सांगितल्या आहेत .त्या ब्लॉग देखील चांगल्या लिहितात .यु ट्यूब वर चांगले व्हिडीओज आहेत. पण दुसऱ्याला फिलॉसॉफी शिकवणाऱ्या डॉ.शीतल आमटे यांनी हा निर्णय का घेतला ? साऱ्या जगाला हेवा वाटावा अशी सेवा देणाऱ्या आमटे कुटुंबात ही घटना का घडावी ? शीतल ताई तुम्ही जरी गेलात तरी बाबांची सेवा हे आनंदवनच काय अख्खा महाराष्ट्र विसरणार नाही .
शेवटी असं म्हणावं वाटतं , की माणूस हा प्रथम माणूस असतो नंतर मग ती इतर सारी प्रोफेशन असतात. प्रत्येकाला आपल्या अंतरंगात दाटलेल्या भावनांना व्यक्त करता आलं पाहिजे.आपणाला योग्य ठिकाणी एक्सप्रेस होता आलं पाहिजे . तेव्हा आपला आपण स्वतःचा आऊटलेट शोधून ठेवता आला पाहिजे ..... जसा प्रत्येक किल्याला सुरक्षित राहण्यासाठी एक चोर दरवाजा असतो.
एक्सप्रेस होण्याचे अनेक मार्ग आहेत .... हसणे, रडणे, खेळणे, हुंदडणे, धावणे , गायन, संगीत, चित्र कला , डायरी , घरातील नीटनेटकेपणा हे असे एक नाहीत अनेक एक्सप्रेस होण्याचे पर्याय आहेत .आणि खरंच आपल्याला एक्स्प्रेस होता आलं पाहिजे ..
अनेकांच्या जीवनात नैराश्य येते .पण नैराश्य आलं म्हणून काय जीवन संपवायचं ? हा काय पर्याय असू शकत नाही . डॉ. शीतल आमटे यांना इतर क्षेत्रातील शिक्षण घेता आलं असतं. समाजशास्त्र ,अर्थशास्त्र , शिकता आलं असतं. पण त्या व्यवस्थितपणे व्यक्त झाल्या नाहीत . ज्या पद्धतीने त्या व्यक्त झाल्या त्याला त्यांच्या कुटुंबांनी इन्कार केल्या मुळे देखील त्या आत्महतेच्या विचाराला पोहोचल्या असतील ......................म्हणून काय या पायरीला जायचं का ?
सामान्य माणसाच्या ध्येयाच्या कितीतरी पुढे शीतल ताई तुम्ही होता . बाबांच्या सेवेच्या निम्मी जरी सेवा तुम्ही आजच्या काळात दिली असती ना ? .....तरी नोबेल पुरस्कार तुमच्या दारापर्यंत आला असता .
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
इतर आणखी काही लेख वाचण्यासाठी माझ्या
या ब्लॉगच्या होम पेज वरील कॅटेगरी (catagory ) वरील ऑप्शन ला जा आणि इतर ब्लॉग वाचा .आवडलेला ब्लॉग आपल्या मित्रांना ,सहकाऱ्यांना whatsapp, facebook द्वारे शेअर करा .
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
एकदम बरोबर आहे सर
ReplyDeleteखूपच सुंदर व आत्मचिंतन करायला लावणारा लेख.
ReplyDeleteGood
ReplyDeleteखरंच लहान मुलं होता आलं पाहिजे
ReplyDeleteअगदिच कमाल आहे इत्की टोकाची भूमिका इत्के विचारवन्त लोक कसे घेतात यांचापेक्षा तर आर्मी मिलट्री वाले रोज मृत्यु शी झुंज देवुन जगण्याची इच्छा ठेवतात शौचालय च्या टाकित्त उतरून टा कित्त उतरून टाकी साफ karnare Safai kamgar te pan jagnychi ichha thevtat aandhle apang he sagle h jar जगण्याची करतात तर मग hyna कोण ती निराशा मृत्यु चे कारण बनू शकते
ReplyDeleteजीवनगाणे गातच जावे....!
ReplyDeleteजीवनगाणे गातच जावे....!
ReplyDelete