माझे इतर लेख वाचण्यासाठी ब्लॉगच्या होम पेज वर कॅटेगरी (catagory ) वरील ऑप्शनला जा आणि आपल्या आवडीचा ब्लॉग वाचा. आवडलेला ब्लॉग आपल्या मित्रांना ,सहकाऱ्यांना whatsapp, facebook द्वारे शेअर करा. किंवा पेजची लिंक तुमच्या whatsapp ग्रुपला share करा.धन्यवाद.....!

Saturday, November 28, 2020

एक पाऊल सावधानतेचे . . . . . . . . . पालक मात्र चिंतेत

 

10 वी 12 वी मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांना लागली  काळजी. 

कोविड 19 च्या महामारीचा उतरता आलेख पाहता  दिवाळीनंतर 23 नोव्हेंबर ला राज्य शासनाने शाळा सुरू केल्या . यासाठी वेगवेगळ्या बाजूने  विचार करण्याची आवश्यकता आहे . शासनाने जाहीर केल्या प्रमाणे दररोज हे  नियम पाळावयाचे म्हणजे शक्य वाटत नाही ,  सर्वांची तारेवरची कसरत होत आहे . दररोज तेच काम. नव्या दिवसात काहीसा उत्साह असतो पण हळू हळू उत्साह ओसरत जाईल ,आणि  शाळा सुरू करण्यासाठी काही ठिकाणी जोखीम अधिक वाढत जाईल. येणाऱ्या विद्यार्थ्यांपैकी किती दररोज येतात , त्यानंतर संसर्ग वाढला की  स्थिर राहिला की कमी झाला ? याचा अभ्यास करावा लागेल. पण हे प्रयोग करायला वेळ खर्च करावा लागणार आहे.ही जोखीम केवळ विभागून चालत नाही. प्रत्येकांनी जपली पाहिजे .  पालक जोखीम पत्करायला तयार नाहीत

 पालक म्हणतात आधी लस मगच शाळा .  पुढे म्हणतात की ,शिक्षण काय पुन्हा देखील घेता येईल ,पण जीव गमावल्या नंतर कुणाला मागायचा ?

भारतातील कोरोना 19 चा प्रादुर्भाव कमी असलेल्या राज्यात शाळा सुरू करण्याचे प्रयत्न असफल झाले . महाराष्ट्राला देखील एक  पाऊल सावधानतेचे टाकून प्रयत्न करावा लागणार आहे .

 ज्या भागात कोविड चा प्रादुर्भाव कमी होता त्या ठिकाणी महाविद्यालयीन वर्ग सुरू करावेत . तसेच कोरोना प्रादुर्भाव सर्वात कमी असलेल्या जिल्ह्यातून किंवा सेक्टर मध्ये आधी शाळा अथवा महाविद्यालय चालू करावेत . किंवा कमी लोकसंख्या असलेल्या भागात तसेच खेड्यात ,आधी शाळा सुरू कराव्या लागणार आहेत. त्यानंतर त्याचा अनुभव किंवा परिणाम लक्षात घेऊन इतर जिल्ह्यात /सेक्टर मध्ये हळूहळू शाळा /शिक्षण सुरू कारावेत. मग टप्या टप्याने 11 वी 12 वी , मग 8 वी ते 10 वी  ; 6 वी ते 8 वी , 3री ते 5वी सर्वात शेवटी 1ली 2री चे वर्ग सुरू करावेत .

  

 ऑनलाईन शिक्षण आणि फेस टू फेस शिक्षण यात भरपूर फरक आहे . मीडियाचा अहवाल सांगतो की 15 ते 16 टक्के विद्यार्थी ऑनलाईन शिक्षणापर्यंत पोहोचले आहेत . मग ऑनलाईन शिक्षण सर्वांपर्यंत पोहचत नाही आणि त्याने शिक्षणाचे सार्वत्रिकीकरण 100%होत नाही .शाळा या सुरू कराव्याच लागतील . शिवाय जोखीम पत्करावी लागेल .पण शासनाने ही जोखीम पालकांवर न सोपवता स्वतः घ्यावी . शासनाने पालकांना धीर दिला पाहिजे ....लस आल्यानंतरच शाळा हा निर्णय देखील शैक्षणिक वर्ष वाया घालवण्याचा प्रकार आहे .त्यामुळे या दोन्ही विचारांचा सुवर्णमध्य साधायला हवा .

100% शाळा आपल्याला म्हणजे राज्यसरकाराला एकाच  दिवशी सुरू करायला अडचणीचं ठरणार आहे .म्हणजे आपल्याला ट्रायल ह्या घाव्या लागणार आहेत .

शाळा सुरू केल्यानंतर रुग्ण वाढीचा   अभ्यास   करायला हवा .

मीडियाचा अहवाल सांगतो की 15 ते 16 टक्के विद्यार्थी ऑनलाईन शिक्षण घेऊ शकले. पण त्यांचं तरी 100 टक्के शिक्षण पूर्ण झालं का ? मग ऑनलाईन शिक्षण सर्वांपर्यंत पोहचत नाही.

 10 वी 12 वी च्या  परीक्षा मे पूर्वी शक्य नाहीत मग जून जुलै मध्ये तरी कशा शक्य आहेत ?  खरं तर 1ली ते 9 वी पर्यंतचा अभ्यास उजळणी  ही 10 वी मध्ये होते . ही उजळणी झाली नसेल तर  परीक्षा कशा घेणार ? उच्च शिक्षण / महाविद्यालयीन शिक्षण सुरू केल्या विना शाळा सुरू करण्याची घाई  कशाला करायची ? पालक मात्र आधी लस मग शाळा असं म्हणतात .

 शिक्षणापेक्षा जीव महत्वाचा असं प्रत्येकाला वाटतं .....  कोरोनाचा प्रादुर्भाव  कमी असलेल्या ठिकाणी प्रथमतः महाविद्यालय सुरू करावेत . महाविद्यालयामध्ये वर्दळ कमी ठेवता येणे शक्य  असते. शासनाने घालून दिलेले नियम अधिकाधिक पाळले जाऊ शकतात . तंत्रज्ञानचा वापर करून शिकवता येऊ शकते .त्यातून कोरोनाचा फैलाव किती प्रमाणात होतो हे अभ्यासता येते .माझ्या मते इथून पुढे  शहरी भागापेक्षा  ग्रामीण कोरोनाचा फैलाव कमी गतीने होण्याची शक्यता आहे . म्हणजे नोव्हेंबर मधील रुग्ण वाढीची संख्या पहिली तर शहरी भागापेक्षा ग्रामीण भागात कमी रुग्ण आढळत आहेत .

       एक अर्थी शासनाने शाळा व्यवस्थापन समिती आणि स्थानिक आपत्ती व्यवस्थापन प्रमुख यांच्या सहमतीने शाळा सुरू कारण्यासाजी परवानगी देण्यात आलेली आहे .. पण कोरोनाची  धास्ती सर्वच पालकांनी घेतल्यामुळे पालक  आपल्या पाल्यांना शाळेत  पाठवण्यास तयार होत आहेत पण याची यशस्वीता  होईल की नाही सांगता येत नाही .........  


       शासनाच्या आदेशानुसार कमी जोखीम घेऊन शिक्षक शाळेत जायला तयार आहेत , परंतु संसर्ग पश्चात कोरोनाचा उपचार  फ्री मध्ये मिळावेत अशी चर्चा शिक्षकातून होत आहे ; आणि तीच भूमिका आता शिक्षक संघटनांनी घेतली आहे ......

       कदाचित हे वर्ष ट्रायल घ्यावं लागेल ...अशीही चर्चा  काही पालकातून  होत आहे . तेव्हा पुनःश्च हरिओम करावे लागणार .

#####################################
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
 इतर आणखी काही लेख वाचण्यासाठी माझ्या
 bhausahebmahanor.blogspot.com
या ब्लॉगला फॉलो करा ; की जेणेकरून नवीन लेख पब्लिश झालेची नोटीफिकेशन आपोआप मिळेल.
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
तसेच ब्लॉगच्या होम पेज वरील कॅटेगरी (catagory ) वरील ऑप्शन ला जा आणि इतर ब्लॉग वाचा .आवडलेला ब्लॉग आपल्या मित्रांना ,सहकाऱ्यांना  whatsapp, facebook द्वारे शेअर करा .

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
  एखादा ब्लॉग आवडल्यास , पोस्ट वाचताना उजव्या कोपऱ्यात वरील ऑपशन(तीन टिंब ) वर  जाऊन आपल्या मित्रांना  whatsapp किंवा facebook द्वारे  share करु शकता.
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

       

No comments:

Post a Comment