कोरोनाच्या महामारीमध्ये शासनाने अनलॉक प्रक्रिया सुरू केली आहे .यामध्ये कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता वर्तवली जात आहे . रेल्वे सुरू झाली .महिलांसाठी रेल्वे प्रवास सुरू झाला .रेल्वेच्या फेऱ्या वाढवल्या . पर्यटन स्थळे सुरू झाली .सिनेमा हॉल आणि नाट्यगृहे याआधीच सुरू झाले आहेत .
ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीपासून कोरोना रुग्ण वाढीचा वेग कमी आलेला आहे .त्या अनुषंगाने शासनाने 23 नोव्हेंबरला 9 वी ते 12वी चे वर्ग चालू करण्याचा निर्णय घेतला आहे .17 नोव्हेंबरपासून कर्नाटकातील शाळा सुरू झाल्या आहेत .आठवड्यानंतर महाराष्ट्रातील शाळा सुरू होतील. त्यानंतर कोरोनाची परिस्थिती कशी हाताळावी लागेल याचा विचार करावा लागेल . दिवाळी पाडव्यापासून मंदिरं सुरू झाली आहेत .खरंतर आणखी दहा ते चौदा दिवसानंतर रुग्णवाढीचा वेग अभ्यासून मगच शाळा सुरू करण्याचा निर्णय घ्यायला हवा होता . सध्या अनलॉकच्या पाचव्या टप्प्यामध्ये बऱ्याच गोष्टी शिथिल केल्या आहेत . अनलॉक च्या पाचव्या टप्प्यात जनता पूर्वी प्रमाणे नियम पळत नाहीत हे ही लक्षात आले आहे .मग कोरोनाचा प्रसार कसा रोखणार ?
साधारणत: दसऱ्यापासून काही ठिकाणी आठवडी बाजार सुरू झालेत .सध्या शासकीय कार्यालये , खाजगी कार्यालये ,आणि दवाखाने सोडले तर बाजाराच्या ठिकणी व सार्वजनिक ठिकाणी मास्कचा वापर आणि सोशल डिस्टनसिंग पाळले जात नाही .सध्या ज्या रुग्णाला त्रास होतो तेच रुग्ण दवाखाण्यात जातात, अन्यथा इतर किरकोळ कारणासाठी कोणीही रुग्ण दवाखान्यात जात नाहीत .त्यामुळे खेड्यात आणि निम्न शहरातील माझ्यामते सायलेंट कॅरियर च्या माध्यमातून प्रत्येक व्यक्तीपर्यंत कोरोना कदाचित पोहोचला असेलही.
अनलॉक 5 मध्ये मात्र आता प्रत्येकांनी आपापली जबाबदारी सांभाळली पाहिजे असा एवढाच अर्थ होतो .
दि.23 नोव्हेंबर पासून शाळा सुरू करण्याचा अधिनियम जारी झाला असला तरी शाळा प्रमुख आणि पालकांमध्ये मात्र अत्यंत नाराजी आहे .
पालक मुलांना शाळेत पाठवून देण्यासाठी पालकांचे संमतीपत्र आवश्यक आहे . पण पालकांनी कोणत्या प्रकारचे संमती पत्र लिहून शाळेला द्यायचे ? मी माझ्या पाल्याला शाळेला पाठवून देत आहे . माझ्या मुलाला कोरोनाची लागण झाली ता तर मी पालक म्हणून स्वतः जबाबदार आहे.आणि माझ्या मुलाला कोरोना होऊ दे.असं लिहून द्यायचं का ?
17 ते 22 नोव्हेंबर दरम्यानची कोरोना टेस्ट निगेटिव्ह असेल तर त्या शिक्षकांना शाळेत येण्याची परवानगी असेल .17 तारखेचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आणि त्या शिक्षकाला किंवा विद्यार्थ्याला 18 ते 22 मध्ये लागण झाली तर ? त्याला कोण जबाबदार ? शिवाय विद्यार्थी घरी जाणारच. त्यांच्या कुटुंबात राहणार .दुसऱ्यादिवशी पुन्हा शाळेत येणार .मग दुसऱ्या दिवशी आणि टेस्ट करून घ्यायची का ? याची जबाबदारी किंवा खबरदारी कोण घेणार .
ग्रामीण भागात आता कोरोना रुग्ण वाढीचा वेग कमी झालेला आहे . सायलेंट कॅरियर मुळे कोरोनाची अनेकांना लागण होऊन गेलेले माहीत सुद्धा नसेल . पण ज्यांना धोका आहे त्यांना कालही होता , आजही आहे आणि उद्या देखील धोका आहेच. जे रुग्ण कोविड 19 मधून बरे झाले त्यातील जवळजवळ 75 टक्के लोकांना पुन्हा कोरोना होण्याचा धोका कमी आहे . असे तज्ज्ञ सांगतात. पुढील सात महिन्यापर्यंत अँटिबॉडीज त्या रुग्णाच्या शरीरात राहतात त्यामुळे अशा रुग्णांना तात्पुरता धोका कमी आहे .पण कोरोना हद्दपार झालेला आहे असे म्हणता येत नाही . ज्यांची इम्युनिटी पॉवर कमी आहे त्यांना कायम धोका आहेच . त्यांनी कायम काळजी घ्यावी . मग मला असं वाटतं की , जगातील प्रत्येकाला कोरोना होणार आहेच , कारण जगातील प्रत्येकापासून कोरोना गेल्याशिवाय जगातील कोरोना संपणार नाही . प्लाझ्मा थेरपी युज करून इम्युनिटी पॉवर वाढवली पाहिजे . शाळा सुरू करताना शाळेमधील शिक्षक आणि विद्यार्थी दोन्ही घटक महत्वाचे आहेत , दोन्हीही घटकांची कोरोना टेस्ट व्हायला हव्यात .
काही पालकांचे मत आहे की लस आल्याशिवाय शाळा सुरू करू नयेत .मुलं शाळेत सोशल डिस्टनसिंग पाळतील काय ? शासनाकडून ज्या sop देण्यात आल्या आहेत त्यांचं पालन मुलांकडून होईल काय ? लस येऊ पर्यन्त शाळा सुरू करायची नाही ,तर लस केंव्हा येणार ? लस अजून दोन चार महिने आली नाही तर मग शाळा कधी सुरू होणार ? काही पालक म्हणतील शाळा सुरू करा .मुलांचे वर्ष वाया जाईल . काही पालक म्हणतील संसर्ग कसा रोखणार ? याला काय उत्तर देता येईल ?
मग अशाने शाळा सुरू करता येतील काय ? शाळा सुरू करणे हा निर्णय स्थानिक प्रशासनावर सोपवला पाहिजे हे सत्य असले; तरी शासनानेच पूर्ण जबाबदारी उचलली पाहिजे . काही राज्यांनी शाळा सुरू केल्या आणि कोरोनाचा प्रसार झपाट्याने झाल्याने पुन्हा या शाळा बंद केल्या .खरंतर स्थानिक प्रशासनाने शाळा सुरू करायला हरकत नाहीत.
मग कोरोना कधी संपणार आहे ? आपल्याला असं म्हणता येईल की जगातल्या प्रत्येक व्यक्ती कडून कोरोना संपल्याशिवाय कोरोना संपणार नाही. किंवा दुसरं असं म्हणता येईल की जगातल्या प्रत्येक व्यक्तीला कोरोना झाल्याशिवाय कोरोनाची भीती संपणार नाही ......शासनाने शाळा सुरू केले तर शासन जबाबदार .नाही सुरू केली तर शासनाला विद्यार्थ्यांची काळजी नाही असं म्हणायला मोकळे .यावर भरडतात फक्त पालक आणि त्यातही ज्यांचे पाल्य 10 वी किंवा 12 वी ला आहेत ते. मग शाळा सुरू करायच्या नाहीत काय ? या दहावी बारावीच्या मुलांना पुढीलवर्षी काही ऍडमिशन मध्ये वयात शासन सूट देईल काय ? शाळांचे दररोज निर्जंतुकीकरण करायचे काय ?
Consius माईंड ने जिल्हाधिकाऱ्यांनी स्थानिक पातळीवरून सोडवणूक करायला पाहिजे . शाळा खरंतर प्रायोगिक तत्वावर सुरू कराव्या लागतील .
मग हा प्रयोग मुलांच्यावर करायचा काय ? पालक म्हणून मग शाळेत मुलं पाठवतील काय ? सरकारला शाळा सुरू करण्याची घाई नाही हे बरोबर आहे .. विद्यार्थ्यांची विमा पॉलिसी काढावी . शाळेत कोरोना लागण मुलांना झाली तर त्याचा खर्च कोण करणार ? पालकांची काय चूक त्यात ?
सरकार मुलांना मंदिरात जाऊ देत नाहीत , मॉल मध्ये मुलांना प्रवेश नाही मग शाळेत का बोलवायचं ? केवळ एकदा टेस्ट केली म्हणून झालं काय ? दररोज संसर्ग वाढणार नाही कशावरून ? आता सध्या सायलेंट कॅरियर आहेत आणि नाहीत कशावरून ? कोरोनामुक्त सेक्टर मध्ये शाळा सुरू करायला हरकत नाही . पण सध्या महाराष्ट्र आणि दिल्ली मध्ये कोरोना रुग्ण वाढत आहेत , ही देखील चिंतेची बाब आहे . तज्ञांचे मत आहे की थंडीच्या दिवसात कोरोनाची दुसरी लाट येईल . मग शाळा सुरू करणे हा एक प्रयोग होईल ......!
मुंबई महानगरपालिका ने 31 डिसेंबर पर्यंत शाळा सुरू होणार नाहीत हे स्पस्ट केले हे अगदी बरोबर आहे .काही राज्यांनी शाळा सुरू करून पुन्हा बंद केल्या .शाळा सुरू केल्या तर शाळेला चार प्रकारचे विद्यार्थी असणार आहेत .दररोज येणारे, कधीकधी येणारे , अजिबात न येणारे आणि ऑनलाईन असणारे या चार प्रकारचे विदयार्थी आहेत त्यांचे शिक्षण शिक्षक कसं हँडल करू शकतील ?
आता शाळा सुरू केल्या तर वर्ष भरातील 1575 तासिकांचा अभ्यास आता निम्या वेळेत पूर्ण होईल काय ? मग कशाला मुलांचे जीव धोक्यात घालताय ? सहा महिने म्हणजे केवळ एक सत्र तर शाळा बंद आहेत ! लस येईपर्यंत आणखी दोन महिने जाऊ द्या ना ! एक जानेवारीला शाळा सुरू करण्याचा विचार करा .जीव व्यवस्थित असेल तर शिक्षण केव्हाही घेता येईल ; असेही काही पालकांचे मत आहे .गेले दोन तीन दिवस म्हणजे दि.17 पासून शिक्षकांची कोरोना टेस्ट केली जात आहे ,पण कालच्या शिक्षकांच्या कोरोना टेस्ट करताना कोणतेही नियम पाळले गेले नाहीत , हे सर्वांनी पाहिले . त्यामुळे कोरोना संसर्ग वाढणार नाही कशावरून ? पालकांकडून हमी पत्र घेणे हे चूकीचे आहे . कोणताही पालक म्हणेल काय ? माझ्या पाल्याला कोरोना होऊ दे......! म्हणणार नाहीतच ?
भविष्यात जेव्हा व्हॅक्सिन येईल तेव्हा शाळा सुरू करायच्या असतील तर आरोग्य कर्मचार्यांसोबत विद्यार्थी आणि शिक्षक याना लस आधी द्यावी लागेल . मगच शाळा सुरू करता येतील . अन्यथा शासनाला शाळा सुरू करता येणार नाहीत .काही पालकांना वाटतंकी पाल्याच्या शिक्षणापेक्षा जीव महत्वाचा वाटतो . केवळ परीक्षा देणं म्हणजे शाळा किंवा शिक्षण नव्हे . शाळा सुरू करायची म्हणजे शाळा व्यवस्थापनाची तयारी आहे का ? हे देखील पाहिलं पाहिजे .व्यवस्थापन समिती शाळा सुरू करेल मात्र संसर्गाची जबाबदारी तर शासनानेच घ्यायला हवी !शासनाने जबाबदारी झटकली तर मग अशाने शाळा सुरू करता येणार नाहीत .
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
इतर आणखी काही लेख वाचण्यासाठी माझ्या
bhausahebmahanor.blogspot.com
एखादा ब्लॉग आवडल्यास , पोस्ट वाचताना उजव्या कोपऱ्यात वरील ऑपशन(तीन टिंब ) वर जाऊन आपल्या मित्रांना whatsapp किंवा facebook द्वारे share करु शकता.
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
No comments:
Post a Comment