माझे इतर लेख वाचण्यासाठी ब्लॉगच्या होम पेज वर कॅटेगरी (catagory ) वरील ऑप्शनला जा आणि आपल्या आवडीचा ब्लॉग वाचा. आवडलेला ब्लॉग आपल्या मित्रांना ,सहकाऱ्यांना whatsapp, facebook द्वारे शेअर करा. किंवा पेजची लिंक तुमच्या whatsapp ग्रुपला share करा.धन्यवाद.....!

Tuesday, August 18, 2020

सप्टेंबर मध्येही शाळा सुरू होण्याची शक्यता कमी, असे संकेत



सप्टेंबर मध्येही शाळा सुरू होण्याची शक्यता कमी, मुख्यमंत्री मा .उद्धव ठाकरे यांचे संकेत
           गेले पाच महिने कोरोना अर्थात कोविड-19 च्या प्रादुर्भावामुळे शाळा बंद आहेत . चालू शैक्षणिक वर्ष 2020/21 चालू झाले .राज्यातील शाळा, महाविद्यालये बंदच आहेत . राज्याचे शैक्षणिकवर्ष2020/21चालू झाले.शाळा सुरू झाल्या पण विद्यार्थ्याविना .पालकांना मात्र आपल्या पाल्याचे शैक्षणिक वर्ष वाया जाण्याची भीती आहे . कोरोनवर लवकरात लवकर लस उपलब्ध व्हावी आणि शाळा चालू व्हाव्यात.पण तसे घडताना दिसत नाही .  ऑगस्ट महिना संपत आला परंतु राज्यातील कोरोना साथीची परिस्थिती अजूनही नियंत्रणात येत नाही. त्यामुळे राज्यातील लॉकडाऊन हटवला जाणार नसल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे.




   मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील कोविड टास्क फोर्सचे सदस्य डॉ. शशांक जोशी आणि राहुल पंडित यांच्यासोबत शनिवारी एक बैठक घेतली. राज्यातील संपूर्ण लॉकडाऊन हटवण्याची काहीही घाई नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे. ज्या ठिकाणी लॉकडाऊन उठवण्याची घाई झाली , तिथे पुन्हा कोरोना रुग्ण वाढवायचे दिसले. आता सगळीकडे अनलॉक केले तर कोरोनाची दुसरी लाट मोठी येईल .हे टाळण्यासाठी  अनलॉक केलेल्या ठिकाणी पुन्हा लॉकडाऊन केला पाहिजे, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी सांगितलं.

             जगात इतर देशामध्ये काही ठिकाणी शाळा सुरू केल्यानंतर मोठ्या धोक्यांना सामोरे जावे लागले. इस्रायल मध्ये शाळा सुरू केल्या नंतर कोरोना अधिक वेगाने पसरू लागला .अमेरिकेत शाळा सुरू झाल्यानंतर ९७ हजार मुलांना कोरोनाची लागण झाली. कर्नाटक सरकारने दहावीचे राहिलेले पेपर्स घेतले ,पण दोन ब्लॉक मधील विदयार्थ्यांना संसर्ग झाला . यांचा संदर्भ देत मुख्यमंत्री म्हणाले की, कोरोना हा कुणालाही होऊ शकतो. सहा महिन्याच्या बाळापासून ते कोणत्याही वयाच्या व्यक्तिला कोरोना होऊ शकतो. त्यामुळे अति आत्मविश्वास बाळगून चालणार नाही.
                     


 सध्या महाराष्ट्रात कोरोनाची पहिलीच लाट आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत दुसरी लाट येऊ द्यायची नाही. आणि दुसरी लाट येण्याची संधीदेखील द्यायची नाही . दुसरी लाट ही  राज्याचे कंबरडे मोडणारी आहे . त्यामुळे ही लाट कशी थोपवायची याची आपली तयारीही सुरू आहे, असंही मुख्यमंत्र्यांनी  सांगितलं. कोरोनाचा सर्वाधिक फटका गरीबांना बसल्याचं मी जाणून आहे. जर शाळा सुरू झाल्या तर शाळेत कोरोनाचा संसर्ग फैलावला किंवा कार्यालये उघडल्यानंतर त्यात कोरोनाचा संसर्ग वाढला, तर आपल्या हातात काहीच राहणार नाही. त्यामुळे संपूर्ण लॉकडाऊन उघडण्याऐवजी आपण मिशन बिगिन अंतर्गत टप्प्याटप्प्याने अनलॉकची प्रक्रिया सुरू करत आहोत, असं त्यांनी स्पष्ट केलं.
त्यामुळे ऑगस्ट नंतर एक सप्टेंबरमध्ये शाळा सुरू होतील असं वाटत होतं,परंतु आता सप्टेंबरमध्ये देखील शाळा सुरू होणार नाहीत हे स्पष्ट होतंय .

#####################################

( हा लेख लिहिण्याचा उद्देश  म्हणजे  कोरोना विरुद्ध लढण्याची आणि जिंजण्याची जिद्द निर्माण व्हावी ही अपेक्षा.  या लेखात लेखकाचे वैयक्तिक विचार आहेत . धन्यवाद ! )

🙏🙏🙏🙏🙏
 इतर आणखी काही लेख वाचण्यासाठी माझ्या
 bhausahebmahanor.blogspot.com
ला भेट द्या./ ब्लॉगला फॉलो करा.
🙏🙏🙏🙏🙏
  एखादा ब्लॉग आवडल्यास आपल्या मित्रांना  whatsapp किंवा facebook द्वारे  share करु शकता.
🙏🙏🙏🙏🙏

                    


No comments:

Post a Comment